Author: Team Avaantar

पराग गोडबोले नेहमीप्रमाणेच रविवार उजाडला आणि न्याहारी आणण्यासाठी बाहेर पडलो, कारण बायकोला अतोनात कंटाळा आला होता, सकाळी उठून काही करायचा. काय आणायचं? इडली, वडे, डोसे, खिचडी, उपमा आदी पदार्थ खाऊन कंटाळा आला होता म्हणून म्हटलं, आज अप्पम आणू. डोंबिवलीला, नेहरू मैदानाच्या प्रवेशद्वारासमोर अगदी छान अप्पम मिळतो. पोहोचलो तिथे, नेहमीप्रमाणे गर्दीत उभा राहिलो आणि समोर बघतो तर काय… पलीकडच्या बाजूला अगदी ठसठशीतपणे लिहिलेली, ‘दडपे पोहे’ अशी पाटी दृष्टीस पडली. चाळवली गेली जिज्ञासा माझी आणि रस्ता ओलांडून पलीकडे गेलो पटकन! असे दडपे पोहे विक्रीला ठेवलेले पहिल्यांदाच अनुभवत होतो. जामानिमा नव्हता जास्त. एक छोटंसं टेबल… त्यावर पोह्यांचं भांडं आणि शेजारी दुसऱ्या टेबलावर कप्पे…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पहिला हे आदिपुरुषाची माया । ब्रह्मेयाहि नयेचि आया । म्हणऊनी भुलविला ऐकें राया । संजयो म्हणे ॥203॥ अवधारीं मग तो अर्जुनु । देखोनि सकळ स्वजनु । विसरला अभिमानु । संग्रामींचा ॥204॥ कैसी नेणों सदयता । उपनली येथे चित्ता । मग म्हणे कृष्णा आता । नसिजे एथ ॥205॥ माझें अतिशय मन व्याकुळ । होतसे वाचा बरळ । जे वधावे हे सकळ । येणें नांवें ॥206॥ निमितानि च पश्यामि विपरीतानि केशव । न च…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 11 ऑगस्ट 2025; वार : सोमवार भारतीय सौर : 20 श्रावण शके 1947; तिथि : द्वितीया 10:33; नक्षत्र : शततारका 13:00 योग : अतिगंड 21:33; करण : वणिज 21:39 सूर्य : कर्क; चंद्र : कुंभ 30:09; सूर्योदय : 06:18; सूर्यास्त : 19:09 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 श्रावणी सोमवार शिवामूठ : मूग वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आपल्या कामाबाबत आणि दृष्टीकोनाबाबत प्रामाणिक राहा. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. सामाजिक आयुष्यापेक्षा…

Read More

संगीता भिडे (कमल महाबळ) साधारण 40-50 वर्षांपूर्वी माझे वडील यशवन्त जनार्दन महाबळ यांचा ‘Whom to call Daddy’ या शीर्षकाचा Mirror नावाच्या एका सुप्रसिद्ध इंग्रजी मासिकांत लेख आला होता. त्याचे स्वैर नाट्य रूपांतर करण्याचा मी प्रयत्न केला आहे. साधारण वयाच्या पाचव्या वर्षापासून अनेक प्रश्नांचं कुतुहल लहान मुलांच्या मनांत उभं राहतं. नानाविध प्रश्न विचारून आई-वडिलांसह अनेकांना भंडावून सोडतात. उत्तरे फारच अल्पांशाने मिळतात. मग ती अन्यत्र मित्र-मैत्रीणीकडे उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करतात. पालकांकडून बहुतांशी ‘गप्प बस’ एवढंच उत्तर दिलं जात. त्याचाच हा मासला. (सकाळी 8-8.30ची वेळ. बाबा आरामखुर्चीत बसून वर्तमानपत्र वाचत आहेत. जवळच सोनाली (वय अंदाजे 5 ते 9 वर्षे) भातुकली खेळण्यात दंग आहे.…

Read More

सतीश बर्वे “काका तुम्ही वेळ कसा घालवता रोज?” माझ्या एका तरुण मित्राने मला विचारले होते मेसेज करून. मी त्याला माझ्या भाषेत उत्तर देऊन टाकले. “मित्रा, ‘काय करायचं?’ हा प्रश्न मी आजवर विचारायची संधी स्वतःला दिली नाही. मी निवृत्त जरूर झालोय. पण तो फक्त नोकरीतून. जगण्यातून नाही, वागण्यातून नाही… आणि विचारातून तर नाहीच नाही!” “घरातील तुझं कपाट आवरायला घेतलं तरी, त्यातील प्रत्येक खण आणि त्यातील सांभाळून ठेवलेल्या वस्तू तुला पार भूतकाळात घेऊन जातात. त्या प्रत्येक वस्तूची अशी एक गोष्ट असते. त्यावर आपल्या कितीतरी आठवणी दुधाच्या सायीसारख्या चिकटलेल्या असतात. तरुणपणीच्या त्या मखमली कालखंडाची तुम्हाला अगदी घरबसल्या सैर घडवून आणतात. माझ्या आईवडिलांचे काही…

