Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आराध्याने शर्वायला दिली चांदीची डबी…

    July 17, 2026

    लाखमोलाचा सहवास

    July 17, 2026

    जरा विसावू या वळणावर…

    July 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, July 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » देह शुद्ध करूनी भजनी भजावे…
    फिल्मी

    देह शुद्ध करूनी भजनी भजावे…

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरJune 2, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठी लेख, मराठी साहित्य, मराठी कथा, मी मराठी, अभिजात मराठी, सुमन कल्याणपूर निधन, सुमन कल्याणपूर श्रद्धांजली, सुमन कल्याणपूर लतादिदी, सुमन कल्याणपूर लता दिदी, सुमन कल्याणपूर लता मंगेशकर, सुमन कल्याणपूर गाणी, सुमन कल्याणपूर मराठी गाणी, सुमन कल्याणपूर, हिंदी गाणी, सुमन कल्याणपूर महंमद रफी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रविवारी (01 जून 2026) एक आणखी कर्णमधुर आवाज काळाच्या पडद्याआड गेला. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने मागील शतकातील सदाबहार संगीत युगाचा अंत झाला आहे, असे म्हणावे लागेल. आवाजातील गोडवा आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजाशी असलेले साधर्म्य, यामुळे त्यांना ओळख तर मिळाली आणि त्या प्रस्थापितही झाल्या, पण तरीही त्या काहीशा मागेच राहिल्या.

    कुणासारखं तरी असणं हे फारसं फलदायी नसतं. कारण, सुमन कल्याणपूर यांचा मूळ आवाज जो लता मंगेशकर यांच्या अत्यंत जवळचा आणि तितकाच सुश्राव्य होता… पण लतादिदी संगीत जगताच्या केंद्रस्थानी विराजमान होत्या. कदाचित, सुमनजींनी जर एखादी वेगळी वाट निवडली असती, तर आशा भोसले आणि गीता दत्त यांच्यासारखे अढळ स्थान त्यांना नक्कीच मिळाले असते.

    या गोष्टीची प्रचिती या तथ्यावरूनही येते की, 1960च्या दशकात लता मंगेशकर आणि महंमद रफी यांच्यात मानधनावरून वाद झाला होता. त्या काळात दोघांनी एकत्र गाणे बंद केले होते. रफीसाहेबांसोबत गाण्यासाठी संगीतकारांना लतादिदींसारख्याच ताकदीच्या आणि गोड आवाजाची गरज होती. ही उणीव सुमन कल्याणपूर यांनी भरून काढली आणि जशी द्वंद्वगीते सुमनजींच्या वाट्याला आली, तशी ती नंतर लता मंगेशकर आणि रफी यांच्यातील वाद मिटताच अचानक मिळणे बंद झाली. त्यानंतरच्या काळात त्यांना त्या दर्जाच्या गायकीच्या संधी खूप कमी मिळाल्या.

    हेही वाचा – एक अकेला इस शहर में…

    तरीही, या गोष्टीला कोणीही नाकारू शकत नाही की, त्या एक अत्यंत लाजवाब आणि सुरील्या पार्श्वगायिका होत्या. कानांना तृप्त करणारा आणि शास्त्रीय रागांची उत्तम जाण असलेला तो आवाज होता! 1950, 1960 आणि 1970च्या दशकात त्यांनी हिंदी, मराठी, गुजराती, भोजपुरी अशा अनेक भाषांमध्ये हजारो अजरामर गाणी गायली.

    त्यांची काही अविस्मरणीय गाणी आठवून पहा :

    • ‘जूही की कली मेरी लाडली’ (दिल एक मंदिर)
    • ‘शराबी शराबी ये सावन का मौसम’ (नूरजहाँ)
    • ‘मन गाए वो तराना जिसे सुनकर आ जाना’ (चालाक)
    • ‘अपने पिया की मैं तो बनी रे जोगनिया’ (कण कण में भगवान)
    • ‘मेरे महबूब ना जा’ (नूर महल)
    • ‘ना तुम हमें जानो’ (बात एक रात की)
    • ‘पहला पहला प्यार है’ (बदतमीज)
    • ‘नींद उड़ जाए तेरी चैन से सोनेवाले’ (जुआरी)
    • ‘कहती है झुकी झुकी नज़र’ (जिंदगी और ख्वाब)
    • ‘मेरे संग गा, गुनगुना कोई गीत सुहाना’ (जानवर)
    • ‘चले जा चले जा चले जा’ (जहाँ प्यार मिले)
    • ‘दिल गम से जल रहा है’ (शमा)
    • ‘तारों की गोरी चाँद की गुड़िया’ (देखा प्यार तुम्हारा)
    • ‘जो हमपे गुज़रती है’ (मोहब्बत इसको कहते हैं)
    • ‘पाकीजा’ चित्रपटाच्या पाकीज़ा रंग बरंग’ मधील त्यांचे ते अनोखे गाणे ‘गिर गई रे मोरे माथे की बिंदिया..’

