Friday, February 6, 2026

banner 468x60

Homeफूड काॅर्नरRecipe : खमंग मटार करंजी

Recipe : खमंग मटार करंजी

कामिनी व्यवहारे

सारणाचे साहित्य

  • ओला मटार – 1 किलो (सोललेला)
  • ओले खोबरे – 1 वाटी
  • हिरव्या मिरच्या 7 ते 8
  • चिरलेली कोथिंबीर – अर्धी वाटी
  • खसखस – 1 चमचा
  • साखर – अर्धा चमचा
  • लिंबाचा रस – 2 चमचे
  • मीठ – चवीनुसार
  • आले – 1 इंच

कव्हरसाठी साहित्य

  • कणीक – 2 मोठ्या वाट्या
  • तिखट – 1 चमचा
  • हळद – अर्धा चमचा
  • गरम तेलाचे मोहन – 2 चमचे
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – तळणासाठी

हेही वाचा – Recipe : डाळिंब्याची खिचडी (वालाची खिचडी)

कृती

  1. खसखस वेय भाजून वाटून ठेवावी.
  2. मिरच्या, खोबरे, आले आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यावे.
  3. एका भांड्यात तेलाची फोडणी करून त्यात मटार थोडे जाडसर वाटून टाकावेत.
  4. मंद आचेवर एक वाफ घेऊन नंतर वाटलेली खसखस आणि मिरच्यांचे वाटण टाकून चांगले मिक्स करून घ्या.
  5. नंतर त्यात दोन चमचे लिंबाचा रस, अर्धा चमचा साखर, चवीनुसार मीठ टाकून एक वाफ येऊ द्यावी.
  6. अशा रीतीने सारण तयार होईल.
  7. कणकेत तिखट, मीठ, हळद आणि गरम तेलाचे मोहन घालून घट्ट भिजवून ठेवावे.
  8. कणकेचे लिंबाएवढे गोळे करून पुरी लाटून घ्यावी आणि त्यात गार झालेले सारण भरून करंजी करून कातून घ्यावी.
  9. अशा प्रकारे सर्व कणकेच्या करंज्या तयार करून ठेवाव्यात.
  10. कढईत तळणासाठी तेल गरम करून घ्यावे आणि एक-एक करत या करंजा तेलात सोडाव्यात. मध्यम आचेवर करंज्या गुलाबी रंगात तळून घ्याव्यात.

हेही वाचा – Recipe : कुरकुरीत ब्रेड रोल्स…

टीप

  • ज्यांना कांदा, लसूण आवडतो त्यांनी कांदा बारीक चिरून मटार बरोबर परतून घ्यावा आणि लसूण बारीक करून फोडणीत परतून घ्यावा.

एकूण कालावधी – साधारणपणे पाऊण तास

पुरवठा संख्या – चार ते पाच व्यक्तींसाठी


तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

avaantar.recipe@gmail.com

या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!