Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : संताचेनि अंगलगें, पापातें जिणणें गंगे

    June 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 19 जून 2026

    June 19, 2026

    ओम सोशल मीडियाय नमः

    June 18, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, June 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : संताचेनि अंगलगें, पापातें जिणणें गंगे
    अध्यात्म

    Dnyaneshwari : संताचेनि अंगलगें, पापातें जिणणें गंगे

    Team AvaantarBy Team AvaantarJune 19, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Twelve, बारावा अध्याय, अध्याय बारावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय बारावा

    यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः । हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥15॥

    तरी सिंधूचेनि माजें । जळचरां भय नुपजे । आणि जळचरीं नुबगिजे । समुद्रु जैसा ॥165॥ तेवीं उन्मत्तें जगें । जयासि खंती न लगे । आणि जयाचेनि आंगें । न शिणे लोकु ॥166॥ किंबहुना पांडवा । शरीर जैसें अवयवां । तैसा नुबगे जीवां । जीवपणें जो ॥167॥ जगचि देह जाहलें । म्हणोनि प्रियाप्रिय गेलें । हर्षामर्ष ठेले । दुजेनविण ॥168॥ ऐसा द्वंद्वनिर्मुक्तु । भयोद्वेगरहितु । याही वरि भक्तु । माझां ठायीं ॥169॥ तरि तयाचा गा मज मोहो । काय सांगों तो पढियावो । हें असे जीवें जीवो । माझेनि तो ॥170॥ जो निजानंदें धाला । परिणामु आयुष्या आला । पूर्णते जाहला । वल्लभु जो ॥171॥

    अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः । सर्वारंभपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः ॥16॥

    जयाचां ठायीं पांडवा । अपेक्षे नाहीं रिगावा । सुखाचि चढावा । जयाचें असणें ॥172॥ मोक्ष देऊनि उदार । काशी होय कीर । परी वेचे लागें शरीर । तिये गांवीं ॥173॥ हिमवंतु दोष खाये । परि जीविताची हानि होये । तैसें शुचित्व नोहे । सज्जनाचें ॥174॥ शुचित्वें शुचि गांग होये । आणि पापतापही जाये । परी तेथें आहे । बुडणें एक ॥175॥ खोलिये पारु नेणिजे । तरी भक्तीं न बुडिजे । रोकडाचि लाहिजे । न मरतां मोक्षु ॥176॥ संताचेनि अंगलगें । पापातें जिणणें गंगे । तेणें संतसंगें । शुचित्व कैसें ॥177॥ म्हणोनि असो जो ऐसा । शुचित्वें तीर्थां कुवासा । जेणें लंघविलें दिशा । मनोमळ ॥178॥ आंतु बाहेरि चोखाळु । सूर्य तैसा उजाळु । आणि तत्त्वार्थींचा पायाळु । देखणा जो ॥179॥ व्यापक आणि उदास । जैसें कां आकाश । तैसें जयाचें मानस । सर्वत्र गा ॥180॥ संसारव्यथे फिटला । जो नैराश्यें विनटला । व्याधाहातोनि सुटला । विहंगमु जैसा ॥181॥ तैसा सतत जो सुखें । कोणीही टवंच न देखे । नेणिजे गतायुषें । लज्जा जेवीं ॥182॥ आणि कर्मारंभालागीं । जया अहंकृती नाही आंगीं । जैसें निरिंधन आगी । विझोनि जाय ॥183॥ तैसा उपशमुचि भागा । जयासि आला पैं गा । जो मोक्षाचिया आंगा । लिहिला असे ॥184॥ अर्जुना हा ठावोवरी । जो सोहंभावो सरोभरी । तो द्वैताचां पैलतीरीं । निगों सरला ॥185॥ कीं भक्तिसुखालागीं । आपणपेंचि दोही भागीं । वांटूनियां आंगीं । सेवकै बाणी ॥186॥ येरा नाम मी ठेवी । मग भजती बोज बरवी । न भजतया दावी । योगिया जो ॥187॥ तयाचे आम्हां व्यसन । आमुचें तो निजध्यान । किंबहुना समाधान । तो मिळे तैं ॥188॥ तयालागीं मज रूपा येणें । तयाचेनि मज एथें असणें । तया लोण कीजे जीवें प्राणें । ऐसा पढिये ॥189॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : खडकीं जैसें वर्षलें, कां आगीमाजीं पेरिलें 

    अर्थ

    ज्याचा लोक कंटाळा करीत नाहीत व जो लोकांना कंटाळत नाही, जो हर्ष, क्रोध, भय आणि उद्वेग यापासून सुटला आहे, तोच मला प्रिय आहे ॥15॥