    तसेच त्यांची सदाबहार द्वंद्वगीते :

    • ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे’ (ब्रह्मचारी)
    • ‘तुमने पुकारा और हम चले आए’ (राजकुमार)
    • ‘ना ना करते प्यार तुम्हीं से कर बैठे’ (जब जब फूल खिले)
    • ‘चुरा ले ना तुमको ये मौसम सुहाना’ (दिल ही तो है)
    • ‘दिल एक मंदिर है’ (दिल एक मंदिर)
    • ‘अंखियों का नूर है तू’ (जौहर महमूद इन गोवा)
    • ‘अजहुं ना आए बालमा, सावन बीता जाए’ (सांझ और सवेरा)
    • ‘मनमोहन मन में हो तुम्हीं’ (कैसे कहूँ)
    • ‘ये किसने गीत छेड़ा’ (मेरी सूरत तेरी आँखें)
    • ‘ठहरिए होश में आ लूं तो चले जाइएगा’ (मोहब्बत इसको कहते हैं)
    • ‘बाद मुद्दत के ये घड़ी आई’ (जहाँआरा)

    लता मंगेशकर आणि सुमनजींच्या आवाजात इतके साधर्म्य इतके होते की, अनेकदा मोठे कानसेन आणि सामान्य रसिकही फसत असत. सुमनजी आणि लतादिदी यांच्या आवाजाची मूलभूत पट्टी आणि पोत कमालीचा सारखा होता. दोघींच्याही आवाजात एक प्रकारची दैवी नितळता, उच्च पातळीवरील सुस्पष्टता आणि गाण्यातील शब्दांना अचूक न्याय देण्याची क्षमता होती. जेव्हा सुमनजी वरच्या पट्टीत गात असत, तेव्हा त्यांचा आवाज हुबेहूब लतादिदींसारखाच भासत असे. दोघींचेही सांगीतिक संस्कार आणि शास्त्रीय संगीताचा पाया पक्का होता. त्यामुळे गाण्यातील हरकती, मुरक्या आणि ताना घेण्याची दोघांची शैली खूप अंशी मिळतीजुळती होती.

    या आवाजातील साधर्म्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘ममता’ या हिंदी चित्रपटातील ‘रहें ना रहें हम’ हे गाणे आहे. संगीतकार रोशन आणि गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या या चित्रपटात या गाण्याची एकूण तीन व्हर्जन आहेत :

    1. पहिले सोलो व्हर्जन : चित्रपटात हे गाणे लता मंगेशकर यांनी गायले आहे.
    2. डुएट व्हर्जन : याच गाण्याचे एक लहान व्हर्जन सुमन कल्याणपूर आणि महंमद रफी यांनी एकत्र गायले आहे.
    3. दुसरे सोलो व्हर्जन – लता मंगेशकर यांच्या आवाजातीलच हे दुसरे गाणे आहे.

    सुमन कल्याणपूर आणि रफीसाहेबांनी गायलेले व्हर्जन ऐकताना, ते गाणे लतादिदी आणि रफी यांनीच गायले आहे, असा थेट भास होतो.

    लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपूर यांच्यात प्रत्यक्ष किंवा जाहीर असा कोणताही वाद कधीही नव्हता. मात्र, त्या काळात चित्रपटसृष्टीत त्यांच्यातील कथित ‘शीतयुद्धा’बद्दल अनेक चर्चा आणि अफवा रंगल्या होत्या. 1960च्या दशकात लता मंगेशकर यांचे चित्रपटसृष्टीवर एकछत्री साम्राज्य होते. त्याच वेळी सुमन कल्याणपूर यांचा आवाज हुबेहूब लतादिदींसारखा असल्याने काही संगीतकारांनी लतादिदींना पर्याय म्हणून सुमनजींना संधी देण्यास सुरुवात केली. विशेषतः, जेव्हा लतादिदींचे काही कारणाने संगीतकार (उदा. एस. डी. बर्मन) किंवा सहगायकांसोबत वाद झाले, तेव्हा सुमनजींना जास्त गाणी मिळाली. यामुळे, “लतादिदींनी स्वतःचे स्थान टिकवण्यासाठी सुमन कल्याणपूर यांचे करिअर मागे पाडण्याचा प्रयत्न केला,” अशा चर्चा सुरू झाल्या.

    काही निर्माते आणि संगीतकार स्वतःच्या सोयीसाठी लतादिदींच्या नावाचा आडोसा घेत असत, ज्यामुळे या अफवांना जास्त खतपाणी मिळाले. यात स्वतः सुमन कल्याणपूर यांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांनी त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये हे स्पष्ट केले आहे की, “त्यांच्या मनात लतादिदींबद्दल कमालीचा आदर होता आणि लतादिदींनी त्यांचे करिअर कधीही जाणीवपूर्वक खराब केले नाही.” आवाजातील साधर्म्याबद्दल बोलताना सुमनजी म्हणाल्या होत्या, “माझा आवाज लहानपणापासूनच असा नाजूक आणि बारीक होता, त्यात मी काहीच करू शकत नव्हते. मी कॉलेजमध्ये असताना लतादिदींची गाणी गायचे, त्यामुळे त्यांच्या गायकीचा प्रभाव माझ्यावर असणे स्वाभाविक होते. पण मी कधीही त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न केला नाही.” परंतु हे सांगतानाच, त्यांनी रेडिओ सिलोन आणि रेकॉर्ड कंपन्यांच्या चुकांबद्दलही खंत व्यक्त केली होती, कारण अनेकदा सुमनजींच्या गाण्यांवर चुकून लता मंगेशकर यांचे नाव छापले जायचे, ज्यामुळे लोकांमध्ये अधिक संभ्रम निर्माण व्हायचा.

