Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
प्रदीप केळुस्कर भाग – 2 केशवरावांच्या मृत्यूपत्रावरून मोहन संतप्त झाल्यावर आईने पाच वर्षांपूर्वीची घटना सांगायला सुरुवात केली… केशवराव सतत विवंचनेत असत. आपल्या दोन नंबरचा मुलगा वसंता याचे आपल्यामागे कसे होईल, याची त्यांना काळजी वाटे. या दोन मुलातील मोठा मोहन अभ्यासात हुशार. पहिल्यापासून एक-दोन नंबराने पास होत गेला. त्याचे कौतुक वाटे. आपल्या या परिस्थितीत पाचवीपासूनच त्याला कणकवलीतील एस.एम. हायस्कूलमध्ये घातले. त्याच्या वर्गात कणकवलीतील डॉक्टर्स, प्रोफेसर्सची मुले होती. सातवी स्कॉलरशीपमध्ये तो जिल्ह्यात पाचवा आला. त्याचे फोटो सर्व पेपरमध्ये छापून आले. त्याच्या शिक्षकांनी पण त्याच्या अभ्यासात लक्ष घातले. दहावीत तो जिल्ह्यात तिसरा आला. त्याची आवड म्हणून तो कॉमर्सकडे गेला. बारावीत पुन्हा चांगले मार्क्स…
सुनील शिरवाडकर ‘बम बम… बम बम…’ असं पुटपुटत ओम या कुशीवरून त्या कुशीवर झाला. त्याच्या आईनं त्यांचं पांघरूण सारखं केलं. झोपेतही ओमचं ‘बम बम भोले…’ सुरूच होतं. आईनं त्याला हलवून जागं केलं… “कसलं स्वप्न पडतंय तुला ओम?” ओम जागा झाला… थोडा वेळ त्याला काही समजलंच नाही. मग हळूहळू तो स्वप्न आठवू लागला… आपण कुठल्या तरी जत्रेत शंकराच्या वेषात फिरत आहोत… पण पुढचं काही आठवेना! असं वारंवार होऊ लागलं. यावर उपाय काय करावा, हे त्यांना समजेना. बरं ते काही वाईट स्वप्न नव्हतं. त्याच्यामुळे ओमला काही त्रासही होत नव्हता. पण हे स्वप्न काही सुचवत तर नसेल ना? …तेवढ्यात होळी जवळ आली. मग…
कामिनी व्यवहारे साहित्य बारीक रवा – 1 वाटी दूध – अर्धी वाटी दही – पाव वाटी साजूक तूप – पाव वाटी साखर – पाव वाटी मध – 2 टेबलस्पून बेकिंग पावडर – अर्धा टी-स्पून केशराच्या काड्या – 6-7 तयारीसाठी लागणारा वेळ : 20 मिनिटे मिश्रण करून ठेवण्यास लागणारा वेळ : 3 ते 4 तास एकूण केक तयार होण्यास लागणारी वेळ : 5 तास पुरवठा संख्या : 3 ते 4 माणसांसाठी हेही वाचा – Recipe : ग्रीन पीज चीज पॅटीस कृती दूध, दही, साजूक तूप, साखर आणि मध एकत्रित करून नीट ढवळून घ्या. छान रंग यावा म्हणून त्यात थोडं केशर घाला. हे…
अनिता बाळकृष्ण वैरागडे मागील लेखात आपण उभे राहून केलेले सूर्यनमस्कार बघितले होते… आता आपण बसून सूर्यनमस्कार कसे करायचे ते बघूया. सूर्यनमस्कार साधारणपणे उभे राहूनच केले जातात. पण काही लोकांना, जसे की वृद्ध व्यक्ती किंवा गुडघेदुखी, पाठदुखी अथवा तत्सम कुठल्या आजार असेल तर ते उभे राहून सूर्यनमस्कार शक्य होत नाही. म्हणून अशा व्यक्तींना खुर्चीत बसून सूर्यनमस्कार करता येते. प्रथम स्थिर खुर्ची घ्यावी. त्यावर बसल्यावर पाय सरळ रेषेत जमिनीवर टेकलेले असावेत आणि गुडघे 90 अंशाच्या कोनात असावे. दोन्ही हात छातीपुढे नमस्कार मुद्रेत ठेवावेत. डोळे मिटून श्वास आत घ्या आणि हळूहळू सोडा. श्वास घेत जोडलेले हात वर करा. खांदे कानापासून दूर ठेवा. थोडे…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा देखें उत्प्लवनासरिसा । पक्षी फळासि झोंबे जैसा । सांगें नरु केवीं तैसा । पावे वेगां ॥41॥ तो हळूहळू ढाळेंढाळें । केतुकेनि एके वेळे । मार्गाचेनि बळें । निश्चित ठाकी ॥42॥ तैसें देख पां विहंगममतें । अधिष्ठूनि ज्ञानातें । सांख्य सद्य मोक्षातें । आकळिती ॥43॥ येर योगिये कर्माधारें । विहितेंचि निजाचारें । पूर्णता अवसरें । पावते होती ॥44॥ न कर्मणामनारम्भान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते । न च संन्यसनादेव सिद्धिं समाधिगच्छति ॥4॥ वांचोनि कर्मारंभ उचित ।…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 17 सप्टेंबर 2025; वार : बुधवार भारतीय सौर : 26 भाद्रपद शके 1947; तिथि : एकादशी 23:39; नक्षत्र : पुष्य अहोरात्र योग : परिघ 22:54; करण : बव 11:57 सूर्य : कन्या; चंद्र : कर्क; सूर्योदय : 06:26; सूर्यास्त : 18:39 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 इंदिरा एकादशी एकादशी श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यवसायाच्या बाबतीत जुन्या मित्रांचा पाठिंबा मिळेल, ज्यामुळे अनेक प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. बँक किंवा संस्थेकडून कर्ज घेण्याचा…
