Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Recipe : गप्पांचा फड, चहाचा कप अन् सोबतीला चटपटीत भडंग!

    May 1, 2026

    आश्वस्त करणारी मिठी

    May 1, 2026

    Dnyaneshwari : माजीं सापडलेनि अलिकुळें, जळावरी कमळकळिका जेवीं आंदोळे

    May 1, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, May 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » नायगरा अन् हास्याचा धबधबा!
    ललित

    नायगरा अन् हास्याचा धबधबा!

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 13, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठी लेख, मराठी साहित्य, मराठी कथा, मी मराठी, अभिजात मराठी, जागतिक महिला दिन, महिला दिन, महिलांचे हसणे, महिलांचा आवाज, महिलांच्या गप्पा, महिलांचा फुल व्हॉल्युम, नायगरा धबधब्याचा आनंद, नायगरा धबधब्याचा आवाज, नायगरा धबधब्याचा क्षीण आवाज,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सुधीर करंदीकर

    नुकताच म्हणजे 8 मार्चला जागतिक महिला दिन खूप उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्यात आला. महिलांकडून खूप काही शिकण्यासारखे असते, त्यांचे खूप काही गुण घेण्यासारखे असतात, हे आपण सगळे जाणतोच आणि याचा आपण अनुभव पण घेत असतो (मी तरी नक्कीच घेत असतो). देवाने पण आई, बहीण, बायको, मुलगी, आजी, पणजी, आत्या, मावशी… हे सगळे छान छान रोल पण बायकांकडेच दिले आहेत!

    बायकांचा एक आगळावेगळा आणि चांगला गुण म्हणजे – बायका एकत्र जमल्या की,  मनमोकळेपणाने खुल्या दिलाने फूल व्हॉल्युममध्ये गप्पा मारणे आणि त्या पण जोरजोरात हसत हसत! यामुळे त्यांचं मन नेहमीच एकदम मोकळं आणि नितळ राहत आणि तब्येत एकदम मस्त असते.

    परवा असंच मित्रांबरोबर या विषयावर गप्पा मारताना माझी एक जुनी आठवण ताजी झाली –

    रिटायर झाल्यानंतर आम्ही दोघं मुलीकडे अमेरिकेला San Jose येथे गेलो होतो. अमेरिकेतली सगळी महत्त्वाची ठिकाणे बघण्याकरिता तिने आम्हाला संपूर्ण ट्रॅव्हलची बाय एअर – बाय रोड बुकिंग करून दिली होती. साईट सीईंगकरिता तिथल्या एजन्सीचे बुकिंग करून दिले होते. प्रत्येक ठिकाणी राहण्याकरिता हॉटेल बुकिंग करून दिली होते आणि बहुतेक ठिकाणी तिच्या ओळखीचे मित्र- मैत्रिणी होते, त्यांचे फोन नंबर दिले होते. या सगळ्यामुळे अमेरिकेसारखा अनोळखी देश आम्ही एकदम मजेत बघितला.

    हेही वाचा – कानाला खडा… माझा व्हॅलेंटाइन डे!

    एकेक ठिकाण बघत बघत आमचा प्रवास छान सुरू होता. एक महत्त्वाचे ठिकाण होते, नायगरा फॉल. जवळच्या एअरपोर्टपर्यंत आमचे विमानाचे बुकिंग होते आणि तिथून साईट सीईंग करणारी टुरिस्ट बस पकडायची होती… एअरपोर्टहून आम्ही टुरिस्ट बसच्या स्टार्टिंग पॉइंटला वेळेवर जाऊन पोहोचलो. भारतातून पुण्याची एक टुरिस्ट कंपनी लेडिज ग्रुप घेऊन तिथे आली होती. निरनिराळ्या देशातली पण काही स्त्री-पुरुष मंडळी आली होती. बरोबर वेळेत बस हजर झाली. दिलेल्या सीट नंबरप्रमाणे आम्ही सगळे बसमध्ये चढलो. तिथले लोकल गाईड पण जॉइन झाले आणि नायगरा फॉलकडे आमचा प्रवास सुरू झाला…

    गाईडने सगळ्या प्रवाशांना कानाला लावायला ईअरफोन दिले आणि त्यांच्याकडेही ईयरफोन आणि माइक हे दोन्ही होते. गाईड जे माइकमध्ये जे बोलतील / ज्या सूचना देतील, ते सगळ्यांना (तुम्ही जवळपास कुठेही हिंडत फिरत असाल तरी) ऐकू येणार, अशी कम्युनिकेशनची व्यवस्था होती. काही अंतर अलीकडेच एका ठिकाणी बस थांबली. शॉर्ट ब्रेकमध्ये चहापाणी – कोल्ड्रिंग झाले. नंतर गाईडने थोडे प्रास्ताविक केले.

