Author: रविंद्र परांजपे

Avatar photo

लेखक योग शिक्षक आणि अभ्यासक असून गेल्या 25 वर्षांपासून ते नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. जानेवारी 2015पासून ते ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत असून त्यांनी असंख्य महिला आणि पुरुष योग साधकांना योग-आरोग्य मार्गदर्शन केले आहे. त्यांनी लिहिलेली ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ व ‘निरामय मानसिक आरोग्य’ ही जीवनोपयोगी मार्गदर्शनपर पुस्तके माफक शुल्कात उपलब्ध आहेत. पुस्तके घेतल्यानंतर विनाशुल्क वैयक्तिक योग-आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध आहे. या संकल्पनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना आवर्जून संपर्क करावा. मोबाइल - 9850856774

दिनचर्येतील लवकर उठणे, ठराविक वेळेस आहार सेवन करणे, लवकर झोपी जाणे आणि सुखनिद्रेचा आनंद आणि लाभ घेणे, याबाबत सविस्तर तपशील आपण मागील लेखांमध्ये जाणून घेतले. या लेखात आपण मलविसर्जन (कोठा साफ असणे) या विषयासंबंधी काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत. वास्तविक, शौच म्हणजे मलविसर्जन करणे, ही एक नैसर्गिक क्रिया आहे आणि म्हणूनच यात काय जाणून घ्यायचे, असे वरकरणी वाटू शकते. परंतु आपण नेहमी अनुभवत असलेल्या एका साध्या गोष्टीवरून या विषयाचे महत्त्व नक्कीच लक्षात येईल. आपली प्रकृती बिघडल्यावर आपण जेव्हा डॉक्टर/वैद्य यांच्याकडे जातो, तेव्हा डॉक्टर/वैद्य एक साधा प्रश्न नेहमी विचारतात, तो म्हणजे ‘पोट नियमित साफ होतं का?’ पोटाचे विकार असले तर…

Read More

मागील लेखांत आपण लवकर झोपायला जाणे, सुखनिद्रा घेणे आणि लवकर उठणे या दिनचर्येतील महत्त्वाच्या बाबींविषयी जाणून घेतले. या लेखात आपण आहाराच्या वेळा आणि प्रमाण याबद्दल मार्गदर्शन घेणार आहोत. आपले शरीर आहारातून निर्माण झाले आहे, हे ध्यानात घेता आहार आणि शरीर यांतील संबंध सहजी लक्षात येतो. आहाराची उद्दिष्ट्ये हे सर्व साध्य करण्यासाठी आपला आहार संतुलित, सात्त्विक आणि पौष्टिक असायला हवा. आपल्या दिनचर्येत आहाराच्या वेळा तसेच प्रमाण या दोनही बाबींना अतिशय महत्त्व आहे. हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : रात्री झोपण्याची वेळ महत्त्वाची आहाराच्या वेळा आहार घेण्याची वेळ ठरलेली असावी. त्यात वारंवार बदल करू नये. दिनचर्येत खालील पद्धतीने आहाराच्या वेळेचे नियोजन…

Read More

मागील लेखात आपण सुखनिद्रेचा अर्थ समजावून घेतला आणि तद्नंतर सुखनिद्रेचे फायदे देखील जाणून घेतले. या लेखात आपण सुखनिद्रेच्या निवडक उपयुक्त उपायांबद्दल मार्गदर्शन घेणार आहोत. तत्पूर्वी, आपण ‘निद्रेसंबंधित समस्या’ याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत रात्री उशिरापर्यंत जागरण करणे आणि साहजिकच परिणामी उशिरा झोपायला जाणे, ही सवय हळूहळू रूढ होत चालली आहे. अशी सवय खरोखरच चुकीची आणि वाईट असून आपल्या शारीरिक तथा मानसिक आरोग्याला हानिकारक आहे. जागरणाप्रमाणे अनिद्रा / निद्रानाश देखील गंभीर समस्या बनली असून बर्‍याच जणांना काही ना काही कारणास्तव ही समस्या भेडसावत असल्याचे दिसून येते. झोपायचे म्हटले तरी, झोप येत नाही, या स्थितीला आयुर्वेदाच्या भाषेत निद्रानाश म्हणतात. अनिद्रा…

Read More

निरामय आरोग्य प्राप्तीसाठी तसेच संवर्धनासाठी आपण मार्गदर्शनाचा श्रीगणेशा दिनचर्येपासून केला. दिवसाची सुरुवात सकाळी लवकर 5 ते 5.30च्या दरम्यान उठून करावी आणि सांगता रात्री 9.30 ते 10च्या दरम्यान झोपी जाऊन करावी, हे आपण मागील दोन लेखांत विस्तृतपणे पाहिले. रात्री झोपण्याच्या आणि दुसरे दिवशी सकाळी उठण्याच्या या कालावधीत आपण रात्रीची झोप घेतो. शरीर-मन स्वस्थ राहण्यासाठी रात्रीची झोप ही ‘सुखनिद्रा’ असणे आवश्यक आहे… आणि हाच या लेखाचा विषय आहे. सुखनिद्रा म्हणजे काय? सोप्या भाषेत, सुखनिद्रा म्हणजे शरीर-मनाला सुख देणारी किंवा प्रदान करणारी निद्रा होय. निद्रा म्हणजे झोप ही शांत (Peaceful), आरामदायी (Restful/ Comfortable), आनंददायी (Pleasant/Happy) असावी. थोडक्यात सांगायचे झाल्यास, पुरेशी, शांत आणि गाढ…

Read More