Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जगात भावनांपेक्षा व्यवहाराचं महत्त्व जास्त!

    April 14, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळ शिक्षण

    April 14, 2026

    Dnyaneshwari : मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहुनी अंतरंगु…

    April 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, April 14
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : मी सर्वदा स्वतःसिद्धु, तो कीं बाळ तरुण वृद्धु…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : मी सर्वदा स्वतःसिद्धु, तो कीं बाळ तरुण वृद्धु…

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 14, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Eleven, अकरावा अध्याय, अध्याय अकरावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय नववा

    मज आकारशून्या आकारु । निरुपाधिका उपचारु । मज विधिविवर्जिता व्यवहारु । आचारादिक ॥157॥ मज वर्णहीना वर्णु । गुणातीतासि गुणु । मज अचरणा चरणु । अपाणिया पाणी ॥158॥ मज अमेया मान । सर्वगतासी स्थान । जैसें सेजेमाजी वन । निदेला देखे ॥159॥ तैसें अश्रवणा श्रोत्र । मज अचक्षूसी नेत्र । अगोत्रा गोत्र । अरूपा रूप ॥160॥ मज अव्यक्तासि व्यक्ती । अनार्तासी आर्ती । स्वयंतृप्ता तृप्ती । भाविती गा ॥161॥ मज अनावरणा प्रावरण । भूषणातीतासि भूषण । मज सकळकारणा कारण । देखती ते ॥162॥ मज सहजातें करिती । स्वंयभातें प्रतिष्ठिती । निरंतराते आव्हानिती । विसर्जिती गा ॥163॥ मी सर्वदा स्वतःसिद्धु । तो कीं बाळ तरुण वृद्धु । मज एकरूपा संबंधु । जाणती ऐसें ॥164॥ मज अद्वैतासि दुजें । मज अकर्तयासि काजें । मी अभोक्ता कीं भुंजें । ऐसें म्हणती ॥165॥ मज अकुळाचें कुळ वानिती । मज नित्याचेनि निधनें शिणती । मज सर्वांतरानें कल्पिती । अरि मित्र गा ॥166॥ मी स्वानंदाभिरामु । तया मज अनेकां सुखांचा कामु । आघवाचि मी असें समु । कीं म्हणती एकदेशी ॥167॥ मी आत्मा एक चराचरीं । म्हणती एकाचा कैंपक्ष करीं । आणि कोपोनि एकातें मारीं । हेंचि वाढविती ॥168॥ किंबहुना ऐसे समस्त । जे हे मनुष्यधर्म प्राकृत । तयाचि नांव मी ऐसें विपरीत । ज्ञान तयांचें ॥169॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : एऱ्हवीं अनुमानाचेनि पैसें, आवडे कीर कळलें ऐसें…