    तर ज्याप्रमाणे समुद्राच्या खवळण्याने पाण्यात रहाणार्‍या प्राण्यांस भय उत्पन्न होत नाही आणि जलचरांना समुद्र कंटाळत नाही ॥165॥ त्याप्रमाणे उन्मत्त जगाच्या योगाने ज्याला खेद होत नाही आणि ज्याच्या स्वत:कडून लोकांना शीण होत नाही. ॥166॥ फार काय सांगावे! अर्जुना, शरीर जसे अवयवांना कंटाळत नाही, त्याप्रमाणे आपण सर्वांचा जीव आहो अशी त्याची आत्मैक्यबुद्धी असल्यामुळे तो प्राणिमात्रांना कंटाळत नाही ॥167॥ हे जगच त्याचा देह झाल्यामुळे आवडते व नावडते, हे भाव त्याच्या चित्तातून गेले व त्याच्या ठिकाणी द्वैत नसल्यामुळे त्याची आनंद व क्रोध ही द्वंद्वे बंद पडली ॥168॥ असा (सुखादु:खादि) द्वंद्वापासून पूर्णपणे मुक्त झालेला, भय आणि चित्तक्षोभ यांनी रहित झालेला आणि इतके असून शिवाय माझ्या ठिकाणी अनन्य असलेला ॥169॥ तर त्याचा मला मोह असतो, ती आवड काय सांगू? हे राहू दे. तो माझ्याच योगाने जगतो, (म्हणजे त्य़ाचे जगण्यास माझ्या प्रेमाची जरूर असते) ॥170॥ जो आत्मानंदाने तृप्त झाला व जो पुरुष म्हणजे सर्वांचा शेवट असलेले ब्रह्मच जन्मास आले, आणि जो पूर्ण ब्रह्मस्थितीरूपी जी स्त्री तिचा प्रियपती झाला ॥171॥

    निरपेक्ष, शुद्ध, तत्वार्थींचा देखणा, उदासीन, संसारदु:खविरहित, कर्मारंभास अवश्य असणारा जो अहंकार, तद्विरहित असा जो माझा भक्त असतो, तो मला प्रिय आहे. ॥16॥

