Author: Team Avaantar

भाग – 12 सुमित्रा आजी आराध्याला आपल्या सोबत नेत होती. आराध्या थोडं आश्चर्यचकित झाली. तिच्या आयुष्यात एवढ्या सहजतेनं कोणीतरी तिचा हात धरून नवं दार उघडून देईल, असं तिला वाटलंच नव्हतं. तिच्या मनातलं गोंधळ, भीती आणि आतापर्यंतचा तिरस्कार… काही क्षणांसाठी तरी मागं सरकला होता. आता तिचं आयुष्य एका नव्या दिशेकडे वळत होतं — गुरूजींच्या मार्गदर्शनाखाली! आराध्या तिच्या मनातला गोंधळ लपवत आजीकडे परत जाते, पण तिचं लक्ष अजूनही त्या जाणिवेवरच फिरत होतं. सुमित्रा आजी तिला आतल्या एका विस्तृत, शांत खोलीत घेऊन जातात. खोलीत भिंतींवर काही सुंदर चित्रं लावलेली असतात — काही ध्यानस्थ योगी, काही मंदिरांचे दृश्य… आणि एक अत्यंत वेधक चित्र —…

Read More

प्रणाली मंगेश महाशब्दे खरंतर, अबोला या शब्दाचा अर्थ रुसवा किंवा द्वेष या कारणांमुळे एकमेकांशी न बोलणे असा होतो. काही वेळेस हा अबोला क्षणिक किंवा लटका असतो तर, काही वेळेस मात्र हा अबोला खूप दिवस चालणारा असतो. नातं कोणतेही असो प्रत्येकानेच अबोला हा अनुभवलेला असतो. नातं जितकं जवळचं तितका अबोला हा नेहमीचाच ठरलेला असतो. प्रत्येक नात्यामधील अबोल्याचा काळ हा त्या नात्यातील जवळीकीवर अवलंबून असतो! रुसणे, अबोला धरणे आणि नंतर त्या व्यक्तीला मनवणे यावर तर किती छान-छान गाणी पण आहेत – जसे ‘हा रुसवा सोड सखे… सोड ना अबोला’; ‘का रे दुरावा का रे अबोला… ‘, ‘सजणा कशासी अबोला…’, ‘अबोल प्रीत बहरली…’…

Read More

माधवी जोशी माहुलकर पुंडलिकाने आर्ततेने विठ्ठलाला साद घातली अन् विठ्ठल रुक्मिणीला काहीही न सांगता, तिला न भेटता नेहमीप्रमाणे तरातरा चालत गेला त्याला भेटायला! खरंतर, विठ्ठल हे श्रीकृष्णाचे रुप! द्वारकेतून श्रीकृष्णावर रुसून रुक्मिणी दिंडीरवनात म्हणजेच पंढरपूरात येऊन राहिली… तिचा रुसवा काढण्यासाठी विठ्ठलाचे रूप असलेला श्रीकृष्ण पंढरपूरला आला होता. पण तिचा रुसवा काढण्यापेक्षा त्याला त्याच्या परम भक्ताला पुंडलिकाला भेटणे महत्त्वाचे वाटले. आपल्याला भेटायला आलेला आपला नवरा कुठे दिसेना म्हणून तीपण निघाली त्याला शोधायला… मनाशीच तिने अटकळ बांधली की, आपला नवरा नक्की पंढरपूरात पुंडलिकाच्या घरी गेला असणार! कारण, पुंडलिकाच्या विठ्ठल भक्तीच्या कहाण्या तीपण रोज ऐकत होतीच. त्याने विठू दर्शनाचा जणू ध्यासच घेतला होता.…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा पैं स्थूलदृष्टी देखती मातें । तेंचि न देखणें जाण निरुतें । जैसें स्वप्नींचेनि अमृतें । अमरा नोहिजे ॥144॥ एऱ्हवीं स्थूलदृष्टी मूढ । मातें जाणती कीर दृढ । परि तें जाणणेंचि जाणणेया आड । रिगोनि ठाके ॥145॥ जैसा नक्षत्राचिया आभासा- । साठीं घातु झाला तया हंसा । माजीं रत्नबुद्धीचिया आशा । रिगोनियां ॥146॥ सांगे गंगा या बुद्धी मृगजळ । ठाकोनि आलियाचें कवण फळ । काय सुरतरु म्हणोनि बाबुळ । सेविली करी ॥147॥ हा निळयाचा दुसरा । या बुद्धी हातु घातला विखारा । कां रत्ने म्हणोनि गारा । वेंची जेविं ॥148॥ अथवा निधान हें प्रगटलें । म्हणोनि खदिरांगार…

Read More

दर्शन कुलकर्णी विजया एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – नोकरदारांकडील कामाचा ताण वाढू शकतो. पण सहकाऱ्यांच्या सहकार्याने कामाचा उरक राहील. व्यवसायात आपल्या योजनांवर विश्वास ठेवा. आर्थिक लाभासाठी व्यवसायाशी संबंधित प्रवास करावा लागेल.  विद्यार्थ्यांचा आज शैक्षणिक उपक्रमांमध्ये रस वाढेल. तुम्हाला तुमच्या शिक्षकांकडून पाठिंबा मिळेल. या सगळ्यात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे स्वतःकडेही लक्ष द्या. वृषभ – नोकरीच्या ठिकाणी सहकारी तुम्हाला चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे विचारपूर्वक पावले उचला. कोणत्याही बाबतीत घाईघाईने निर्णय घेणे टाळा. भावनिक संबंधांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते. त्यांचे कारण शोधून वेळेत उपाय करा. कुटुंबात एखाद्या सदस्याच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.…

