Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 एप्रिल 2026

    April 30, 2026

    स्त्रीचे सौंदर्य अन् पुरुषाचे देखणेपण खुलते…

    April 29, 2026

    Bookshelf : ‘हिंदू’… भालचंद्र नेमाडेंनी सत्य समोर ठेवले, पण…

    April 29, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 30
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » दुकानाबाहेर येऊन शिवने समोर बघितलं आणि डोक्याला हातच लावला…
    ललित

    दुकानाबाहेर येऊन शिवने समोर बघितलं आणि डोक्याला हातच लावला…

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 9, 2026No Comments8 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, प्रेमकथा, शिव आराधना, राम आराधना, राम सिया, शिव सिया, राम सिया विवाह, शिव आराधना विवाह, शिव आरू विवाह, लग्नाची खरेदी, आरूचे रडणे, रामचे आरूला समजावणे, सिया आरूची मैत्री, आरू आणि सिया,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    शोभा भडके

    भाग – 17

    सिया आणि सुधाला आरूच्या घरी सोडून आकाश ऑफिसमध्ये गेला होता. महत्त्वाचे काम असल्याने शिवने त्याला जायला सांगितलं होतं. इथे आरूकडे हॉलमध्ये सोफ्यावर सुधा आणि सिया बसल्या होत्या. कलावती आणि सरिता त्यांच्यासाठी चहा नाश्ता घेऊन आल्या.

    “अहो राहू द्यायच हो… याची काय गरज होती?” सुधा एवढा सगळा नाश्ता पाहून म्हणाल्या.

    “गरज कशी नाही वं! तुम्ही आमच्या विइन बाई. तुमचा मान राखाया नगं व्हय? लेकीच्या सासू हाईस तुम्ही…” त्यांच्या हातात चहा देत कलावती म्हणाल्या.

    “मुलीच्या सासू तर तुम्ही पण आहात ना? आणि कशाला उगाच हे मुलाकडचे, मुलीकडचे असं मानायचं? सगळं सारखंच धरून चालूया…” सुधा हसत म्हणाल्या.

    मग कलावती आणि सरिताचं दडपण कमी झालं. नाही म्हणायला, त्यांच्या श्रीमंतीचं दडपण आलंच होतं त्यांना! पण सुधा यांच्या मोकळ्या बोलण्याने ते कमी झालं…

    सिया अवघडून बसली होती. भावनाचं तिच्याकडे लक्ष गेलं आणि तिच्या ते लक्षात आलं. भावना तिच्याजवळ येत म्हणाली, “वहिनी, चला ना तुम्हाला मी आमचं घर दाखवते.”

    “अम्… नाही… नको, मी ठीक आहे,” सिया.

    “अगं जा ना, बघ… हे पण तुझंच घर आहे, असं समज. ये बघून, जा… भावना घेऊन जा तिला…” सरिता म्हणाल्या. मग सियाला नाही म्हणता आलं नाही आणि ती उठून भावनासोबत गेली.

    “ये ना वहिनी, ही माझी आणि आरूची रूम, कशी वाटली? जराशी लहानच आहे… आमचं घरच खूप लहान आहे,” आत येत रूम दाखवताना भावना संकोचून म्हणाली.

    “अगं नाही… लहान असलं म्हणून काय झालं… घर खूप छान आहे. मला आवडलं.” सिया  हसत रूमचं निरीक्षण करत म्हणाली.

    तिचं उत्तर ऐकून भावनाचा पण चेहरा फुलला… महालासारख्या घरात राहणाऱ्या सियाला आपलं हे छोटंसं घर आवडेल का? असा विचार भावनाच्या मनात आला होता आणि त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं. पण सियाच्या उत्तराने तिला छान वाटलं.  सिया जास्त बोलत नव्हती. पण जेवढं बोलत होती, ते आपुलकीचेच होतं. कुठेही तिच्या बोलण्यात बडेजाव नव्हता.

    हेही वाचा – गाडी थांबवून शिवने आरूचे तोंड दाबून धरलं…

    “वहिनी, तुम्हाला माहितीय, राम दादा ना खूप प्रेमळ आहे…” भावनेच्या भरात आपण काय बोलून गेलो हे लक्षात येताच, दाताखाली जीभ चावत भावना म्हणाली, “अरे, मी पण काय विचारतेय, तुम्हाला तर माहीतच असणार ना!” तिला अवघडल्यासारखे झाले.

    “सॉरी… ते…. ते… मी… म्हणजे…” आता सियाला काय बोलावं ते सुचेना.

    “हं… माहीत आहे मला!” सियाचा चेहरा पाहून मोकळं हसत भावना म्हणाली.

    “…आणि मला तू अहो, जाओ का बोलतेस… वहिनी ठीक आहे, पण ते अहो जाओ नको, कळलं? तू खूपच गोड आहेस… आणि आरूही!” सिया तिचा गाल ओढत म्हणाली.

