Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
अनिता बाळकृष्ण वैरागडे मागील लेखात आपण काही आसनं आणि त्याचे फायदे बघितले होते. आता या लेखात आणखी काही आसनं आणि त्याचे फायदे पाहुयात. अर्ध हलासन अर्ध हलासन करताना पाठीवर सरळ झोपायचे. दोन्ही हात कमरेच्या बाजूला, तळवे जमिनीवर ठेवायचे. दोन्ही पाय हळूहळू वर उचलताना दीर्घ श्वास घ्यायचा आणि काही सेकंद थांबून हळूहळू श्वास सोडत पाय जमिनीवर ठेवायचे. फायदे – शरीराची लवचिकता वाढते, श्वसनक्षमता वाढते. पोटाची कार्यक्षमता वाढते. पूर्ण हलासन हलासन हे प्रचलित आसन असले तरी त्याचा उल्लेख हठयोगाच्या कुठल्याच ग्रंथात नाही. 150 वर्षांपूर्वी जयतराम लिखित ग्रंथात ‘हालीपाव आसन’म्हणून वर्णन मिळते जे थोडेफार सध्याच्या हलासनाशी जुळते. त्यामुळे हलासन हे 150 वर्षांपूर्वी शोधले…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पहिला एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन । अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते॥35॥ हे वरी भलतें करितु । आतांचि एथें मारितु । परि आपण मनें घातु । न चिंतावा ॥225॥ त्रैलोक्यींचें अनकळित । जरी राज्य होईल एथ । तरी हें अनुचित । नाचरें मी ॥226॥ जरी आजि एथ ऐसें कीजे । तरी कवणाचां मनीं उरिजे । सांगे मुख केवीं पाहिजे । तुझें कृष्णा ॥227॥ निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन । पापनेवाश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः ॥36॥ जरी…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 13 ऑगस्ट 2025; वार : बुधवार भारतीय सौर : 22 श्रावण शके 1947; तिथि : चतुर्थी 06:36, पंचमी 28:33; नक्षत्र : उत्तर भाद्रपदा 10:32 योग : धृती 16:05; करण : कौलव 17:30 सूर्य : कर्क; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:18; सूर्यास्त : 19:07 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामाच्या ठिकाणी काही बदल दिसायला लागतील, त्यामुळे मन थोडे अस्वस्थ राहील. याशिवाय सहकाऱ्यांवरचा ताणही वाढेल. परंतु तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने…
चंद्रशेखर माधव तसं म्हणायला गेलं तर मला दोन मामा-मामी. पण कायम आठवण यावी आणि आवर्जून उल्लेख करावा अशी मामी एकच ‘मालती मामी’. दुसऱ्या मामा, मामीकडे आमचं येणं-जाणं होतं, नाही असं नाही. पण का कुणास ठाऊक, माझ्या मनाला तिथे कधीच स्वस्थता लाभली नाही. आमची मालती मामी म्हणजे प्रचंड उत्साह असलेली आणि अखंड काम करणारी व्यक्ती. माझी शाळा मामाच्या घरापासून खूपच जवळ होती. त्यामुळे रोज शाळा सुटली की, धावत रस्ता पार करून मामाकडे जायचं, हा ठरलेला कार्यक्रम होता. सुरुवातीच्या काळात प्राथमिक शाळेत असताना आई घ्यायला यायची. आई येईपर्यंत मामाकडेच बसायचं. माझी शाळेतून यायची वेळ झाली की, मामी रोज काही ना काही खायला…
सतीश बर्वे ह्यांच्या इच्छेनुसार त्यांचे सगळे दिवसकार्य घरच्या घरी छोट्या प्रमाणात केले आणि उरलेली रक्कम आलोकने त्यांच्या आवडीच्या संस्थेला शैक्षणिक मदत म्हणून दान दिली. एक आलोक सोडला तर, मुक्कामाला कोणी पाहुणे मंडळी अशी नव्हतीच. घरातला मुख्य श्वास कायमचा थांबला होता. आता हळूहळू ते अंगवळणी पडणार होतं. आलोक होता म्हणून मग मी तेव्हाच बॅंकेची कामं उरकून घेतली. जेणेकरून मला बॅंकेतून पैसे काढता येतील. इतकी वर्षे हेच सगळं बघत आले होते. पैसे मागितले की, हातावर मिळत होते दर महिन्याच्या अगदी ठरलेल्या दिवशी. मला एकटीला ते कदाचित जमलं नसतं. ह्यांच्या बाकीच्या गुंतवणुकीची माहिती मुद्देसूद लिहिलेली वही मी आलोकच्या ताब्यात दिली होती. तो परत…
