Author: सतीश बर्वे

Avatar photo

वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.

गेल्या महिन्यातील ही गोष्ट. मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमधल्या मराठी चित्रपटाच्या प्रीमियर शोची निमंत्रण पत्रिका कुरिअरवाला देऊन गेला. मी त्यावरून नजर टाकली पण एकही ओळखीचं नाव किंवा संदर्भ मला दिसला नाही… मी जास्त विचार न करता ती निमंत्रण पत्रिका बाजूला ठेवून दिली. पण प्रकरण इथेच थांबलं नाही… पुढच्या आठवड्यात मेसेंजरवर मेसेज आला… “काका, येताय ना माझ्या ‘चित्रपटाच्या शो’ला? नक्की या… मी आतुरतेने वाट बघतोय.” मेसेज पाठवणाऱ्याचे नाव वाचलं आणि वीज चमकावी तसं क्षणांत काही वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला! त्याची आणि माझी ओळख खरंतर, आभासी जगातील फेसबुकवरची. चित्रपट क्षेत्रात धडपडणारा एक तरुण मुलगा होता तो. प्रचंड मेहनत करून स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याचे प्रामाणिक…

Read More

यावर्षीचा गणपती सदूकाकाशिवाय साजरा होणार, हे मानायला मन अजूनही तयार नाही. पण काही गोष्टींवर आपलं नियंत्रण नसतं. सदूकाकाचं जाणं असंच चटका लावणारं होतं. गेल्या वर्षी नुकताच पाऊस सुरू झाला होता कोकणात. आकाश फाटल्यागत तो कोसळत होता. संध्याकाळचे साडेसहा वाजले होते. घरी परतणाऱ्या सुनीलने सदूकाकाच्या दरवाजावर हाताच्या केविलवाण्या पडत असलेल्या थापा ऐकल्या… त्याने ताबडतोब त्याची बाईक काकाच्या घरासमोर लावून तो दरवाजाच्या जवळ आला… काकांना हाक मारून दार उघडायला सांगितलं, काकाने कसंबसं दार उघडलं… पण तो दारातच कोसळला. सुनीलने लगेच आम्हाला फोन करून बोलावून घेतले. धावत-पळत पुढच्या पाच मिनिटात आम्ही सगळे पोहोचलो. पण तोवर सगळं संपलं होतं. सुनीलच्या मांडीवरच काकाने शेवटचा श्वास…

Read More