    अर्थ

    जो मी निराकार आहे, त्या मला आकार आहे, असे मानतात आणि देहरहित जो मी, त्या मला पूजेचे उपचार अर्पण करतात. शास्त्रमर्यादेचे बंधन नसलेल्या मला, आचारादिक व्यवहार लावतात. ॥157॥ जातीच्या पलीकडे असणार्‍या मला, एका विशिष्ट जातीचा समजतात, निर्गुणाला सगुण समजतात, पाय नसताना माझ्या ठिकाणी पायांची कल्पना करतात आणि त्याचप्रमाणे हातांच्या कल्पनेस माझ्या ठिकाणी जागा नसूनही, हात या अवयवाची कल्पना करतात. ॥158॥ मोजता न येण्याइतके माझे स्वरूप अमर्याद आहे; परंतु मलाही मर्यादेत घालतात. मी खरोखर सर्व ठिकाणी असूनही, मला एखादे ठिकाण कल्पितात. ज्याप्रमाणे आपल्या अंथरुणावर निजलेला मनुष्य स्वप्नात अरण्य पहातो, ॥159॥ त्याप्रमाणे कान वगैरेंचा संबंध माझ्या ठिकाणी नसताना कानांची कल्पना करतात, डोळ्यांचा संबंध माझ्या ठिकाणी नसतानाही डोळे कल्पितात आणि कोणत्याही नात्याचा संबंध नसताना नातेवाईकांची कल्पना करतात. मी काळागोरा वगैरे नसतानाही तसल्या रूपाची माझ्या ठिकाणी कल्पना करतात. ॥160॥ मी जो अदृश्य, त्या मला दृश्य असे समजतात. मी जो इच्छारहित, त्या मला इच्छा आहे, असे मानतात. मी जो स्वत:सिद्ध तृप्त, त्या मला तृप्ती कल्पितात. ॥161॥ मी वस्त्रांत गुंडाळता येण्यासारखा नसून मला वस्त्र नेसवतात. शृंगाराच्या पलीकडे असताना माझ्याकरिता दागिन्यांची योजना करतात. सर्व जगाला मी उत्पन्न करणारा असून मलाही उत्पन्न करण्याची कल्पना ते करतात. ॥162॥ नित्य असणारा जो मी, त्या मला (मूर्ती वगैरेंच्या द्वारे) घडवितात. मी जो नित्यसिद्ध, त्या माझी प्राणप्रतिष्ठा करतात. अर्जुना, सर्वांच्या आत्मत्वाने अखंड दंडायमान असणारा जो मी, त्या मला आवाहन करतात आणि माझे विसर्जन करतात. ॥163॥ मी जो सर्वदा स्वत:सिद्ध आणि एकरूप आहे, त्या मला बाल्य, तारुण्य आणि वृद्धावस्था यांचा संबंध आहे, असे समजतात, ॥164॥ माझी अद्वैतस्थिती असताना, माझ्या मागे द्वैत लावतात आणि मी कर्मरहित असून कर्मे करतो, असे मानतात; आणि मी जो अभोक्ता, तो मी भोग भोगतो असे मानतात. ॥165॥ माझे कुळरहिताचे कुळ वर्णन करतात. मी जो नित्य, त्या माझ्या मरणाने दु:खी होतात आणि अर्जुना, मी जो सर्वांच्या अंतर्यामी असणारा, त्या मला शत्रू-मित्र आहेत, असे मानतात. ॥166॥ स्वकीय आनंदात रममाण असणारा जो मी, त्या मला अनेक सुखांची इच्छा आहे, असे म्हणतात. मी सगळीकडे सारखा व्यापलेला असून मी एका ठिकाणी आहे, दुसर्‍या ठिकाणी नाही, असे म्हणतात. ॥167॥ मी स्थावरजंगमाचा एकच असा आत्मा असता, मी एकाचा कैवार घेतो, असे म्हणतात आणि रागावून एकाला मारतो, हेच जगात प्रसिद्ध करतात. ॥168॥ फार काय सांगावे? असे हे जे मनुष्याचे सामान्यधर्म, तेच सर्व माझ्या ठिकाणी आहेत, असे त्या अज्ञानी लोकांचे विपरीत ज्ञान असते. ॥169॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : तेविं मी म्हणोनि प्रपंचीं, जिहीं बुडी दिधली कृतनिश्चयाची…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहुनी अंतरंगु…

    April 14, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…

    April 13, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : माजीं गीता सरस्वती गुप्त, आणि दोनी रस ते ओघ मूर्त…

    April 12, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहुनी अंतरंगु…

    By Team AvaantarApril 14, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा आतां बोलिजतसे आइका । हा गीताभाव निका । जो वैकुंठनायका ।…

    Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…

    April 13, 2026

    Dnyaneshwari : माजीं गीता सरस्वती गुप्त, आणि दोनी रस ते ओघ मूर्त…

    April 12, 2026

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    जगात भावनांपेक्षा व्यवहाराचं महत्त्व जास्त!

    April 14, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळ शिक्षण

    April 14, 2026

    Dnyaneshwari : मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहुनी अंतरंगु…

    April 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 एप्रिल 2026

    April 14, 2026

    नावात तर सर्वकाही आहे, पण सांगायचं कसं?

    April 13, 2026

    आशा उद्याच्या, डोळ्यात माझ्या…

    April 13, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 267
    • अवांतर 182
    • आरोग्य 100
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 384
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 194
    • मैत्रीण 18
    • ललित 552
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    जगात भावनांपेक्षा व्यवहाराचं महत्त्व जास्त!

    April 14, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळ शिक्षण

    April 14, 2026

    Dnyaneshwari : मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहुनी अंतरंगु…

    April 14, 2026
    Most Popular

    जगात भावनांपेक्षा व्यवहाराचं महत्त्व जास्त!

    April 14, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.