Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : गाईची तृषा हरूं, कां व्याघ्रा विष होऊनि मारूं

    June 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जून 2026

    June 18, 2026

    बंधनं… आयुष्याचं ऑक्सिजन!

    June 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, June 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : गाईची तृषा हरूं, कां व्याघ्रा विष होऊनि मारूं
    अध्यात्म

    Dnyaneshwari : गाईची तृषा हरूं, कां व्याघ्रा विष होऊनि मारूं

    Team AvaantarBy Team AvaantarJune 18, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Twelve, बारावा अध्याय, अध्याय बारावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय बारावा

    श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद् ध्यानं विशिष्यते। ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिनिरन्तरम् ॥12॥

    अभ्यासाहूनि गहन। पार्था मग ज्ञान। ज्ञानापासोनि ध्यान। विशेषिजे ॥141॥ मग कर्मफलत्यागु। तो ध्यानापासोनि चांगु। त्यागाहूनि भोगु। शांतिसुखाचा ॥142॥ ऐसिया या वाटा। इहींचि पेणा सुभटा। शांतीचा माजिवटा। ठाकिला जेणें ॥143॥

    अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च। निर्ममो निरहंकारः समदुःखसुखः क्षमी ॥13॥

    जो सर्व भूतांचां ठायीं। द्वेषांतें नेणेंचि कहीं। आपपरु नाहीं। चैतन्या जैसा ॥144॥ उत्तमातें धरिजे। अधम तरि अव्हेरिजे। हें काहींचि नेणिजे। वसुधा जेवीं ॥145॥ कां रायाचें देह चाळूं। रंका परौतें गाळूं। हें न म्ह्णेचि कृपाळू। प्राणु पैं गा ॥146॥ गाईची तृषा हरूं। कां व्याघ्रा विष होऊनि मारूं। ऐसें नेणेंचि का करूं। तोय जैसें ॥147॥ तैसी आघवांचि भूतमात्रीं। एकपणें जया मैत्री। कृपेशीं धात्री। आपणापां जो ॥148॥ आणि मी तूं हे भाष नेणें। माझें कांहींचि न म्हणे। सुखदुःख जाणणें। नाहीं जया ॥149॥ तेवींच क्षमेलागीं। पृथ्वीसि पवाडु आंगीं। संतोषा उत्संगीं। दिधलें घर ॥150॥

    संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः। मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ॥14॥

    वार्षियेंवीण सागरू। जैसा जळें नित्य निर्भरु। तैसा निरुपचारु। संतोषी जो ॥151॥ वाहुनि आपुली आण। धरी जो अंतःकरण। निश्चया साचपण। जयाचेनि ॥152॥ जीव परमात्मा दोन्ही। बैसोनि ऐक्यासनीं। जयाचां हृदयभुवनीं। विराजती ॥153॥ ऐसा योगसमृद्धि। होऊनि जो निरवधि। अर्पी मनोबुद्धि। माझां ठायीं ॥154॥ आंतु बाहेरि योगु। निर्वाळलेयाहि चांगु। तरि माझा अनुरागु। सप्रेम जया ॥155॥ अर्जुना गा तो भक्तु। तोचि योगी तोचि मुक्तु। तो वल्लभा मी कांतु। ऐसा पढिये ॥156॥ हें ना तो आवडे। मज जीवाचेनि पाडें। हेंही एथ थोडें। रूप करणें ॥157॥ तरी पढियंतयाची कहाणी। हे भुलीची भारणी। इयें तंव न बोलणीं। परी बोलवी श्रद्धा ॥158॥ म्हणोनि गा आम्हां। वेगा आली उपमा। एऱ्हवीं काय प्रेमा। अनुवादु असे  ॥159॥ आतां असो हें किरीटी। पैं प्रियाचिया गोष्टी। दुणा थांव उठी। आवडी गा ॥160॥ तयाही वरी विपायें। प्रेमळु संवादिया होये। तिये गोडीसी आहे। कांटाळें मग  ॥161॥ म्हणोनि गा पांडुसुता। तूंचि प्रियु आणि तूंचि श्रोता। वरी प्रियाची वार्ता। प्रसंगें आली ॥162॥ तरी आतां बोलों। भलेंया सुखा मीनलों। ऐसें म्हणतखेंवीं डोलों। लागला देवो ॥163॥ मग म्हणे जाण। तया भक्तांचे लक्षण। जया मी अंतःकरण। बैसों घालीं ॥164॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : म्हणोनि प्रवृत्ति आणि निवृत्ती, इयें वोझीं नेघे मती