Read More

प्राजक्ता अनंत काथे (ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड) मेष या आठवड्यात नोकरदारांना अधिक जबाबदारीची कामे येऊ शकतात. त्या कामांसोबत यशाची संधी मिळण्याची शक्यता आहे. संधीचा उपयोग करण्यासाठी वेळेचे नियोजन करा. आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. महिलांनी मानसिक प्रसन्नता टिकवण्यास प्राधान्य द्यावे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता ठेवावी लागेल. शक्यतो प्रवास टाळावा. वृषभ या आठवड्यात व्यावसायिक लोकांना आर्थिक फायदा संभवतो. त्यामुळे नवीन क्षेत्रात प्रवेश करू शकाल. आपल्या प्रियजनांसाठी खर्च करावा लागेल. घरातील जेष्ठ व्यक्तींची काळजी घ्यावी. महिला कलात्मक दृष्टिकोनातून विषयांची मांडणी करतील आणि महिला मंडळात नाव कमवू शकाल. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल. करिअरशी संबंधित प्रवास होऊ शकतो. मिथुन या आठवड्यात नोकरदारांना वरिष्ठांकडून जास्त काम…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पहिला दृष्ट्वेनं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थिताम् ।।28॥ सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति । वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ।।29।। गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक् चैव परिदह्यते । न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ॥30॥ तो म्हणे अवधारीं देवा । म्यां पाहिला हा मेळावा । तंव गोत्रवर्गु आघवा । देखिला एथ ॥193॥ हे संग्रामीं अति उद्यत । जाहाले असती कीर समस्त । पण आपणपेयां उचित । केवीं होय ॥194॥ येणें नांवेंचि नेणों कायी…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 10 ऑगस्ट 2025; वार : रविवार भारतीय सौर : 19 श्रावण शके 1947; तिथि : प्रतिपदा 12:10; नक्षत्र : धनिष्ठा 13:52 योग : शोभन 24:01; करण : तैतील 23:24 सूर्य : कर्क; चंद्र : कुंभ; सूर्योदय : 06:17; सूर्यास्त : 19:09 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 आदित्य पूजन हेही वाचा – Ayurveda : आदान काल आणि विसर्ग काल वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष जनरल अरुणकुमार वैद्य टीम अवांतर भारताचे दहावे लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचा जन्म अलिबाग येथे…

Read More

डॉ. सारिका जोगळेकर आपले शरीर फक्त हाडं, स्नायू आणि अवयवांनी बनलेलं नाही – त्यामागे एक सूक्ष्म, पण अत्यंत प्रभावी अशी शक्ती असते, ती म्हणजे प्राणशक्ती (VITAL FORCE). ही शक्ती आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला कार्य करण्याची ऊर्जा देते, त्यामुळे सर्व क्रियाशीलता नियंत्रित राहते. आपल्या हृदयाचे ठोके, श्वासोच्छ्वास, पचनक्रिया, रोगप्रतिकारक शक्ती आणि एकूणच शरीरातील समतोल राखण्याचे कार्य ही प्राणशक्ती (vital force) करते. Vital force ही संकल्पना होमिओपॅथीमध्ये मूलभूत मानली जाते. होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमॅन यांनी vital force ही संकल्पना मांडली होती. निरोगी असणं म्हणजे नेमकं काय? आरोग्य म्हणजे शांत प्राणशक्तीचे संगीत. जेव्हा ते सुरेल असते तेव्हा शरीर निरोगी असते. “जेव्हा आपले…

Read More

रविंद्र परांजपे मागील लेखात आपण मानसिक ताणतणावाबद्दल सविस्तर माहिती घेतली. ताणतणाव संज्ञा लक्षात येण्यासाठी आपण उदाहरण घेऊन सारख्याच परिस्थितीतील दोन व्यक्तींच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहिल्या. यावरून आपल्या नक्कीच लक्षात आले असेल की, मानसिक ताणतणाव व्यक्तिसापेक्ष आणि परिस्थितीजन्य असतो. म्हणून मानसिक ताणतणाव ही वैयक्तिक बाब म्हणता येईल. या लेखात आपण मानसिक ताणतणाव निवारणाची गरज जाणून घेणार आहोत. परंतु हे जाणून घेण्यापूर्वी आपणास मानसिक ताणतणावाचे स्वरूप समजून घ्यायला हवे. मानसिक ताणतणावाचे स्वरूप ताणतणावांची व्याप्ती विशाल असून प्रत्येक व्यक्तीला आयुष्यातील विविध घटनांना सामोरे जाताना वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक तसेच व्यावसायिक पातळ्यांवर मानसिक ताणतणाव अनुभवास येतात. ताण दोन प्रकारचे असतात – 1. लाभदायक ताण, 2. दुःखदायक…

Read More