कामिनी व्यवहारे
खिचडी वेगवेगळ्या प्रकारे बनविली जाते. डाळ तांदळाची, मूगाच्या खिचडीपासून अगदी विविध भाज्या घालून खिचडीला पुलावाचे स्वरूप दिले जाते. डाळिंब्या घालून खिचडी छान लागते. पाहूयात त्याची रेसिपी…
साहित्य
- तांदूळ – 2 वाट्या
- मोड आलेले वाल – 1 वाटी (कडवे वाल असतील तर उत्तम)
- तेल – 2 टेबलस्पून
- मोहरी – 1 लहान चमचा
- जिरे – 1 लहान चमचा
- हिंग – अर्धा लहान चमचा
- हळद – 1 चमचा
- तमालपत्र – 2
- गोडा मसाला – 2 चमचे
- हिरव्या मिरच्या – 2 ते 3
- कांदे – 2
- लाल तिखट – 2 चमचे
- लवंगा – 2 ते 3
- लिंबाचा रस – 2 चमचे
हेही वाचा – Recipe : कुरकुरीत ब्रेड रोल्स…
कृती
- प्रथम मोड आलेले वाल सोलून घ्यावेत.
- तांदूळ धुऊन 4 ते 5 मिनिटे निथळत ठेवावेत.
- कांदा बारीक चिरून घ्यावा.
- गॅसवर आधी 4 वाट्या पाणी गरम करून घ्यावे. नंतर एका भांड्यात तेल चांगले गरम करून घ्यावे.
- या गरम तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद, तमालपत्र, लवंग, हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून फोडणी करून घ्यावी.
- नंतर धुऊन ठेवलेले तांदूळ घालून थोडेसे परतून घ्यावे.
- मग त्यात वाल तसेच गोडा मसाला, लाल तिखट घालून 1 मिनिट परतून घ्यावे.
- या मिश्रणात आपण गरम केलेले पाणी घालून मंद आचेवर शिजू द्यावे.
- वाल शिजल्यावर शेवटी लिंबाचा रस घालून मिक्स करून घ्यावे.
हेही वाचा – Recipe : केळफुलाचे वडे ट्राय केले आहेत का?
टीप
- आवडत असेल तर शिजताना 1 वाटी नारळाचे दूध घालावे, छान चव येते.
- तयारीसाठी लागणारा वेळ –
- वाल भिजवून मोड आणून सोलण्यासाठी 9 ते 10 तास
- बाकीच्या तयारीसाठी – 30 मिनिटे
- खिचडी तयार होण्यास लागणारा वेळ – 30 मिनिटे
पुरवठा संख्या : 3 ते 4 व्यक्तींसाठी
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