शीला जोशी साहित्य पडवळ – अर्धा किलो फोडणीसाठी तेल, मोहरी, एक छोटा चमचा हिंग सारणासाठी ओलं खोबरं – एक मोठी वाटी बेसन (चण्याचं पीठ) – अर्धी मोठी वाटी कोथिंबीर – अर्धी मोठी वाटी हळद – अर्धा टी-स्पून तिखट – दोन टी-स्पून गोडा मसाला – एक टेबलस्पून मीठ – चवीनुसार साखर – थोडीशी पुरवठा संख्या (Servings) : 4 जणांसाठी तयारीस लागणारा वेळ : 15 मिनिटे शिजवण्याचा वेळ : 10 मिनिटे एकूण वेळ : 25 मिनीटे कृती पडवळ स्वच्छ धुवून पुसून घ्या. नंतर त्यांची सालं काढून टाका. सोललेल्या पडवळाचे जवळपास एक इंच लांबीचे तुकडे करून त्याच्या आतील बिया आणि इतर गर…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पहिला तरी आम्हीं कां जन्मावें । कवणालागीं जियावें । जें वडिलां यां चिंतावें । विरुद्ध मनें ॥214॥ पुत्रातें इप्सी कुळ । तयाचें कायि हेंचि फळ । जे निर्दाळिजे केवळ । गोत्र आपुले ॥215॥ हें मनींचि केविं धरिजे । आपण वज्राचेयां बोलिजे । वरी घडे तरी कीजे । भलें एयां ॥216॥ आम्हीं जें जें जोडावें । तें समस्तीं इहीं भोगावें । हे जीवितही उपकारावें । काजीं यांचां ॥217॥ आम्ही दिगंतीचे भूपाळ । विभांडूनि…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 12 ऑगस्ट 2025; वार : मंगळवार भारतीय सौर : 21 श्रावण शके 1947; तिथि : तृतीया 08:40; नक्षत्र : पूर्व भाद्रपदा 11:51 योग : सुकर्मा 18:53; करण : बव 19:39 सूर्य : कर्क; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:18; सूर्यास्त : 19:08 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 अंगारक संकष्ट चतुर्थी – चंद्रोदय 09:17 मंगळागौरी पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही…
प्रदीप केळुसकर उषाताईंचं आत-बाहेर सुरू होतं. आज मार्गशीर्ष चौथा गुरुवार मागील तीन गुरुवारी व्रत पाळले. आज पूजा करून उद्यापन करायचे म्हणून धावपळ. त्यांचा चाळीतला दोन खोल्यांचा संसार, बाहेरची खोली त्या स्वयंपाकासाठी वापरत. आतली खोली बेडरुम. जयवंतराव सकाळी सहा वाजता निघत. सहा वाजून दहा मिनिटांची बस पकडली की, वीस मिनिटांत लालबाग. जयवंतराव दिग्विजय मिलमध्ये नोकरीला होते. सकाळी आठची ड्युटी. सायंकाळी सातला सुटत. वेळ असला तर लालबागला गणेश गल्लीतील बेलवलकर सोनारांच्या दुकानात थांबत. बेलवलकर जयवंतरावांचे खास मित्र. दोघांना वाचनाचा आणि नाटकाचा छंद. वाचलेल्या पुस्तकांची चर्चा करणे, पुस्तकांची अदलाबदल करणे आणि शेजारी मिळणारे थंडगार पियुष पिणे. अधुनमधून चांगल्या नाटकाला जाणे. आज सुद्धा जयवंतराव…
रश्मी परांजपे भाग – 1 मागील लेखात आपण पूर्व-प्राथमिक शालेय प्रवेशाची पूर्व-तयारी अभ्यासली. शाळेत प्रवेश जरी आपल्या मुलासाठी घेतला असला, तरी पालक या नात्याने आपली खरी परीक्षा सुरू होते. आता आपण या आणि पुढील लेखांमधे शाळा प्रवेशानंतरची पालकांची जबाबदारी काय असते, या विषयाच्या निवडक मुद्द्यांवर ऊहापोह करणार आहोत. पालकांची जबाबदारी : काही निवडक मुद्दे पालकांची मानसिक तयारी आपलं बाळ आता शाळेत जाणार, इतके दिवस चोवीस तास आपल्याबरोबर असलेलं आपलं बाळ आता दिवसातील दोन-तीन तास आपल्यापासून लांब असणार, या दुराव्याच्या कल्पनेनेच आईचा जीव कासावीस होतो. शाळेच्या सुरुवातीच्या काही दिवसांत तर मुलाला शाळेत सोडल्यावर आईच रडवेली होते. शिवाय मुल रडायला लागलं की,…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 247
- अवांतर 174
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 361
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 509
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

