Saturday, August 2, 2025

banner 468x60

Homeललितकॉमनसेन्स इज मोस्ट अनकॉमन - इति कन्यका उवाच

कॉमनसेन्स इज मोस्ट अनकॉमन – इति कन्यका उवाच

आराधना जोशी

माझी लेक आता मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला आहे. परीक्षा आटोपल्या आहेत आणि कॉलेजच्या मैत्रिणींसोबत ती उत्तर भारतात ट्रिपला गेली आहे. वर्षं कशी सरसर गेली हे कळलंच नाही. आता घरात गप्पा मारताना तिचे काही किस्से आठवले…

प्रसंग पहिला

टीव्हीवर डान्स रिअ‍ॅलिटी शो बघणं सुरू होतं. ब्रेकमध्ये कामं आटोपायच्या मागे मी होते. तेवढ्यात आमच्या कन्यका धुसफुसत स्वयंपाकघरात आल्या. मिनीटभरापूर्वी व्यवस्थित असणाऱ्या तिला अचानक काय झालं, ते मलाच कळेना. आधी वाटलं मोबाइलवर कोणत्या तरी मैत्रिणीशी चॅटिंग करताना काहीतरी वाद झाला असेल. पण तरी चौकशी केली की, नक्की झालं काय?

कन्यका फणकारून म्हणाली, “या जाहिरातवाल्यांना आणि त्यातल्या कलाकारांना काही कॉमन सेन्सच नाहीये. काहीही दाखवतात त्यात. आता कोणती प्लेअर हाय हिल्स घालून बास्केटबॉल खेळेल का? पण नाही. कोणत्यातरी सेलिब्रिटीला आपल्या जाहिरातीत घ्यायचं आणि तिची व्हॅल्यू कॅश करायला काहीही दाखवायचं. असं कुठे असतं का आई?” आता कुठे मला मुलीच्या रागाचं कारण समजलं. तिला समजावण्यासाठी मी काही बोलणार इतक्यात, कॉमनसेन्स इज मोस्ट अनकॉमन थिंग… असं एक वाक्य माझ्या तोंडावर फेकून ती रागाने बाहेर गेली.

प्रसंग दुसरा

Physical Education practicals अर्थात आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर व्यायामाची प्रात्यक्षिक परीक्षा. त्यासाठी सकाळी 7.30 वाजता विद्यार्थ्यांना कॉलेज ग्राऊंडवर बोलावलं होतं. 9.30 वाजेपर्यंत परीक्षा संपेल, असा माझा अंदाज होता. मात्र तासाभरातच परीक्षा संपल्याचा मुलीचा मेसेज आला आणि पुढच्या 20 मिनीटांमध्ये ती घरीही पोहोचली. परीक्षा कशी झाली, या प्रश्नाची जणू वाटच बघत असल्यासारखी ती उसळून मला म्हणाली, “आई PEच्या practicals साठी तू कधी पूर्ण मेकअप करून, लिपस्टीक, आयलायनर लावून जीन्स घालून आलेल्या मुली बघितल्या आहेस का?”

रागाचं कारण लक्षात आल्यावर मी तिची समजूत घालण्यासाठी म्हटलं, “अगं तू गेली काही वर्षं नियमितपणे व्हॉलीबॉल आणि हॅण्डबॉल खेळत आहेस. आधी शाळेला आणि आता कॉलेजला represent करतेयस. म्हणून तुला ग्राउंडवर कसं वागायचं ते माहिती आहे. बाकीच्या मुलींचं तसं नाही.” अगं पण यात टीममध्ये खेळणं न खेळण्याचा  संबंध येतोच कुठे? ती काय पार्टी होती की, एखादं फंक्शन, जिथे मेकअपची गरज होती अगं, ही कॉमनसेन्सची गोष्ट आहे गं. उगाच तू मला समजवत बसू नको.” इति कन्यका उवाच.

toyashara@gmail.com

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!