Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आईबरोबरचा लंडनमधला पहिला गणेशोत्सव
    ललित

    आईबरोबरचा लंडनमधला पहिला गणेशोत्सव

    Team AvaantarBy Team AvaantarApril 6, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, गणेशोत्सव, प्रतिष्ठापन, हरतालिका, तीर्थप्रसाद, लंडनचा गणेशोत्सव
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मंदार अनंत पाटील

    आई 18 जुले 2024 रोजी लंडनला आली होती. तिच्या या मुक्कातच गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली. एका शनिवारी जाऊन गणपतीची मूर्तीही ठरवून आली होती. मुंबईतील दादरप्रमाणेच गणरायाची मूर्ती आपल्या घरी येणार याचाच जास्त आनंद होता. त्यात आई देखील सोबत असणार म्हणजे दुधात साखरच!. पल्लवीची धावपळ सुरू झाली. डेकोरेशनसाठी. आईने देखील हौसेने कापडाचे तोरण बनवायला घेतले. या दोघींचा उत्साह बघून यावर्षीचा गणेशोत्सव दणक्यात होणार याची खात्रीच पटली मला! मी देखील लगबगीने तयारीला लागलो.

    आता वेध लागले ते श्रींच्या आगमनाचे. आई येथे आहे म्हणून दोन आठवड्यांची सुट्टीसुद्धा टाकली जेणेकरून सण व्यवस्थित साजरा करता येईल. आता जसजसा गणेशोत्सव जवळ येत होता, तसतसा आई आणि पल्लवीचा उत्साह ओसंडून वाहात होता. रोज भारतातील गणेशोत्सवाच्या नवनवीन बातम्या आणि गणरायाच्या आगमनाचे व्हिडीओ आणखीनच उत्साह वाढवत होते.

    7 सप्टेबर 2024ला लाडक्या गणरायाचे वाजतगाजत आणि मंगलमय वातावरणात आगमन झाले. यथासांग प्रतिष्ठापनेचे सर्व विधी पार पडले. पल्लवीने रात्रभर जागून हरितालिकेची उपासना, पूजेची तयारी आणि सोबतच प्रसादाचे नियोजन करून ठेवले होते. तसेच युट्युबवरून फडके गुरुजींची पूजाही डाऊनलोड करून ठेवली होती. पूजेची सगळी तयारी आधीपासूनच होती. त्यामुळे कुठेही अडचण आली नाही.

    विशेष योगायोग असा की, मलादेखील इंग्लंडमध्ये येऊन त्या दिवशी 18 वर्षं पूर्ण झाली होती. याचे औचित्य साधून मी आईला अगदी पहिले निवासस्थान दाखवायला घेऊन गेलो. तिच्या डोळ्यात पण कौतुकमिश्रित आनंद दिसत होता. परत येताना बाप्पाकरिता हार-फुले आणि गणपतीच्या दर्शनाला येणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना डिशमध्ये देण्यासाठी काही पदार्थ घेऊन आलो.

    दुपारी नैवेद्याचे जेवणाचा आनंद घेईपर्यंत कामावरील सहकारी दर्शनाकरिता आले. पहिल्यांदाच इतके भारतीय लोक घरी आलेले बघून आईला बहुदा भारतात असल्याचा भास होत होता. दणक्यात आरती झाली आणि सर्वांना तीर्थप्रसाद देऊन निरोप घेतला.

    पुढच्या दिवशी आईला लंडनमधील सार्वजनिक गणपती दाखवायला घेऊन गेलो. तिथे तर मुंबईसारखे ढोल-ताशे आणि मिरवणूक बघून आईचा विश्वास बसला की, भारताबाहेरही तितक्याच दणक्यात सगळे सणं साजरे होतात.

    आई विशेष खूश होती, कारण त्यादिवशी तिची स्वाध्याय सखी डॉ.. देसाई तिच्या सुनेबरोबर गणपती दर्शनकरिता येणार होती. आई आणि पल्लवीने बरेच विचारमंथन करून जेवणाचा छान बेत आखला होता अन् तशी दाददेखील मिळाली, हे विशेष. स्वाध्याय सखी डॉ. देसाई यांनी घरी यायचे आमंत्रण दिले आणि निरोप घेतला.

    आई आणि पल्लवी रोजच गणपतीकरिता कंठी आणि फुलांची तयारी करून ठेवत होत्या. पल्लवी न चुकता प्रसादाकरिता वेगवेगळे पदार्थ बनवित होती. माझी एकंदर चंगळच सुरू होती.

    एक दिवस मग आईला आणखी एका सार्वजनिक गणपतीकरिता घेऊन गेलो. हे तेच महाराष्ट्र मंडळ होते, जिथे काही वर्षांपूर्वी माझा मामेभाऊ मनीष हा त्याच्या नाटक कंपनीबरोबर आला होता. तिथे दर्शन करून समाधानाने घरी परतलो.

    बघता बघता गणपती विसर्जनाचा दिवस आला. संध्याकाळी उत्तरपूजा करून ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या घोषात गणरायाला निरोप दिला आणि रिकाम्या पाटासह परत आलो. आता माझी सुट्टीही संपत आली होती. आईला आसपासच्या परिसरात फिरवून आणत होतो. पल्लवीने तिला माझ्याकरिता लोकरीची टोपी बनविण्याची कल्पना सुचविली आणि मी लगेचच तिला जवळच्याच दुकानातून लोकर आणि सुया आणून दिल्या. आईने दुपारच्या वेळात बसून तीन – चार दिवसांत टोपी विणली देखील.

    सुट्टी संपायच्या आधी स्वाध्याय सखी डॉ. देसाई यांच्या घरी एक भेट देऊन आलो. त्यानंतर गणपती उत्सवाची सांगता झाली.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026 ललित

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026 ललित

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    By सतीश बर्वेMarch 23, 2026

    खरंच काही व्यक्तींचा सहवास, अगदी थोडा वेळ का असेना, पण आपल्याला आपल्या नकळत आनंदी आणि…

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026

    भार्गवने रुंजीला लग्नासाठी प्रोपज केलं, पण…

    March 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn