Friday, August 1, 2025

banner 468x60

Homeललितऋतुरंग

ऋतुरंग

संगीता भिडे (कमल महाबळ)

चैतराचा गं वसंत

येई हसत नाचत

पाना फुलांना बहर, आनंदाला येई पूर॥

मधुप गुंजन, कोकिळ कूजन

तनमनात नर्तन, धरती झाली गं संपन्न॥

चैतराचे सुख, दारी आला गं वैशाख

उभा पेटला वणवा, त्याचा दाह गं साहिना॥

ज्येष्ठ आषाढाचा ग्रीष्म, भेगाळले अंग अंग

दाह साहू मी किती, दुभंगले अंतरंग॥

डोळे लागले आषाढी, झाली मेघांची गं दाटी

बरसला गं श्रावण, धरतीला ये नहाण॥

ल्याली वर्षा राणी, हिरवा शालू भरजरी

सजली, नटली, जणु नवीन नवरी॥

हातीं पुष्पमाला शरदाला गं वरी

पिऊनी चांदणे, रोमांचली रोमरोमी॥

सुगीचे दिस, धान येई शीगोशीग

स्वागतास सिद्ध, बाळ आला गं हेमंत॥

पाहताच बाळलीला, हरखली गं धरणी

दृष्ट लागली सुखास, कोणी केली गं करणी?॥

सरले, सरले, दिस सुखाचे सरले

शिशिराच्या संगे माघ पाऊल वाजवे॥

शिशिराचे ऊन सरले गं सर्व धान

सुरू होई पानगळ, अवघ्या मनाला मरगळ॥

आपलीच पाने टपटपा गं गळती

दुःख सोसावे कसे विचारते गं धरती॥

नको अश्रू ढाळू आवर गं दुःखावेग

शिशिराच्या येई पाठी, वसंत गं लगोलग,

वसंत गं लगोलग॥


गुढीपाडवा निमित्त (30 मार्च 2025)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!