Wednesday, July 30, 2025

banner 468x60

Homeललितउकितामो आणि आरीगातो

उकितामो आणि आरीगातो

सुहास गोखले

(निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष)


आजपर्यंतच्या आयुष्यात वाचनातून आणि वर्तनातून एक बाब माझ्या लक्षात आली आहे की, कोणताही देश, संस्कृती, धर्म असले तरी, नैतिक वर्तनाची मूल्ये समानच असतात. जरी नावे, विवेचन पद्धती भिन्न असली तरी शिकवण एकच असते. जपानमधील ‘यामाबुशी’ पंथातील बौद्ध भिक्षूंच्या प्रशिक्षणात शीर्षकातले दोन शब्द महत्त्वाचे मानतात.

‘उकितामो’ म्हणजे शुद्ध मराठीत ‘मी खुल्या मनानी स्वीकार करतो’… जेव्हा आव्हानात्मक अडचण येते तेव्हा जर ती तुम्हाला दूर करता येत असेल तर करा, अन्यथा म्हणा उकितामो.

जसे इंग्लिशमध्ये ‘When stuck up in a situation, change it and if you can’t, face it fearlessly’.

मी अपघातात जखमी झालो, मेंदूत रक्तस्राव झाला… नऊ दिवस कोमात होतो… पॅरलाइझ झालो… प्रत्येक वेळी एकच प्रतिक्रिया होती उकितामो. या सर्वच घटनांवर मात करणे मला शक्य नव्हते, मात्र त्यावेळी परीस्थितीचा स्वीकार करून पुढे चालत राहिलो म्हणून कोलमडलो नाही. जपानी बौद्ध भिक्षू ज्याला उकितामो म्हणतात, तेच मला पालकांनी ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ म्हणून स्वीकारायला शिकवले होते.

हेही वाचा – मुलींमधला आवडता आणि नैसर्गिक ट्रेंड… पाऊट

दुसरा शब्द आहे… ‘आरीगातो’ म्हणजे हार्दिक आभार.

कोणाकडूनही मला काही मोफत किंवा विकतचे सहाय्य होते, तेव्हा मी आभार मानतो. दुकानातून सामान घेताना, रिक्षातून उतरतानाही मी त्यांचे आभार मानतो. काही वेळा हे सहाय्य अप्रत्यक्ष असते.

उदाहरणार्थ, मला न्यायमूर्तींनी पुरावे नसतानाही जन्मठेप सुनावली, त्यांचेही आभार मानले. कारण, मी प्रतिकूल परीस्थितीत कसा उभा राहू शकतो, हे मला समजले. तसेच, मला खऱ्या अर्थाने आपले कोण आणि परके कोण, हे दाखवले. सेवानिवृत्तीपूर्वी एक दिवस आधी मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निखालस खोट्या प्रकरणात अटक केली आणि साडेचार वर्षे कोर्टात फेऱ्या मारायला लावल्या, त्यांचेही आभार! कारण, मला वरीष्ठ कोणत्या थराला जाऊ शकतात, हे दाखवून दिले आणि 60 वर्षांनंतरही माझा कणखरपणा कमी झालेला नाही, हे मला समजले. मनातली कटूता कमी झाली.

या आभार प्रदर्शनासाठीच पाश्चात्य देशात Thanksgiving Day असावा बहुतेक.

उकितामो आणि आरीगातो या दोन तत्वांनी माझे मन शांत झाले. बघा तुम्हीही हे करून!

हेही वाचा – …आणि पोलीस दलात जाण्याचा निश्चय केला!

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!