    अर्थ

    अभ्यासापेक्षा ज्ञान गहन आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे, ध्यानापेक्षा कर्मफलत्याग अधिक बरा आणि कर्मफलत्यागापेक्षाही शांति श्रेष्ठ आहे ॥12॥

    अर्जुना मग अभ्यासापेक्षा ज्ञान हे खोल आहे आणि ज्ञानापेक्षा ध्यान अधिक महत्वाचे आहे ॥141॥ मग कर्मफलत्याग जो आहे तो ध्यानापेक्षा चांगला आहे आणि कर्मफलत्यागापेक्षा शांतिसुखाचा भोग (म्हणजे ब्रह्मसुखाचा अनुभव) चांगला आहे॥142॥ अर्जुना, अशा या वाटेने व याच मुक्कामाच्या क्रमाने ज्याने शांतीचा मध्य गाठला ॥143॥

    सर्व भूतांच्या ठिकाणी द्वेष न करणारा, मैत्रीने वागणारा आणि तसाच कृपायुक्त, मी माझेपण रहित सुख व दु:ख समान मानणारा क्षमाशील ॥13॥

    सर्वव्यापी चैतन्याला ज्याप्रमाणे आपला व परकेपणाचा भाव कोठेच नसतो, त्याप्रमाणे त्याला लोकांविषयी आपला व परकेपणा राहिला नाही. म्हणून तो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करण्याची गोष्ट जाणत नाही. ॥144॥ उत्तमाचा स्वीकार करावा, आणि नीच म्हणून (नीचाचा) त्याग करावा हे ज्याप्रमाणे पृथ्वी मुळीच जाणत नाही ॥145॥ किंवा अर्जुना, राजाच्या देहाची हालचाल करावी व दरिद्री पुरुषाचा देह टाकून द्यावा असे कृपाळू प्राण केव्हाही म्हणतच नाहीत ॥146॥ गाईची तहान भागवू आणि वाघाला विष होऊन मारू असे करणे पाण्याला जसे ठाऊकच नसते ॥147॥ त्याप्रमाणे ऐक्यबोधाने संपूर्ण प्राणिमात्रांशी ज्याची मैत्री असते व जो आपण स्वत: कृपेची जन्मभूमी असतो ॥148॥ आणखी ‘मी तू’ अशी भाषा त्याला माहीत नसते, आणि माझे असे तो काहीच म्हणत नाही व ज्याला सुखदु:खांची जाणीव नसते ॥149॥ त्याप्रमाणे क्षमेच्या बाबतीत ज्याची योग्यता पृथ्वीसारखी आहे, व त्याने आपल्या मांडीवर संतोषाला घर दिले आहे (संतोष ज्याच्यामुळे वाढला आहे). ॥150॥

    सर्वदा संतुष्ट, योगी, नियतचित्त, माझ्या ठिकाणी ज्याचे मन दृढ आहे असा, माझ्या ठिकाणी ज्याने मन व बुद्धि अर्पण केली आहेत असा जो माझा भक्त असतो, तो मला प्रिय आहे. ॥14॥

