Author: Team Avaantar

चंद्रशेखर माधव मी पुण्यात पर्वती परिसरात रहातो. आमच्या इमारतीच्या मागेच पर्वती टेकडी आहे. एकूण परिसर हवेशीर आणि निसर्गरम्य आहे. पण परिसर तसा मोकळा असल्याने पहिल्यापासूनच भुरटे चोर वगैरे येण्याचे प्रमाण जरा जास्त आहे. साधारणपणे 15-16 वर्षांपूर्वीची, म्हणजे 2007-2008मधील घटना असेल. मध्यरात्री पावणेबाराचा सुमार होता. माझ्या घराच्या मागच्या खोलीमध्ये बाहेर जाण्याचा अजून एक दरवाजा आहे. त्या दरवाजाला कडी लावली आहे की नाही, हे पहात असताना माझ्या असं लक्षात आलं की, बाहेरील लोखंडी दरवाज्याला एक माणूस कडी लावत आहे. लक्षात आल्यानंतर मी हळूच पत्नीला खूण करून शांत राहण्याला सांगितलं आणि तिला खुणेनेच सांगितलं की, बाहेर कुणीतरी आहे आणि मी मुख्य दरवाजाने बाहेर…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते, पुन्हा एकदा आलेय तुमच्या भेटीला! वांद्रे येथे संध्याकाळी एक इव्हेंट होता. छान तयार होऊन निघाले होते. म्हटलं, चला कॅब बुक करुयात. पण बुकच होईना! त्यात ‘गुगळीण मावशी’ प्रवासाचा वेळही खूप दाखवत होती. मग उत्तम आणि जलद पर्याय निवडला. रिक्षा केली आणि कांदिवली स्टेशन गाठलं. लोकल ट्रेनमध्ये बसून वांद्र्याला गेले. ट्रेनमध्ये नेहमीचे एंटरटेन्मेन्ट… ‘अय्या तुम्ही’, ‘अमुक एका सीरियलमधलं तुमचं काम’, ‘तुमचा तो शो’, ‘तुमचं दिसणं’ आणि मग सेल्फी… यात वांद्रे कधी आलं ते कळलंच नाही. स्टेशनवरून रिक्षा केली आणि इव्हेंटचं ठिकाण गाठलं. दोन-तीन तास छान गेले. ओळखीची खूप माणसं भेटली. रीफ्रेश झाले आणि घरी यायला निघाले.…

Read More

आराधना जोशी आपल्या आठवणींचं एक मानसशास्त्र असतं. एखादी आठवण ही रंग, गंध, चव, स्थळ, व्यक्ती याच्याशी निगडीत असतेच असते. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला आहे. दुपारी काही कामानिमित्त घराबाहेर पडावं लागलं तर, जीव नकोसा होतो. मात्र याच तळपत्या उन्हात काल अचानक मोगऱ्याचा गंध आला आणि जीव सुखावून गेला, उन्हाच्या झळा जरा कमी झाल्यासारख्या वाटल्या आणि अनेक आठवणींना उजाळा देऊन गेला. होलिकोत्सवाच्या निमित्तानं अनेक घरांमध्ये पुरणपोळ्यांचा बेत आखला जातो. पुरण शिजवण्यापासून ते वाटण्यापर्यंत आणि त्यात वेलची, जायफळ पावडर, केशर, गूळ यांचा जो काही वास घरामध्ये दरवळतो त्याच्याशीही अनेकांच्या आठवणी निगडीत असतील. याच उन्हाळ्यात घरी आणल्या जाणाऱ्या कैऱ्या, आंबे यांच्या वासाशी…