    गाईड : मी तुम्हाला नायगरा फॉलविषयी सगळी माहिती इथेच सांगणार आहे. कारण, तिथे इतक्या उंचीवरून आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी खाली पडतं असते की, जवळून दोन-तीन जेट विमाने गेली, तरी फॉलच्या आवाजामुळे विमानांचा आवाज ऐकू येत नाही. गाईडने नायगरा फॉलची सगळी तपशीलवार माहिती सांगितली.

    काही प्रश्नोत्तरे झाली आणि आमची बस नायगरा फॉलकडे निघालो… फॉल बघण्यासाठी आणि तो आवाज ऐकण्यासाठी आम्ही जास्तच उत्सुक होतो. तिथे पोहोचलो… नायगरा फॉलचे दृश्य एकदमच अप्रतिम आहे. मी व्हिडीओ काढत होतो, पण फॉलचा म्हणावा तेवढा मोठा आवाज येत नव्हता. तेवढ्यात काही परदेशी प्रवाशांनी गाईडला हाताने खुणा करून सुचवले की, तुम्ही म्हणता तसा फॉलचा आवाज ऐकू येत नाहीये. गाईडच्या पण हे लक्षात आले आणि त्यांची ट्युब पेटली.

    त्याने कमरेला लावलेला माइक काढला आणि त्यावरून सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले आणि अनाऊन्समेंट केली… गाईड चक्क तुटक – तुटक मराठीमध्ये बोलत ह़ोता…

    हेही वाचा – फोनवर पुणेरी उत्तरे…

    गाईड : मी सर्व भारतीय भगिनींना सौजन्यपूर्ण विनंती करतो की, आपण इथे आहोत, तोपर्यंत त्यांनी आपापसातील गप्पा आणि मोठमोठ्याने हसणे थांबवावे… आणि शांतता पाळावी. भारतीयांच्या भाषेत तुम्ही तोंडावर बोट ठेवावे, फक्त कान आणि डोळे पूर्ण उघडे ठेवून या स्थळाचा आनंद घ्यावा… आणि आपल्या सहकाऱ्यांना पण तो मनसोक्त घेऊ द्यावा!

    गाईड काय बोलले हे परदेशी माणसांना समजले नाही, पण गाईडच्या बोलण्याचा अपेक्षित परिणाम झाला, हे समजले. फॉलचा खरा आवाज आता ऐकू यायला लागला… वॉटर फॉलचा आवाज ऐकून सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून आपला आनंद व्यक्त केला. सगळ्यांनी व्हिडीओ शूटिंग केले. दिलेली वेळ संपल्यानंतर गाईडने सगळ्यांना परत फिरण्याची खूण केली. सगळे बसजवळ जमा झालो. गाईडने अनाउन्समेंट केली – आता स्त्रियांनी तोंडावरचे बोट काढायला हरकत नाही…


    मोबाइल – 9225631100


    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आश्वस्त करणारी मिठी

    May 1, 2026 ललित

    एप्रिल फूल… कोणी कोणाला केले?

    April 30, 2026 ललित

    नमन नटवरा… जयवंत सरांच्या निराशेचे कारण काय?

    April 30, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आश्वस्त करणारी मिठी

    By प्रणाली मंगेश महाशब्देMay 1, 2026

    दोन-तीन दिवसांपासून अनुचे काहीतरी बिनसले होते. समजत नव्हते काय, पण तिच्या एकूण वागण्यावरून अजयच्या ते…

    एप्रिल फूल… कोणी कोणाला केले?

    April 30, 2026

    नमन नटवरा… जयवंत सरांच्या निराशेचे कारण काय?

    April 30, 2026

    ठोकताळा वेळ वाचवतो, पण…

    April 30, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Recipe : गप्पांचा फड, चहाचा कप अन् सोबतीला चटपटीत भडंग!

    May 1, 2026

    आश्वस्त करणारी मिठी

    May 1, 2026

    Dnyaneshwari : माजीं सापडलेनि अलिकुळें, जळावरी कमळकळिका जेवीं आंदोळे

    May 1, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 मे 2026

    May 1, 2026

    एप्रिल फूल… कोणी कोणाला केले?

    April 30, 2026

    नमन नटवरा… जयवंत सरांच्या निराशेचे कारण काय?

    April 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 284
    • अवांतर 184
    • आरोग्य 106
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 402
    • फिल्मी 47
    • फूड काॅर्नर 202
    • मैत्रीण 18
    • ललित 595
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Recipe : गप्पांचा फड, चहाचा कप अन् सोबतीला चटपटीत भडंग!

    May 1, 2026

    आश्वस्त करणारी मिठी

    May 1, 2026

    Dnyaneshwari : माजीं सापडलेनि अलिकुळें, जळावरी कमळकळिका जेवीं आंदोळे

    May 1, 2026
    Most Popular

    आश्वस्त करणारी मिठी

    May 1, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.