    वर्षाऋतुशिवाय जसा समुद्र पाण्याने नेहेमी पूर्ण भरलेला असतो, तसा जो कोणताही बाह्य उपचाराशिवाय संतोषाने नेहेमी पूर्ण भरलेला असतो. ॥151॥ जो अंत:करणाला आपली शपथ घालून आवरून धरतो आणि ज्याच्या योगाने निश्चयाला खरेपणा असतो ॥152॥ त्याच्या अंत:करणरूपी घरामधे जीव व परमात्मा हे दोन्ही ऐक्यरूपी आसनावर बसून शोभत आहेत (जीव व परमात्मा यांचे ऐक्य, ज्याच्या अनुभावाला आले आहे) ॥153॥ असा ऐक्यरूपी ऐश्वर्याने संपन्न होऊन जो आपले मन व बुद्धी अखंड माझ्या ठिकाणी अर्पण करतो ॥154॥ अंत:करणात (आत्मैक्यप्रतीतीच्या दृढतेने) व बाह्य शरीरात (ध्यान, धारणा इत्यादिकांच्या द्वारे) चांगल्या तर्‍हेने योगात तयार होऊन देखील ज्याला माझ्या सगुण स्वरूपाविषयी दृढ प्रेम असते, ॥155॥ अर्जुना तो भक्त, तोच योगी व तोच मुक्त. तो जशी काही स्त्री व मी पती इतका तो मला आवडतो ॥156॥ इतकेच नाही, तर तो मला जीवाइतका प्यार आहे. पण माझे जे त्याच्यावर प्रेम आहे, त्याला ही देखील उपमा अपुरी आहे ॥157॥ परंतु प्रेमळ भक्तांच्या गोष्टी हा मला भुरळ पाडणारा मंत्र आहे. प्रेमळ भक्तांच्या गोष्टी बोलून दाखवण्यासारख्या नाहीत. पण अर्जुना तुझी माझ्यावरील श्रद्धा मला असली न बोलावयाची गोष्ट (पण) बोलावयास लावते ॥158॥ म्हणून आम्ही (बायकोची व जीवाची) झटकन् उपमा देऊ शकलो. नाहीतर हे प्रेम बोलून दाखावता येईल काय ॥159॥ आता अर्जुना हे असू दे. पण प्रियकर भक्तांच्या गोष्टी बोलण्यात प्रेमास दुप्पट बळ चढते ॥160॥ त्यात आणखी कदाचित संवाद करण्यास प्रेमळ मनुष्य मिळाला तर मग त्या आनंदाला दुसरी उपमा आहे काय ॥161॥ म्हणून अर्जुना, तूच प्रेमळ भक्त आणि तूच श्रोता आहेस. शिवाय आणखी प्रसंगानुसार प्रेमळाची गोष्ट बोलण्याची वेळ आली ॥161॥  (जरी प्रेमळाची गोष्ट शब्दांनी बोलून दाखविता येत नाही, तरी मागील ओवीत सांगितल्याप्रमाणे प्रेमळाच्या त्रिपुटीचा प्रसंग आला आहे). म्हणून आता मी बोलतोच. या बोलण्याच्या सुखाचा आपल्याला कसा चांगला योग आला आहे ! असे म्हणतांक्षणीच देव डोलावयला लागले ॥163॥ मग श्रीकृष्ण म्हणाले, ज्या भक्ताला मी आपले अंत:करण बसावयास घालतो. त्या भक्ताची लक्षणे समजून घे ॥164॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : खडकीं जैसें वर्षलें, कां आगीमाजीं पेरिलें 

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : खडकीं जैसें वर्षलें, कां आगीमाजीं पेरिलें 

    June 17, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : म्हणोनि प्रवृत्ति आणि निवृत्ती, इयें वोझीं नेघे मती

    June 16, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : विष कीं आहारीं पडे, समुद्रीं पायवाट जोडे

    June 15, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : खडकीं जैसें वर्षलें, कां आगीमाजीं पेरिलें 

    By Team AvaantarJune 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा अर्थतदप्यशक्तोऽसि कर्तृ मद्योगमाश्रितः । सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् ॥11॥ ना तरी…

    Dnyaneshwari : म्हणोनि प्रवृत्ति आणि निवृत्ती, इयें वोझीं नेघे मती

    June 16, 2026

    Dnyaneshwari : विष कीं आहारीं पडे, समुद्रीं पायवाट जोडे

    June 15, 2026

    Dnyaneshwari : जे मन बुद्धि इहीं घर केलें माझां ठायीं

    June 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : गाईची तृषा हरूं, कां व्याघ्रा विष होऊनि मारूं

    June 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जून 2026

    June 18, 2026

    बंधनं… आयुष्याचं ऑक्सिजन!

    June 17, 2026

    हिरव्या बांगड्या

    June 17, 2026

    स्मोकर्स कफ… शरीराने दिलेली वॉर्निंग बेल!

    June 17, 2026

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    June 17, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 332
    • अवांतर 190
    • आरोग्य 121
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 458
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 224
    • मैत्रीण 21
    • ललित 711
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : गाईची तृषा हरूं, कां व्याघ्रा विष होऊनि मारूं

    June 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जून 2026

    June 18, 2026

    बंधनं… आयुष्याचं ऑक्सिजन!

    June 17, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.