    दुसरीकडे, लता मंगेशकर यांनीही एका मुलाखतीत अत्यंत स्पष्टपणे सांगितले होते की, “कोणत्या गाण्यासाठी कोणत्या गायकाला घ्यायचे, हा पूर्णपणे संगीतकार आणि दिग्दर्शकांचा निर्णय असायचा. मी कधीही कोणाचे काम हिरावून घेतले नाही.” उलट, सुरुवातीच्या काळात स्वतः लतादिदींनी त्यांचे कौतुक केले होते. एका गाण्याच्या रेकॉर्डिंगनंतर लतादिदींनी गमतीने म्हटले होते की, “सुमनजींचा आवाज ऐकून त्यांना काही क्षणांसाठी स्वतःचाच भास झाला होता.”

    थोडक्यात सांगायचे तर, दोघींनीही एकमेकांबद्दल नेहमीच आदर राखला. जरी त्यांच्या आवाजात साधर्म्य असले, तरी सुमन कल्याणपूर यांचे संगीत क्षेत्रातील योगदान स्वतःच्या बळावर अत्यंत मोलाचे आणि अजरामर आहे. रसिकांच्या मनात त्यांचे स्थान आजही अढळ आहे.

    हेही वाचा – Nostalgia : निगाहें मिलाने को जी चाहता हैं…

    सुमनजींचे गाणे म्हणजे केवळ पार्श्वगायन नव्हते; ती सुरांची एक नितांत सुंदर, सात्विक आणि हळूवार साधना होती. अशोक परांजपेलिखित आणि अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर…’ या शब्दांतील निसर्गाची व्याकुळता सुमनजींनी आपल्या आवाजातून अशी काही जिवंत केली की, ऐकणाऱ्याचे मन नकळत भावविभोर होऊन जाते.

    आज त्या देहाने जरी आपल्यात नसल्या, तरी त्यांनी मागे ठेवलेला हा सांगीतिक ठेवा कधीही संपणारा नाही. सुमनजी चित्रपटसृष्टीच्या झगमगाटात राहूनही नेहमीच एका संयमी, शांत आणि प्रसिद्धीपराङ्मुख आयुष्य जगल्या. त्यांनी कधीच कोणाशी वाद घातले नाहीत किंवा त्यांच्या क्षेत्रातील कुठल्याही कलाकाराचा राग किंवा अपमान त्यांनी केला नाही. तसेच, सुमनताईंनी कधीच कोणाला नावे देखील ठेवली नाहीत.

    त्यांच्या जाण्याने आकाशातले मेघही गहिवरले असतील. या सात्विक आणि गुणी गायिकेबद्दल मी इतकचं म्हणेन की, त्यांचे जगणे एखाद्या तपस्विनीसारखे होते, हे सांगताना मला त्यांनीच गायलेल्या एकनाथांच्या अभंगाचे बोल आठवतात,

    “देह शुद्ध करूनी भजनी भजावे, आणिकांचे नाठवावे दोषगुण…”

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    कालातीत कलाकृती…

    July 14, 2026 फिल्मी

    माझी छोटी मैत्रीण…

    July 13, 2026 फिल्मी

    नूतन… मौनाचा संवाद!

    July 5, 2026 फिल्मी
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फिल्मी

    कालातीत कलाकृती…

    By सुरेखा मोंडकरJuly 14, 2026

    22 सप्टेंबर 1965 रोजी रंगमंचावर आलेल्या ‘अदरक के पंजे’ या एकपात्री कार्यक्रमाची सांगता 11 फेब्रुवारी…

    माझी छोटी मैत्रीण…

    July 13, 2026

    नूतन… मौनाचा संवाद!

    July 5, 2026

    Rental family… आयुष्यातील गाळलेल्या जागा भरणारे!

    June 28, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आराध्याने शर्वायला दिली चांदीची डबी…

    July 17, 2026

    लाखमोलाचा सहवास

    July 17, 2026

    जरा विसावू या वळणावर…

    July 17, 2026

    संत जनाबाई… प्रत्यक्ष जगताना विठूरायाची साथ!

    July 17, 2026

    पोई भाजी (मलबार स्पिनॅच, मायाळू) एक पौष्टिक प्रकार!

    July 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : मुंगिये मेरु नोलांडवे, मशका सिंधु न तरवे

    July 17, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 362
    • अवांतर 198
    • आरोग्य 130
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 492
    • फिल्मी 57
    • फूड काॅर्नर 238
    • मैत्रीण 24
    • ललित 786
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आराध्याने शर्वायला दिली चांदीची डबी…

    July 17, 2026

    लाखमोलाचा सहवास

    July 17, 2026

    जरा विसावू या वळणावर…

    July 17, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.