Monday, March 2, 2026

banner 468x60

Homeफिल्मीमोठा मम्मी... आमची दोस्ती आजही पक्की!

मोठा मम्मी… आमची दोस्ती आजही पक्की!

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.

माझ्या आयुष्यात एक बाई आली, ‘मोठा मम्मी’! थोडंस वेगळं नाव. एका मराठी सिनेमाचं शूट करत होते… नगर जिल्ह्यातील एका खेडे गावात. एकंदरीत सगळ प्रकरण ‘धन्यवाद’ होतं. नावाजलेले दिग्दर्शक असूनही खूप वाईट पद्धतीने काम चाललेलं. बरं, प्रोड्युसरची वांग्याची शेती होती. त्याने हॉटेलवर पोतभर वांगी आणून ठेवली होती. सकाळ, संध्याकाळी फक्त वांग्याची भाजी! चला, मला वांगी आवडतातच. पण तिथला आचारी म्हणजे वांग्याचं ‘होळकं’ बनवायचा. ते तिखट जेवण मी अजिबात खाऊ शकत नव्हते… दुसर तिथे काहीच मिळत नव्हतं!

तिथे मुंबईहून एक थोड्या वयस्कर बाई आल्या होत्या… उंच, धिप्पाड, गोऱ्यापान, सुंदर आणि हसतमुख. अर्थात, मी ‘ताई’ म्हणाले त्यांना. त्यांना माझा प्रोब्लेम समजला. तोंडाच्या अल्सरने मी हैराण होते. दिवसभर शूट करून, नंतर उपाशी राहणं मला झेपेनास झालं. मोठा मम्मीच्या लक्षात आलं. त्यांनी लोकेशनच्या जवळपास त्यांना गोठा सापडला. त्या तिथून एका पाण्याच्या रिकाम्या बाटलीतून माझ्यासाठी दूध घेऊन आल्या. थोडं दूध संपल्यावर त्यात विरजण लावल. ते पाच-सहा दिवस त्यांनी जातीने माझ्या खाण्याकडे लक्ष दिलं आणि मी कधी त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसारखी ‘मोठा मम्मी’ बोलायला लागले, मला सुद्धा कळलं नाही!

हेही वाचा – बारीक व्हायचंय? तर मग…

तो सिनेमा पूर्ण झाला नाही. कोणालाही त्या निर्मात्याने पैसेच दिले नाहीत! त्याच्या गप्पा भारी असायच्या. ‘आज वांग्याच्या दोन पट्ट्या विकल्या आणि हॉटेलचे बिल दिलं. रोज तेच ते! फायनली शूट उरकलं आणि मुंबईला आलो. तो सिनेमा डब्यात गेला आणि माझे पैसेही…! पण, मला मात्र मोठा मम्मी भेटली. किती वर्षे सरली कोण जाणे… आमची दोस्ती मात्र आजही पक्की आहे. मी मुंबईत आणि त्या कोल्हापूरात! नियमित भेटणे नाही… फोन नाही… पण त्यांची माया मात्र दुधाच्या साईसारखीच दाट. त्यांच्या मुंबईतल्या घरी गेले होते, तेव्हा त्यांनी मस्तपैकी वांग्याची भाजी बनवली होती माझ्यासाठी!

हेही वाचा – जयू आत्या… स्मृतीबंध!

कोल्हापूरला शूटिंगसाठी गेले असताना त्यांच्या बंगल्यावर गेले होते. लहान लेकराला कडेवर घेऊन फिरवाव तद्वत त्यांनी मला त्याचं सगळ घर दाखवलं… शेजारीपाजारी मला फिरवलं… खूप कौतुक… खूप लाड. एखाद्या लहान मुलीचे करावेत ना, अगदी तसे!

त्या पण आता थकल्यात… मधे हृदयाचा पण काही त्रास झाला होता त्यांना. पण आजही त्या तशाच ठामपणे उभ्या आहेत. मला फोन करतात. तासन् तास आमच्या गप्पा चालतात. त्या गप्पांनंतर आम्ही दोघीही तरुण होतो!

देवा मोठा मम्मीना सुदृढ आणि उदंड आयुष्य देवो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!