Thursday, July 31, 2025

banner 468x60

Homeललितधुंद होऊनी गीत अनामिक...

धुंद होऊनी गीत अनामिक…

प्रमोद मनोहर जोशी

मधुगंधित करिसी सखये तू गं
वेणीवरती फूल माळता
धुंद होऊनी गीत अनामिक
ओठी मम ये तुझीयाकरिता II धृ II

जरी मोगरा उरात सलतो
रुळलेला तव वेणीवरती
हेच जाण गं हेवा नच हा
माझी तुजवर अक्षय प्रीती
गंध प्रीतीचा येई बहरूनी
शुभ्र मोगरा केशी हसता
धुंद होऊनी गीत अनामिक
ओठी मम ये तुझीयाकरिता II 1 II

वसे मोगरा तव वेणीवर
जीवच माझा तेथे गुंते
धवल फुल अन काळे कुंतल
मज समजेना नाते कोणते
फुल गुंतले तुझीया केशी
तुझ्या नि माझ्या प्रीतीकरिता
धुंद होऊनी गीत अनामिक
ओठी मम ये तुझीयाकरिता II 2 II

कचपाशाची जुई गमे मज
सखी तुझी ती जणू धाकटी
घनतमीच जी उजळे जैसी
शुक्र चांदणी गोरी गोमटी
नाजूक जुईचा नखरा केशी
विद्ध बाण मम हृदयाकरिता
धुंद होऊनी गीत अनामिक
ओठी मम ये तुझीयाकरिता II 3 II

संयम माझा सुटू पाहतो
जेव्हा तू जवळी गं असते
शपथ फुलांची तुला सांगतो
सीमा उल्लंघावी वाटते
परी परंतु मागे फिरतो
सात्विक सुंदर प्रेमाकरिता
धुंद होऊनी गीत अनामिक
ओठी मम ये तुझीयाकरिता II 4 II

हरवून जातो बघताना गं
स्वरूप सुंदर तुझी छबी
तुला पाहता लाजून जाईल
पौर्णिमेचा तो चंद्र नभी
आकाशातील ताराफुलेही
तरसतील तव वेणीकरिता
धुंद होऊनी गीत अनामिक
ओठी मम ये तुझीयाकरिता II 5II


मोबाइल – 9422775554 / 8830117926

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!