Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 04 सप्टेंबर 2025; वार : गुरुवार भारतीय सौर : 13 भाद्रपद शके 1947; तिथि : द्वादशी 28:07; नक्षत्र : उत्तराषाढा 23:43 योग : सौभाग्य 15:20; करण : बव 16:19 सूर्य : सिंह; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:23; सूर्यास्त : 18:51 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वामन जयंती वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस आनंदाचा असेल. एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. आर्थिक लाभाच्या संधी वाढतील. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल, त्यामुळे मनोबल वाढेल. नवीन नोकरीच्या…

Read More

दतात्रय पांडुरंग मानुगडे भाग – 3 या साहित्य क्षेत्रामध्ये कशी आणि कोणती माणसे भेटतील, हे काही सांगता येत नाही. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यामुळे मी रेल्वे क्वॉर्टर्समध्ये थांबलो आणि आई सकाळच्या पॅसेंजरने माझ्याकडे कराडला आली. मी उठून आंघोळ करत होतो, तेवढ्यात आईने हाक मारली. “काय करायला लागला आहेस?” आईनं विचारलं. आईचा आवाज ऐकून मी म्हणालो, “अगं, घरी आहे… आंघोळ करतोय…” मी भराभर अंग पुसून घेतले… तोपर्यंत आईने स्टोव्हवर चहा ठेवला. कपडे घालून मी चहा पिऊ लागलो तेवढ्यात आई म्हणाली, “दोन दिवस झाले सुट्टी होती, गावाकडे का आला नाहीस?” “काल मिरजेच्या दर्ग्याला गेलतो नवीन काही साहित्य मिळते का पाहायला…” “ते लिवनं बंद…

Read More

सुनील शिरवाडकर आठ-दहा वर्षांचा गजू…. आमच्या शेजारीच रहायचा. एकदा तो त्याच्या बाबांच्या मागेच लागला, “मला पण तुमच्याबरोबर यायचंय… दुकानात! मी त्रास नाही देणार… नुसता बसून राहीन…” गजूचे बाबा एका चहाच्या दुकानात काम करायचे. चहाच्या दुकानात म्हणजे चहा पावडर विकणाऱ्या दुकानात. तेथे ते सेल्समन होते. ते घरी आले तरी त्यांच्या शर्टला चहाचा वास यायचा… गजूला तो वास खूप आवडायचा. तो वासच आवडायचा असं नाही, तर गजूला बाबांचा तो शर्ट पण आवडायचा. जाड पिवळ्या कापडाचा तो शर्ट… खिशावर त्या दुकानाचा लोगो… एकदा तर गजूने घरात कुणी नसताना तो शर्ट घालूनही पाहिला होता. खूपच मागे लागल्याने बाबांनी ठरवलं… आज गजूला दुकानात घेऊन जायचं……

Read More

कामिनी व्यवहारे पंचामृत म्हणजे पाच प्रकारच्या अमृताचे मिश्रण. आयुर्वेदात दूध, दही, तूप, मध आणि साखर यांच्या मिश्रणाला पंचामृत म्हणतात. आपल्याकडे सणासुदीला पूजेच्या निमित्ताने पंचामृत बनवले जाते. पूजेदरम्यान पंचामृत देवाला दाखवून मग ते तीर्थ म्हणून दिले जाते. पण आपण पंचामृत पण गोड नव्हे तर, तिखट कसे बनवले जाते, ते जाणून घेऊया. साहित्य खोबरे काप – अर्धी वाटी तिळाचे कुट – छोटी अर्धी वाटी दाणे कुट (भरड) – छोटी अर्धी वाटी हिरव्या मिरच्या – 7 ते 8 (मिरच्यांचे थोडे मोठे तुकडे करून ठेवावेत) काजू – 8 ते 10 किसलेला किंवा बारीक केलेला गुळ – अर्धी वाटी गोडा मसाला (काळा) – 2 चमचे…