    अर्जुना, त्याच्या ठिकाणी इच्छेला प्रवेश नाही, (ज्याला कशाचीही जरुरी नाही) आणि ज्याच्या जगण्याने त्याच्या आतील आत्मसुखाचा उत्कर्षच होत रहातो ॥172॥ काशीक्षेत्र हे (जीवांना) मोक्ष देण्यात खरोखर उदार आहे, परंतु त्या क्षेत्रामध्ये मुमुक्षूचे शरीर पडावे पडते ॥173॥ हिमालय पर्वत पाप नाहीसे करतो परंतु तेथे मरण्याचा फार संभव आहे. साधूचा पवित्रपणा तसा धोक्याचा नाही ॥174॥ गंगोदक पवित्रातील पवित्र आहे आणि त्या गंगोदकाने पाप व ताप नाश पावतात परंतु तेथे (गंगोदकात) बुडी मारण्याची जरुरी असल्याकारणाने तेथे बुडण्याचा संभव असतो ॥175॥ गंगेप्रमाणेच साधूच्या (ज्ञानाच्या) खोलीचा अंत लक्षात येत नाही, तरी पण त्याच्या संगतीत साधकास बुडण्याची भीती नसते. तेथे (साधुसंगतीत) मरावयाचा प्रसंग न येता याच देहात रोकडा मोक्ष पदरात पडतो ॥176॥ संतांच्या शरीरस्पर्शाने गंगेची पापे जातात तेव्हा त्या संतांच्या संगतीने किती पवित्रपणा येतो ॥177॥ म्हणून आता हे वर्णन पुरे. तो याप्रमाणे (आपल्या) पवित्रपणाने तीर्थाला आश्रय असतो, ज्याने मनातील अज्ञानादि मळ देशोधडीस लावले ॥178॥ सूर्य जसा आत बाहेर प्रकाशित असतो, त्याप्रमाणे तो आत मनाने व बाहेर शरीराने पवित्र असतो. आणि जो (अज्ञानरूपी भूमीत असलेल्या) ब्रह्मरूपी धनाला पाहणारा पायाळू आहे ॥179॥ ज्याप्रमाणे आकाश सर्वव्यापक असून उदास असते, त्याप्रमाणे ज्याचे मन सर्वव्यापक असून उदास असते, (म्हणून त्याच्या मनाची कोठेही आसक्ती नसते) ॥180॥ जो निराशारूपी अलंकाराने भूषित झाल्यामुळे संसाराच्या पीडेपासून मुक्त झालेला असतो, ज्याप्रमाणे पारध्याच्या हातातून पक्षी सुटून जावा (आणि म्हणून त्या पक्ष्याला आनंद व्हावा) ॥181॥ (वरील पक्ष्याला मोकळेपणाचा आनंद क्षणिक असतो. म्हणजे तो पारध्याच्या हातातून सुटल्याबरोबर त्यास आनंद होतो पण तो एकसारखा टिकत नाही) (परंतु) तसा या पुरुषाला आनंद सतत असतो व मेलेला पुरुष उघड नागडा जरी असला तरी तो लाजेला जसा जाणत नाही तसा तो कोणाकडेही (कोणत्याही स्थितीत) दु:खाला जाणत नाही ॥182॥ आणि कर्माचा आरंभ करण्याकरता लागणारा अहंकार ज्याच्या ठिकाणी नसतो, ज्याप्रमाणे काष्ठरहित अग्नि विझून जातो ॥183॥ त्याप्रमाणे ज्याच्या वाट्याला शांती आली व ज्याचे नाव मोक्षाच्या सदरात दाखल झालेले आहे ॥184॥ अर्जुना, इतका जो ‘ते ब्रह्म मी आहे’ अशा भावनेने भरलेला आहे, तो द्वैताच्या पलीकडच्या काठावर निघाला. (तो अद्वैत झाला). [आता त्याचा भक्तीशी काही संबंध नसेल अशी शंका येईल म्हणून त्याचे निराकरणा पुढे करतात] ॥185॥ तथापि भक्तिसुखाकरता आपल्यातच (देव व भक्त असे) दोन भाग करून तो आपल्या ठिकाणी सेवाधर्म स्वीकारतो ॥186॥ व दुसर्‍या भागाला मी (देव) असे नाव ठेवतो. याप्रमाणे देव व भक्त या दोन्ही कल्पना आपल्यातच सारख्या कल्पून अद्वैतात भजन करणे शक्य नाही अशा समजुतीने भजन न करणार्‍या लोकांना जो योगी भजनाची चांगली पद्धत (आचरून) दाखवतो ॥187॥ त्या भक्ताचा आम्हाला छंद असतो. तो भक्त आमच्या स्वत:च्या ध्यानाचा विषय असतो. फार काय सांगावे ? त्याची जेव्हा आम्हास भेट होते तेव्हाच आम्हाला समाधान वाटते ॥188॥ त्याच्या करता मला सगुण मूर्ती धारण करावी लागते आणि त्याच्याकरताच (मला सगुण विग्रहाने) या जगात रहावे लागते. तो मला इतका आवडतो की त्याच्यावरून जीव व प्राण ओवाळून टाकावेत ॥189॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : गाईची तृषा हरूं, कां व्याघ्रा विष होऊनि मारूं

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : गाईची तृषा हरूं, कां व्याघ्रा विष होऊनि मारूं

    June 18, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : खडकीं जैसें वर्षलें, कां आगीमाजीं पेरिलें 

    June 17, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : म्हणोनि प्रवृत्ति आणि निवृत्ती, इयें वोझीं नेघे मती

    June 16, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : गाईची तृषा हरूं, कां व्याघ्रा विष होऊनि मारूं

    By Team AvaantarJune 18, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद् ध्यानं विशिष्यते। ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिनिरन्तरम् ॥12॥ अभ्यासाहूनि गहन। पार्था…

    Dnyaneshwari : खडकीं जैसें वर्षलें, कां आगीमाजीं पेरिलें 

    June 17, 2026

    Dnyaneshwari : म्हणोनि प्रवृत्ति आणि निवृत्ती, इयें वोझीं नेघे मती

    June 16, 2026

    Dnyaneshwari : विष कीं आहारीं पडे, समुद्रीं पायवाट जोडे

    June 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : संताचेनि अंगलगें, पापातें जिणणें गंगे

    June 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 19 जून 2026

    June 19, 2026

    ओम सोशल मीडियाय नमः

    June 18, 2026

    हेच पक्ष कार्यकर्त्याचं वास्तव!

    June 18, 2026

    अग्रवाल कपंनीच्या नवीन सीईओची घोषणा झाली अन्…

    June 18, 2026

    साधं वरण-भाताच्या वासात आई शोधताना…

    June 18, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 333
    • अवांतर 190
    • आरोग्य 121
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 459
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 224
    • मैत्रीण 21
    • ललित 715
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : संताचेनि अंगलगें, पापातें जिणणें गंगे

    June 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 19 जून 2026

    June 19, 2026

    ओम सोशल मीडियाय नमः

    June 18, 2026
    Most Popular

    हेच पक्ष कार्यकर्त्याचं वास्तव!

    June 18, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.