Read More

दिप्ती चौधरी घरातील माणसे 22 एप्रिलला निघणार होती, त्या आधीचे 20 आणि 21 हे दोन दिवस खूप गडबडीत आणि घाईत जाणार होते. प्रवासासाठी करावी लागणारी RTPCR चाचणीसाठी सकाळी लवकरची वेळ आगाऊ घेऊन ठेवली होती. पण तिथेही मोठी रांग लागली होती. आई घरी येऊन आम्हाला आणि दिदीला हॉटेलमध्ये सोडून परत घरी येणार होती, कारण अमेरिकेच्या सामानाची बांधाबांध करायला पॅकर येणार होते. चाचणीला इतका उशीर झाला की, पॅकर येऊन दाखल झाले तरी आम्ही घरी पोहोचलो नव्हतो! धावतपळत घरी पोहोचलो… बॅगा भरून ठेवल्या होत्या आणि कलोनजी येऊन थांबली होती, त्यामुळे आम्हाला पकडून आई हॉटेलमध्ये सोडणार होती. आम्हाला दोघांना एकत्र कुठे घेऊन जायचे तर,…

Read More

हर्षा महाबळ देशपांडे लहानपणी आजीने बक्षीस म्हणून दिलेली रावळगावची गोळी… एखादं चांगलं काम केलं म्हणून आईने लाडाने केलेला शिरा… बाबांची पाठीवर मिळालेली शाबासकी… बहिणीला प्रोजेक्टमध्ये मदत केल्यावर तिच्या डोळ्यात दिसलेली चमक… आपल्यावर टाकलेली एखादी जबाबदारी नीट पार पाडल्यावर शाळेतल्या शिक्षकांकडून मिळणारी कौतुकाची थाप… मैत्रिणीने आपल्यासाठी ओंजळीत आणलेली बकुळीची फुले… आपल्याला आवडतं म्हणून सुट्टीत हॉस्टेलमधून घरी गेल्यावर शेजारच्या काकूंनी करून आणलेली त्यांच्या हातची भाजी… आपल्या लाडक्या ताईसाठी शोधून शोधून आणलेलं पुस्तक तिला देताना तिच्या चेहऱ्यावरचे आनंदी भाव… लहानपणी किती छोट्या छोट्या गोष्टीत आनंद असायचा नाही! खूप महागाची वस्तू बक्षीस मिळण्याचे दिवस नक्कीच नव्हते. न तेव्हा कोणाकडे इतके पैसे खर्चायला असायचे… पण…

Read More

मनोज जोशी विरार ते दादर (ऑफिस) असो किंवा दादर ते विरार (घर) असो, मी शक्यतो स्टॅण्डिंग प्रवास करावा लागणार नाही, हे पाहतो. मग भलेही घरातून लवकर निघावं लागलं तरी बेहत्तर किंवा दादरहून चर्चगेटला जावं लागलं तरी, तसं मी करतो. वृत्तपत्रात काम करताना हा प्रश्न फारसा भेडसावत नसे. कारण दुपारची गाडी पकडायची… तीही शक्यतो दादर आणि येताना रात्री 12.20 किंवा 12.40 गाडी पकडली की, बसायला मिळत होते. तरीही जरा लवकर गेलो तर, एखादी बोरिवली किंवा भाईंदर लोकल पकडायची आणि कांदिवलीला उतरायचे. त्यानंतर येणारी विरार लोकल पकडायची. जेणेकरून दादर ते कांदिवलीचा प्रवास छान बसून व्हायचा आणि विरार ट्रेनमध्ये बहुतांश वेळा बोरिवलीला बसायला…

Read More

मानसी देशपांडे “पार्टनर…” नावातच सारं काही सामावलेलं आहे. सोळा संस्कारांपैकी एक संस्कार असलेल्या विवाहामुळे दोन कुटुंबं एकत्र येतात. आयुष्याचे सार समजावणाऱ्या व.पु. काळे यांनी पार्टनर किंवा जोडीदार या विषयावर खूप प्रेरक असे लिखाण केले आहे. माणूस म्हटलं की चूक ही आलीच, पण तीच चूक चारचौघात न सांगता, तिथे त्या चुकीचा ऊहापोह न करता जी एकांतात समजावून सांगणारी व्यक्ती म्हणजे पार्टनर… मुळात प्रेमविवाह असो किंवा ठरवून झालेला विवाह असो, त्यामध्ये प्रेम असणे महत्त्वाचं नाही का!! कारण, व.पुं.च्या मते “प्रेम केल्यानेच प्रेम समजतं.” सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्याजवळ मनाची श्रीमंती असते तो श्रेष्ठ. कारण, विवाह ही एक मोहरून टाकणारी अनुभूती असते. त्यामुळे प्रत्येक…

