Author: Team Avaantar

प्राजक्ता अनंत काथे (ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड) मेष ​हा आठवडा खूप शांत आणि आरामदायी असेल. जुने मित्रमैत्रिणी भेटतील किंवा फोनवर बोलणे होऊ शकते. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. नोकरदारांची कामे सहज होतील. आर्थिक प्रश्न सुटतील. महिलांना नवीन गोष्टी शिकायला मिळतील. विद्यार्थ्यांनी रविवारी (7 सप्टेंबर) चंद्रग्रहण आहे, तेव्हा सांभाळून राहावे. वाहन जपून चालवावे. ​वृषभ ​या आठवड्यात घरात छान वातावरण राहील. नवीन खरेदी होऊ शकते. कामाच्या ठिकाणी वादविवाद होण्याची शक्यता आहे (13 तारखेला मंगळ तुळ राशीत येत आहे). त्यामुळे गरज असेल तरच आपले मत मांडावे. मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. महिलांना दगदग होईल. प्रवास करू नका; काळजी घ्या. विद्यार्थ्यांना छोटी नोकरी…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा तूं ऐसा तैं होसी । जैं मोहातें या सांडिसी । आणि वैराग्य मानसीं । संचरेल ॥280॥ मग निष्कळंक गहन । उपजेल आत्मज्ञान । तेणें निचाडें होईल मन । अपैसें तुझें ॥281॥ तेथ आणिक कांही जाणावें । कां मागिलातें स्मरावें । हें अर्जुना आघवें । पारुषेल ॥282॥ श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला । समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥53॥ इंद्रियांचिया संगती । जिये पसरु होतसे मती । ते स्थिर होईल मागुती । आत्मस्वरूपीं ॥283॥…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 07 सप्टेंबर 2025; वार : रविवार भारतीय सौर : 16 भाद्रपद शके 1947; तिथि : पौर्णिमा 23:38; नक्षत्र : शततारका 21:41 योग : सुकर्मा 09:22; करण : विष्टी 12:43 सूर्य : सिंह; चंद्र : कुंभ; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:48 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 प्रौष्ठपदी पौर्णिमा पौर्णिमा समाप्ती रात्री 11:38 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा –  निरामय आरोग्य प्राप्तीसाठी मनापासून इच्छा गरजेची… दिनविशेष प्राच्यविद्या पंडित भाऊ दाजी लाड टीम अवांतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक…

Read More

डॉ. सारिका जोगळेकर (होमिओपॅथिक तज्ज्ञ) गर्भधारणा झाल्यापासून मुलांची वाढ सुरू होते. गर्भामध्ये बाळाचा शारीरिक आणि मानसिक पाया तयार होतो. जन्मानंतर मुलांच्या आयुष्यातील पहिली तीन वर्षे ही सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाची असतात. या काळात त्यांचे शरीर पूर्णपणे विकसित होत असते. प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) निर्माण होत असल्यामुळे बदलत्या ऋतुचा त्यांच्यावर पटकन परिणाम होतो. ऋतू किंवा वातावरणातील तापमान बदलले की, वारंवार सर्दी, खोकला, ताप हे मुलांमध्ये दिसून येते. हा पहिला टप्पा पार पडेपर्यंत मुलं शाळेत जाऊ लागतात, तेव्हा ते पहिल्यांदाच घराच्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडतात. या वेळी त्यांचा नवीन लोक, मित्रमैत्रिणी, शिक्षक तसेच हवामान आणि बाहेरील परिस्थिती यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क येतो. मग त्यांना संसर्गजन्य…

Read More

रविंद्र परांजपे आरोग्य लेखमालेतील पहिल्या लेखात आपण निरामय आरोग्याची गरज समजून घेतली. नंतरच्या पाच लेखांमधून आपण मानसिक आरोग्याचे विविध पैलू विशेषकरून मानसिक ताणतणाव याबाबत सविस्तर माहिती घेतली. मागील लेखात आपण आरोग्य हीच खरी धनसंपत्ती आहे, हे वास्तव जाणून घेतले. `निरामय आरोग्य प्राप्तीसाठी मनापासून इच्छा’, हे या लेखाचे शीर्षक वरकरणी जरा विचित्र वाटेल, कारण आपल्यातील प्रत्येकाच्याच मनात असते की, स्वतःचे आरोग्य निरामय असायला हवे. परंतु प्रत्यक्षात मात्र वेगळेच चित्र दिसून येते. म्हणूनच या विषयावर सखोल विश्लेषण आवश्यक वाटते. ‘निरामय’ आणि ‘आरोग्य’ या दोनही संज्ञा आपण अगोदरच समजून घेतल्या आहेत. आता ‘इच्छा’ या संज्ञेबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. इच्छा म्हणजे आशा, अपेक्षा, आस,…

