सायली कान्हेरे
बाहेर पाऊस कोसळत असताना, काहीतरी चमचमीत खावेसे वाटते. अशावेळी कॉर्न पॅटीस आणि सोबत पुदिन्याची चटणी याचा आनंद वेगळाच असतो. एकदा करून पाहा, सगळ्यांना आवडेलही!
कॉर्न पॅटीस
साहित्य
- कॉर्न – 2 वाट्या
- सिमला मिरची – 1 (लहान)
- कांदा – 1 (लहान)
- उकडलेले बटाटे – 2
- लसूण – 4-5 पाकळ्या
- आले – 2 इंच
- लवंगी मिरच्या – 3
- चीझ क्यूब – 4 (किसलेले)
- बेसन – अर्धी वाटी
- तांदळाचे पीठ – अर्धी वाटी
- तेल – तळण्यासाठी
पुरवठा संख्या – साधारण 15 पॅटिस होतात
तयारीला लागणारा वेळ –
- कॉर्न उकडून घेण्यासाठी 10 मिनिटे
- भाज्या चिरायला 10 मिनिटे
- आलं, लसूण, मिरच्या यांची भरड पेस्ट करण्यासाठी 5 मिनिटे
- बटाटे उकडणे आणि सोलण्यासाठी 20 मिनिटे
- एकूण कालावधी – 45 मिनिटे
हेही वाचा – Recipe : मिक्स हर्ब राईस आणि चीज स्पिनॅच सॉस
कृती
- उकडलेले कॉर्न मिक्सरमध्ये भरड वाटावेत.
- त्यात चिरलेल्या भाज्या, उकडलेले बटाटे घालावेत.
- आता त्यात लसूण, आलं, मिरची पेस्ट घालावी.
- त्यानंतर दोन्ही पीठं घालावीत आणि चवीनुसार मीठ घालावे.
- या मिश्रणात आता किसलेले चीझ घालावे.
- सगळं नीट मिक्स करून त्याचे वड्यासारखे गोळे करावेत, पण चपटे करून घ्यावेत.
- आता मंद आचेवर तेल तापवून त्यात हे पॅटिस सोडावेत. ब्राऊन रंग होईपर्यंत तळून घ्यावेत.
- टोमॅटो केचप बरोबर किंवा पुदिना चटणी बरोबर गरम गरम सर्व्ह करावेत.
पुदिना चटणी
साहित्य
- पुदिना – 1 वाटी
- कोथिंबीर – अर्धा वाटी
- मिरच्या – 2
- भावनगरी शेव – 4 चमचे
- मीठ – चवीनुसार
- दही – पाव वाटी
कृती
- पुदिना, कोथिंबीर, मिरच्या, भावनगरी शेव, दही आणि चवीनुसार मीठ एकत्र करा.
- हे सगळं मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावं, फाइन पेस्ट झाली पाहिजे.
हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट कोळाचे पोहे
टीप
- ही चटणी कोणत्याही कबाबबरोबर छान लागते.
- यात तुम्हाला आवडतील त्या भाज्या ॲड करू शकता.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.