Read More

संगीता भिडे (कमल महाबळ) साधारण 1958-59ची घटना आहे. माझं वय तेव्हा 9-10 वर्षांचं. आमचं वास्तव्य भुसावळ येथे एका चाळीत. चाळीत कोणालाच घराची दारं बंद ठेवायची सवय नव्हती. चाळीत अठरापगड जाती… पण नाती अशी की जणू एकाच कुटुंबातली माणसं आहेत. तो दिवस बैल पोळ्याचा होता. हा सण खान्देशात फारच थाटामाटात साजरा केला जातो. बैलांनाही शेतकरी खूप सजवतात, त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. दुपारी बारा-साडेबाराची वेळ होती. आई गरम गरम पुरणपोळ्या आम्हाला (माझे वडील, मी आणि माझे दोघे धाकटे भाऊ) वाढत होती. आम्ही आस्वाद घेऊन पोळ्यांवर ताव मारत होतो. तेवढ्यात दाराशी एक कर्कश्श पण केविलवाणा आवाज आला. ‘ओ माय, ओ ताई, आज सणाचा…

Read More

अर्चना कुलकर्णी दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिरमध्ये मी नोकरी केली. संस्थेच्या अकरा शाळा होत्या. आमचे स्वतंत्र तांत्रिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय 1994मध्ये सुरू झाले. सुरुवातीला संस्थेतील इतर शाळांच्या वाचनालयातून विद्यार्थी तसेच शिक्षकांना पुस्तके मिळत होती. 2005मध्ये मी मुख्याध्यापिका झाले. 2006पासून आमच्या विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी वाचनालयाची सुविधा काही कारणाने बंद करावी लागली. तांत्रिक विद्यालयाचे विद्यार्थी तसेच कर्मचारी पुस्तकांपासून वंचित राहू लागले. तंत्र व उच्च शिक्षण विभागाच्या नियमांच्या चौकटीत तांत्रिक विद्यालयासाठी स्वतंत्र लायब्ररीयन पदाला मान्यता नव्हती. त्यामुळे वाचनालय आणि लायब्ररीयन हे दोन मोठे प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाले. कुठून तरी छोटीशी का होईना सुरुवात केली पाहिजे, हा विचार आमच्या विभावरी दामले आणि हर्षदा…

Read More

चंद्रशेखर माधव पुण्यात पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मी मास्टर इन कॉम्प्युटर मॅनेजमेंटला प्रवेश घेतला. एकदमच वातावरण बदलल्यामुळे सुरुवातीचे दोन-तीन महिने जरा जड गेले. पण नंतर मात्र मी नवीन ठिकाणी रुळलो. प्रथम वर्ष सहजगत्या फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. बघता बघता दुसरे वर्ष संपत आले. आमच्या प्रोजेक्टच्या इंटर्नल प्रेझेंटेशनची तारीख जवळ आली. प्रेझेंटेशनकरिता कॉलेजने आम्हाला फिकट निळ्या रंगाचा ब्लेझर आणि काळी पॅन्ट असा पोशाख करायला सागितलं होतं. कॉलेजनेच रविवार पेठेतला एक टेलर पाहून ठेवला होता. त्या टेलरकडे जाऊन पैसे देऊन माप देणे आणि ब्लेझर तसेच पॅन्ट शिवून घेणे, असा कार्यक्रम आम्हाला करायचा होता. पण खरी समस्या वेगळीच होती. या सर्व प्रकाराला सुमारे…

Read More