Read More

शैला सहस्रबुद्धे  रोज नवनवीन काहीतरी करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. त्यातही गृहिणीच्या बाबतीत तर, ‘आज नवीन पदार्थ काय करायचा?’ हा प्रश्न असतोच. मग आहे त्या सामग्रीतच नवीन प्रयोग केले जातात. पालक बटाटा पराठा हा त्यापैकीच एक. ‘टेस्टी पण हेल्दी’ असा हा पदार्थ आहे. नेहमीच्या पदार्थांमध्ये हटके लूक देऊन केलेला वेगळा पदार्थ एकदा तरी नक्की try करा. साहित्य पालक – 10-12 पाने बटाटे – 6 (उकडलेले) लाल तिखट – चवीनुसार मीठ – चवीनुसार पांढरे तीळ – 1 टेबल स्पून आलं – 2 इंच लसूण – 4 पाकळ्या मिरच्या – 3 कणिक – 2 वाट्या डाळीचे पीठ – अर्धी वाटी हेही वाचा – Recipe…

Read More

सतीश बर्वे नीळकंठ टॉवरच्या क्लब हाऊसमधला योगासनाच्या क्लासेसचा वर्षपूर्ती सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. मोठमोठे उद्योजक आणि खासगी तसेच सरकारी आस्थापनातील उच्चपदस्थांनी भरलेल्या या टॉवरमध्ये योगासने शिकायला कोणी येईल, यावर कौस्तुभचा विश्वास नव्हता. पण मी त्याच्या वडिलांना म्हणजे अण्णांना यासाठी तयार केले आणि वर्षभरातच इतिहास घडला. आजच्या धकाधकीच्या जीवनात शारिरीक तंदुरुस्तीसाठी योगासनांचे महत्त्व पटवून देण्यात अण्णा यशस्वी झाले आणि बघता बघता कोकणातून आलेल्या अण्णांचं नाव आमच्या टॉवरमध्ये ज्याच्या त्याच्या तोंडी झाले. एकही पैसा खर्च न करता आणि कुठेही लांब न जाता मिळणारं योगासनांचे शास्त्रशुद्ध शिक्षण इथल्या लोकांना पसंत पडलं. कार्यक्रम संपल्यावर मी घरी जायला निघालो होतो, इतक्यात कौस्तुभची हाक कानावर…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा तूं योगयुक्त होउनी । फळाचा संग सांडुनी । मग अर्जुना चित्त देउनी । करीं कर्में ॥267॥ परी आदरिलें कर्म दैवें । जरी समाप्तीतें पावे । तरी विशेषें तेथ तोषावें । हेही नको ॥268॥ कां निमित्तें कोणें ऐकें । तें सिद्धी न वचतां ठाके । तरी तेथिंचेनि अपरितोखें । क्षोभावें ना ॥269॥ आचरतां सिद्धी गेलें । तरी काजाचि कीर आलें । परी ठेलियाही सगुण जहालें । ऐसेंचि मानीं ॥270॥ देखें जेतुलालें कर्म…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 06 सप्टेंबर 2025; वार : शनिवार भारतीय सौर : 15 भाद्रपद शके 1947; तिथि : चतुर्दशी 25:41; नक्षत्र : धनिष्ठा 22:55 योग : अतिगंड 11:51; करण : गरज 14:31 सूर्य : सिंह; चंद्र : मकर 11:20; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:49 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 अनंत चतुर्दशी पौर्णिमा प्रारंभ उत्तर रात्री 01:41 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – समाजात प्रभाव आणि आदर वाढेल. त्यादृष्टीने दिवस फायदेशीर आणि शुभ असेल. काहीतरी नवीन करू इच्छिणाऱ्यांसाठी…

Read More

प्रणाली वैद्य सर्व थोरा-मोठ्यांचं बोलणं मुलांनी नीट ऐकून घेतलं. रात्रीचं जेवण झाल्यावर उद्याची भटकंती कशी असेल, यावर चर्चा करण्यासाठी सर्वजण एकत्र आले… बाहेर बोचरा गारवा होता, त्यामुळे सगळे जवळजवळ रिंगण करून बसले… शौनकने पुढे होऊन उद्याचं आपलं वेळापत्रक कसं राहील, याबाबत माहिती देण्यास सुरुवात केली… “आपण गावाकडे आहोत… निसर्गाच्या कुशीत… त्यामुळे प्रत्येकाने आपला आळस बाजूला सारत उद्या पहाटे 5 वाजता उठून जितकं लवकरात लवकर आवरून ट्रेककरिता सज्ज व्हावं… माझ्या मते 6.30 वाजता आपण इथून निघायला काहीच हरकत नाही… प्रत्येकाने आपलं इतर सामान इथंच ठेऊन फक्त खाण्याचे जिन्नस, पाणी आणि अगदी आवश्यक अशाच वस्तू सोबत घ्यायच्या आहेत. जितकं लवकर निघू तितक्या…

Read More