Read More

अनिता बाळकृष्ण वैरागडे मागील लेखामध्ये खाली बसून करावयाची काही आसने आणि त्यांचे फायदे बघितले होते. आता या लेखात आणखी काही आसने आणि त्यांचे फायदे जाणून घेऊयात. दंडासन दंडासन करताना पाय सरळ पुढे करून बसायचे. दोन्ही पायांची बोटे वाकवून तुमच्याकडे ताणून ठेवा. हात शरीराच्या दोन्ही बाजूंनी समांतर ठेवून पंजे जमिनीवर ठेवायचे. पाठीचा कणा सरळ ठेवायचा. नजर समोर ठेवून आणि आपला श्वासही सामान्य ठेवायचा. फायदे : तुमचा मेंदूही इतर योगासनांप्रमाणे निरोगी राहतो. या मुद्रेच्या नियमित सरावाने स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलचे प्रमाण कमी होते. पाठीचे आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात. सर्व आसनांचा तयारी म्हणून अत्यंत उपयोगी आहे. भद्रासन भद्रासन करताना दोन्ही पाय गुडघ्यात…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अध्याय दुसरा एषाऽतेभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु । बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि ॥39॥ हे सांख्यस्थिति मुकुलित । सांगितली तुज एथ । आतां बुद्धियोगु निश्चित । अवधारीं पां ॥230॥ जया बुद्धियुक्ता । जाहालिया पार्था । कर्मबंधु सर्वथा । बांधू न पावे ॥231॥ जैसे वज्रकवच लेइजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे । परी जैतेंसीं उरिजे । अचुंबिता ॥232॥ नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते । स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ॥40॥ तैसें ऐहिक तरी न नशे…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 03 सप्टेंबर 2025; वार : बुधवार भारतीय सौर : 12 भाद्रपद शके 1947; तिथि : एकादशी 28:21; नक्षत्र : पूर्वाषाढा 23:07 योग : आयुष्मान 16:16; करण : वणिज 16:12 सूर्य : सिंह; चंद्र :  धनु 29:20; सूर्योदय : 06:23; सूर्यास्त : 18:51 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 परिवर्तिनी एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस सामान्य राहील. धार्मिक कार्यात रस वाढेल. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात, कामाच्या ठिकाणी तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. संततीकडून चांगली…

Read More

अस्मिता हवालदार प्रभाकर पेंढारकर यांची ‘रारंग ढांग’ ही लहानशी कादंबरी मी बऱ्याच वर्षांपूर्वी वाचली होती. एका बैठकीत वाचता येईल अशी! याला दोन कारणं आहेत, एकतर ही कादंबरी लहान आहे आणि कादंबरीला खूप वेग आहे. हिमालयात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये रस्ते बांधण्याच्या लष्करी कामासाठी विश्वनाथ मेहेंदळेला नोकरी मिळते. इंजिनीअर झालेला हा तरुण मुंबईतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून नव्या साहसिक नोकरीसाठी, कामासाठी उत्सुक असतो. त्याचे वडील खेड्यात शिक्षक असतात. ते विश्वनाथला लिहितात की, “हिमालयात तुला स्वतःशी बोलायला वेळ मिळेल. स्वतःचा शोध घेण्यासाठी वेळ वापर.” लष्करातली शिस्त, कायदे यांची ओळख हळूहळू विश्वनाथला होत असते. कधी मनावर ओरखडे उठत राहतात तर, कधी डोळ्यात कौतुक…! ही…

Read More

सतीश बर्वे बंगलोर विमानतळाच्या बाहेर पडल्यावर मुक्ताने म्हणजे माझ्या मुलीने दिलेला व्यंकटेशचा नंबर मी डायल करणार इतक्यात मोबाइलच्या स्क्रीनवर तो मला फोन करत असल्याचा मेसेज अवतरला. दोन क्षण गेल्यावर रिंग वाजली. मी फोन कानाला लावून ‘हॅलो’ म्हणालो. “आजोबा मी व्यंकटेश…” समोरून नातवाचा आवाज ऐकला. जवळपास वीसेक वर्षांत मी त्याचा आवाज ऐकला नव्हता. मी नेमका कुठे उभा आहे ते मी व्यंकटेशला सांगितले. “आजोबा मी तुम्हाला लोकेट केलं आहे. तिथेच थांबा. मी गाडी घेऊन येतो तिथे…” शेवटचं बघितलं होतं व्यंकटेशला, तेव्हा तो शाळेत होता. मुक्तासोबत मुंबईला आला होता लग्न समारंभासाठी. त्यानंतर आज दिसणार होता. मी आठवणीत रेंगाळत असताना तो कधी समोर येऊन…

Read More

सायली कान्हेरे सकाळच्या नाश्त्यासाठी कांदेपोहे, उपमा, साबुदाण्याची खिचडी असे पदार्थ बहुतांश ठिकाणी केले जातात. त्यातही, पोह्यांना विशेष पसंती असते. पोहे देखील अनेक पद्धतीने केले जातात. कोळाचे पोहे हा कोकणातला एक पारंपरिक पदार्थ आहे. कोकण म्हटल्यावर नारळ मुबलक प्रमाणात… त्यामुळे हे पोहे करताना नारळाच्या दुधाचा वापर केला जातो. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. अनेक घरांमध्ये सणासुदीला कांदा, लसूण खात नाहीत. त्यामुळे या काळात हा पदार्थ घरात नाश्त्यासाठी करता येऊ शकतो. हा पदार्थ जरा हटके आहे आणि खूप चविष्ट लागतो. आंबट, गोड, तिखट चवीचे कोळाचे पोहे नक्की करून बघा. साहित्य जाडे पोहे – 3 वाट्या नारळ – 1 हिरव्या मिरच्या – 2 सुक्या…

Read More