कामिनी व्यवहारे
साहित्य
- बटाटे – अर्धा किलो
- सुके खोबरे (किसलेले) – पाव वाटी
- आले – 1 इंच
- हिरव्या मिरच्या – 3 ते 4
- लाल तिखट – पाव चमचा
- खसखस – 1 चमचा
- धणे – 1 चमचा
- काळीमिरी – 4 ते 5 दाणे
- लवंगा – 3 ते 4
- मसाला वेलची – 2
- दालचिनी – छोटा तुकडा
- तूप – 1 चमचा
- दही – पाव वाटी
- साय किंवा क्रीम – पाव वाटी
- तुकडा काजू – 10 ग्रॅम
- केशर – 3 ते 4 काड्या
- कांदा – 1
- दूध – 1 छोटा चमचा
- मीठ – चवीप्रमाणे
हेही वाचा – Recipe : सात्विक पंचामृत केक
कृती
- बटाट्याची साले काढून त्याचे मोठे तुकडे करून घ्यावेत आणि पाण्यात घालून ठेवावेत.
- आले, मिरच्या आणि धणे बारीक वाटून दह्यात घालावे.
- खसखस आणि खोबरे वेगळे वाटून घ्यावे. काजूही वेगळे वाटून घ्यावेत.
- कांदा बारीक चिरून घ्यावा.
- पातेल्यात तूप टाकून गॅसवर गरम करण्यास ठेवावे.
- तूप तापले की, त्यात काळीमिरी, लवंग, दालचिनी, मसाला वेलची घालून फोडणी तयार करावी.
- त्यावर बारीक चिरलेला कांदा घालावा. हा कांदा गुलाबी रंग होईस्तोवर व्यवस्थित परतून घ्यावा.
- नंतर त्यात आल्याचे वाटण घालून पुन्हा थोडे परतून घ्यावे.
- त्यात बटाट्याच्या फोडी घालाव्यात. बाजूला तूप सुटेपर्यंत ते परतावेत.
- नंतर त्यात वाटलेले खोबरे आणि खसखस घालावे, चवीपुरते मीठ घालून त्यात दोन ते अडीच वाट्या पाणी घालून गॅस मंद करून बटाटे शिजू द्यावेत.
- वाटलेले काजू सायीत मिक्स करून ते मिश्रण भाजीत घालावे.
- थोड्या वेळाने चमचाभर दुधात केशर घालून ते भाजीत घालावे.
- दोन मिनिटांनी गॅस बंद करावा.
- बटाट्याची खमंग शाही करी तयार.
तयारी आणि शिजवण्यासाठी एकूण कालावधी – 50 मिनिटे
पुरवठा संख्या – 4 ते 5 व्यक्तींसाठी
हेही वाचा – Recipe : वेगळ्या चवीचे आंबट-गोड पंचामृत
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


