Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeफूड काॅर्नरRecipe : आवळ्याचे रसम

Recipe : आवळ्याचे रसम

यशःश्री जोशी

बाजारात सध्या ताजे, रसरशीत आवळे मोठ्या प्रमाणात येत आहेत. थंडीत रात्रीच्या जेवणासाठी याच आवळ्यापासून तयार केलेले गरमागरम रसम आणि भात हा बेत एकदा करून बघा. आवळ्याचे सूप म्हणून देखील या पदार्थाचा आस्वाद घेता येतो.

साहित्य

  • काळी मिरी – 10 ते 15 दाणे
  • जिरे – 1 टीस्पून + फोडणीसाठी अर्धा टीस्पून
  • आलं – 1 इंच
  • लसूण – 3 ते 4 पाकळ्या
  • स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आवळे – 5 मोठे
  • टोमॅटो – 2 मध्यम आकाराचे
  • तेल – 1 टेबलस्पून
  • मोहरी – अर्धा टीस्पून
  • हिंग – चिमूटभर
  • कढीलिंब (कढीपत्ता) – 10 ते 12 पाने
  • हळद – अर्धा टीस्पून
  • शिजवून, घोटून घेतलेली तूरडाळ किंवा मूगडाळ – 1 वाटी
  • पाणी – 4 ते 5 वाट्या
  • मीठ – चवीनुसार
  • बारीक चिरलेली कोथिंबीर – आवडीनुसार

पुरवठा संख्या : 4 व्यक्तींसाठी

तयारीस लागणारा वेळ : 10 मिनिटे

शिजवण्याचा वेळ : 10 मिनिटे

एकूण वेळ : 20 मिनिटे

हेही वाचा – Recipe : पालकाचे थालिपीठ

कृती

  1. मिक्सरच्या भांड्यात काळी मिरी, जिरं, आलं आणि लसूण पाकळ्या घालून पाणी न घालता सगळं जाडसर वाटून घ्या.
  2. आता हा मसाला एका वाटीत काढून बाजूला ठेवा.
  3. मिक्सरच्या मसाला वाटलेल्या भांड्यात 4 आवळ्यांचे तुकडे आणि अर्धा टोमॅटो चिरून बारीक वाटून घ्या.
  4. कढईत 1 टेबलस्पून तेल गरम करून मग त्यात हिंग, मोहरी घाला. मोहरी तडतडली की, मग कढीलिंब घाला.
  5. कढीलिंब तेलात थोडासा परतून झाला की, काळी मिरी, जिरं वगैरेचा जो मसाला वाटून घेतला होता तो घाला.
  6. मसाल्यातील आलं आणि लसणाचा कच्चा वास गेला की, मग त्यात दीड टोमॅटो बारीक चिरून घाला.
  7. टोमॅटो मऊ शिजेपर्यंत झाकण ठेवून वाफ आणा.
  8. टोमॅटो शिजला की, आवळा आणि टोमॅटोची वाटून घेतलेली पेस्ट घाला.
  9. आता हे सगळे मिश्रण एकदा परतून घ्या.
  10. परतलेल्या मिश्रणात गरम पाणी घाला.
  11. पाण्याला उकळी आल्यावर त्यात शिजवून, घोटून घेतलेली डाळ घाला.
  12. रसम हे पातळच असल्याने पाण्याची गरज वाटल्यास तर थोडे गरम पाणी घाला.
  13. आता चवीनुसार मीठ आणि उरलेल्या एका आवळ्याचे बारीक चिरून घेतलेले तुकडे घाला.
  14.  उकळी आली की, गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
  15. गरमागरम भाताबरोबर सर्व्ह करा किंवा सूप म्हणून नुसते प्या.

विशेष आहार माहिती : शाकाहारी

हेही वाचा – Recipe : मिक्स हर्ब राईस आणि चीज स्पिनॅच सॉस

टीप्स

  • रसमऐवजी आमटी म्हणून देखील हा पदार्थ तयार करता येईल. तसं करायचं असेल तर शिजवलेल्या डाळीचे प्रमाण वाढवा आणि पाण्याचे प्रमाण कमी करा. अशी आमटी भाकरीबरोबर छान लागते.

तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

avaantar.recipe@gmail.com

या ईमेलवर किंवा

9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील. तथापि,

त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!