Read More

मयुरेश गोखले आज सकाळपासून तिने श्रीरंगचं जाम डोकं खाल्लं होतं… फोनवर तिचा सारखा एकच विषय सुरू होता… “श्री सांग ना रे, आपलं काही चुकत तर नाहीये ना? तुझं ठीक आहे रे, पण माझ्यासारखी मुलगी अशी कशी तुझ्यात गुंतत चालली आहे! का आणि कसं होतंय हे सगळं काही कळत नाहीये! तुझी आठवण खेचतेय मला तुझ्याजवळ! श्री मी वाट तर चुकत नाहीये ना?” त्यांना भेटून जेमतेम वर्ष झाले असेल आणि ती श्रीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. श्रीरंगला सुद्धा ती आवडायला लागली होती. पण आज सकाळपासून तिला काय झालंय काही कळत नव्हतं. फोनवर प्रश्नांचा भडिमार श्रीवर सुरू होता. “मी तुझ्यासोबत वाट तर चुकत…

Read More

मानसी देशपांडे गदिमा अर्थात ग. दि. माडगूळकर यांच्या लेखणीतून साकारलेले अप्रतिम गीत म्हणजे ‘या सुखांनो या…’! गीतकाराचं, कवीचं वैशिष्ट्यच हे असतं की, अशा पद्धतीने लिखाण करणं, जे वाचताना, ऐकताना समोरच्या व्यक्तीला फक्त आणि फक्त सुखाची अनुभूती प्राप्त व्हावी… नेमकं हेच गदिमांनी या गीतातून मांडलं आहे. लेखाची सुरुवात करण्यापूर्वी मला प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांचा हा विचार मनात येतो, “आनंदाच्या ओंजळी कधीच रिकाम्या होत नाहीत, कारण, परत परत भरण्याचे वरदान त्यांना मिळालेले असते…” आपल्या आयुष्यात दु:ख कितीही असले तरी सुखाला निमंत्रण हे प्रत्येकजण देतच असतं. म्हणून गदिमांनी ओळ लिहिली आहे, या सुखांनो या… सुख हे वाटलं की, जास्त आनंद मनाला…

Read More

मुरकूसाठी साहित्य कृती हेही वाचा – Recipe : मलई कोफ्ता आणि शिंगाड्याची भजी… चिडे बनविण्याचे साहित्य हेही वाचा – Recipe :  कारल्याची भाजी अन् कारल्याच्या चकत्या! कृती (‘रुचिरा’ या पुस्तकातून साभार) तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

Read More

डॉ. किशोर महाबळ प्रत्येक बालक अगदी लहान वयापासून, शक्य ते ते स्वतःहून शिकण्याचा प्रयत्न करते. त्याचे आई-वडील सुशिक्षित तसेच पालक म्हणून जबाबदारी ओळखणारे असले तर त्या बालकाचे शिक्षण अधिक चांगले आणि लवकर होते. अतिशय सोप्या पद्धतीने, रंजकतेने हसतखेळत शिकविल्यामुळे शिकलेल्या बाबी बालकाच्या दीर्घकाळ स्मरणात राहतात, हे जसे खरे तसेच शिकण्याचा प्रयत्न करणाऱ्या बालकाला, पालकांनी सातत्याने योग्य वेळी आणि योग्य त्या पद्धतीने प्रोत्साहन दिल्यामुळेही हे शक्य झालेले असते. बालकाला शिकविलेली एखादी कृती, मूळाक्षरे, पशूपक्षी तसेच वस्तूंची माहिती बालकाने नीट आत्मसात केली आहे, हे पालकांच्या – आजी-आजोबा, बहीण-भाऊ यांच्याबरोबरच बालवाडीतील शिक्षिका इत्यादींच्या जेव्हा लक्षात येते, तेव्हा सहसा त्या बालकाचे टाळ्या वाजवून, खाऊ…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा आतां येणें उजिवडें निरुतें । न्याहाळीं पां ऐश्वर्ययोगातें । जे माझां ठायीं भूतें । परी भूतीं मी नसें ॥133॥ अथवा भूतें ना माझां ठायीं । आणि भूतांमाजि मी नाहीं । या खुणा तूं कहीं । चुकों नको ॥134॥ हें सर्वस्व आमुचें गूढ । परि दाविलें तुज उघड । आतां इंद्रियां देउनि कवाड । हृदयीं भोगीं ॥135॥ हा दंशु जंव नये हातां । तंव माझें साचोकारेपण पार्था । न संपडे गा सर्वथा । जेविं भुसीं कणु ॥136॥ एऱ्हवीं अनुमानाचेनि पैसें । आवडे कीर कळलें ऐसें । परि मृगजळाचेनि वोलांशें । काय भूमि तिमे ॥137॥ जे जाळ जळीं…

Read More