डॉ. अस्मिता हवालदार ‘महाभारत’ इतके भुरळ घालणारे आहे की, त्यावर भरपूर लेखन झालेलं आहे. लेखनच का प्रत्येक कलाविष्कार, मग शिल्प असो, चित्र असो, नाटक असो, कविता असो… विपुल प्रमाणात निर्माण झालं आणि अनेक भाषांतून भाषांतरित सुद्धा झालं. इरावती कर्वे यांनी लिहिलेलं महाभारत वेगळं आहे, कारण त्यात प्रत्येक व्यक्तिरेखेचा ऊहापोह केला आहे… तोही प्रांजळ, पूर्वग्रह न ठेवता! कोणाचेही उदात्तीकरण करून किंवा दैवत्व बहाल करून नाही. प्रत्येक व्यक्तिरेखेला माणूस मानून त्याच्या गुणदोषांचं, काव्यातल्या स्थानाचं वर्णन केलेलं दिसतं. त्यामुळे परिपूर्ण कोणीच नाही, सर्वांना चुकण्याचा अधिकार आहे, सर्वांच्यात मानवी गुण आहेत हे अधोरेखित होतं. ही कादंबरी नाही; त्यामुळे जे लिहिलं आहे, ते तत्थ्यांवर आधारित…
सतीश बर्वे ईमेलवर त्याने फायनल केलेलं त्याच्या नवीन व्यवसायाचे सचित्र ब्रोशर मला पाठवलं होतं वाचायला… त्यासोबत एक ओळ लिहिली होती त्याने ‘Without U it was Impossible.’ ती ओळ वाचून मला हसायला आलं, कारण त्या दिवसापर्यंत आमच्यातील मैत्री तशीच होती, म्हणजे फक्त नावापुरती. त्यात संवाद नव्हता… विचार नव्हते… स्वतःहून भेटणं नव्हतं… बोलणं नव्हतं… मजा, मस्ती, भंकस असं काहीच नव्हतं… काही कारणाने झालेली ओळख मैत्रीचा मुखवटा धारण करून पुढे चालली होती इतकंच! बाकी काही नाही. त्याच्यात आणि माझ्यात खरंतर काहीच मिळतं-जुळतं नाही. ना स्वभाव, ना आवडीनिवडी, ना मतं! तरी सुद्धा आम्ही मित्र आहोत. ‘आपलंच म्हणणं खरं’ असणाऱ्या स्वभावाच्या माणसांपैकी हा एक अवलिया……
माधवी जोशी माहुलकर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदीया, अकोला, अमरावती, बुलढाणा या विदर्भातील काही जिल्ह्यांमधील आपापल्या निरनिराळ्या खाद्यसंस्कृती आहेत. विदर्भाला लागून ज्या राज्यांच्या सीमारेषा आहेत तेथील लोक नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतरीत होऊन विदर्भातील मोठमोठ्या शहरांमध्ये रहायला आले आणि इथलेच होऊन गेलेत. याचमुळे इथे वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींची रेलचेल असावी, असे मला वाटतं. ‘तुरीच्या उसळीतील दिवसे’ हे मी नागपूरला रहायला आल्यानंतर प्रथमच ऐकले. यांचा आकार थोडा खोलगट दिव्यांसारखा आहे म्हणून कदाचित यांना ‘दिवसे’ म्हटलं जात असावं. उसळीसाठी साहित्य अख्खे तुरीचे वाळवलेले दाणे – दोन वाट्या मोठा कांदा – 1 लसूण – 5-6 पाकळ्या आले – अर्धा इंच टोमॅटो – 1 (आवडत असेल…
चंद्रकांत पाटील गेल्या महिन्यातली गोष्ट…. नेहमीप्रमाणे सायंकाळी मी आमच्या ‘मगरपट्टा मार्केट सेंटर’ ला गेलो होतो, तेथे म्हाताऱ्यांचा ग्रुप बसला होता. सगळे ओळखीचे लोक असल्याने त्याना ‘हाय’ करायचं आणि औषधे, भाजी घेऊन परत फिरायचं या उद्देशाने मी त्या ग्रुपकडे गेलो. कुणाला नमस्कार, तर कुणाशी शेकहॅण्ड करताना लक्षात आले की, प्रभाकर काका जरा गंभीर होऊन बसलेले आहेत… म्हणून मी त्यांना म्हणालो, “काय काका, आज जोडीदार आलेले दिसत नाहीयेत?” “कोण जकाते म्हणताय का?” बाजूला बसलेल्या पवार सरांनी विचारले. “हो, हो…” मी म्हणालो. “अरे, ते जरा आजारी आहेत… त्यांना ‘प्रोस्टेट ग्रंथी’चा त्रास असल्याने त्याना ‘कॅथेटर’ लावला आहे, त्यामुळे ते घरीच आहेत…” “…आणि त्यांचे मित्र…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 247
- अवांतर 174
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 362
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 513
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