    “हं… थँक्यू वहिनी. तू बस मी आलेच…” असं म्हणत भावना पळतच बाहेर गेली.

    “अगं पण कुठे? अरे…” सिया बोलत होती, पण तिचं बोलण ऐकायला भावना थांबलीच नाही.

    सियाने मग रूममध्ये इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली. रूम छोटीच होती, पण एकदम नीटनेटकी होती. बेड… बाजूला एक कपाट… तिथेच शेजारी टेबल… आणि टेबलवर एक फोटोफ्रेम… सियाची नजर त्या फोटोफ्रेम खिळली… तिने पुढे होऊन ती फ्रेम हातात उचलून घेतली, त्यात भावना आणि आरूचा एकत्र मस्ती करतानाचा फोटो होता. त्यात आरूचे निरागस हसू पाहून सियाच्या चेहऱ्यावर देखील स्मित उमटले…

    “माझी आरू कायम अशीच हसत खेळत आयुष्य जगत आली, पण तिचं हेच निरागस हास्य हिरावून घेतल गेलं…” तिच्या मागून अतिशय रागीट आवाज आला आणि त्याबरोबर तिच्या हातून ती फ्रेम काढून घेतली गेली!


    इकडे आरू आणि शिव ड्रेस डिझायनरकडे आले होते… डिझायनर त्यांना ड्रेस डिझाइन दाखवत होती…

    आरू घरी परत जायचं म्हणत होती, पण तिचं काहीही न ऐकता शिव तिला घेऊन आला होता. त्यामुळे ती तोंड फुगवून बसली होती.

    “हे बघा मॅम… हा डिझायनर घागरा आहे… लेटेस्ट डिझाइन आहे, तुम्हाला लग्नासाठी बेस्ट आहे,” डिझायनर तिला एक लेहंगा दाखवत म्हणाली.

    पण त्या मुलीच्या बोलण्याकडे लक्ष न देता आरू त्या घागऱ्यावर लावलेला प्राइज टॅग हातात घेऊन बघतच राहिली. कारण, त्यावर एक लाख पन्नास हजार किंमत होती! ते पाहूनच तिचे डोळे विस्फारले होते. तिने तिच्या उभ्या आयुष्यात एक हजाराहून जास्त किमतीचा ड्रेस खरेदी केला नव्हता… आणि आता समोर दीड लाखा किमतीचा एक घागरा तिच्यासाठी दाखवला जात होता! तिचं आता बाकी कशाकडेच लक्ष नव्हतं…

    आरूने तो घागरा खाली ठेवला आणि समोर ठेवलेले इतर अजून घागरे चेक केले… म्हणजे फक्त त्यांचे प्राइज टॅग पाहिले… तिच्या या कृतीने ती मुलगी मात्र विचित्र नजरेने आरूकडे पाहात राहिली… शिवचं मात्र याकडे लक्ष नव्हतं. त्याला ऑफिसमधून एक महत्त्वाचा कॉल आल्यामुळे तो त्यात बिझी होता…

    “ओ मॅडम… ते जे सर आहेत ना, त्यांचं फोनवर बोलून झाल्यावर त्यांना सांगा .. मी गाडीत जाऊन बसलेय म्हणून…” असं म्हणून आरू रागात एक नजर शिवकडे टाकून बाहेर निघून गेली. ती मुलगी मात्र अजूनही तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे विचित्रपणे पाहात होती. कारण शिवने आधीच सांगितलं होतं की, ती त्याची होणारी वाइफ आहे आणि  तिच्यासाठी ब्रायडल ड्रेस दाखवा… पण तिच्याकडे पाहून ती कोणत्याच अँगलने नवरी वाटत नव्हती!

    ” एक्सक्यूज मी… वेअर इज शी?” शिवने त्या मुलीजवळ येत विचारले.

    त्याचं बोलून झाल्यावर त्याने फोन खिशात ठेऊन दिला आणि त्याने पूर्ण शॉपमध्ये नजर फिरवून आरू कुठे दिसते का, ते पाहिलं, पण ती कुठेच दिसत नाही ते पाहून त्याने त्या मुलीला विचारलं.

    “सर त्या बाहेर गेल्यात…” त्या मुलीने सांगितलं. ते ऐकून शिवच्या कपाळावर आठ्या पसरल्या…

    “ओके. Thanks…” तो चेहरा नॉर्मल ठेवत म्हणाला आणि दुकानाबाहेर आला… तेव्हा त्याची नजर समोर गेली आणि… आणि… आता तो डोळे विस्फारून पाहू लागला… त्याने डोक्याला हात लावला…


    सियाच्या हातातली फोटोफ्रेम हिसकावून घेत रामने ती परत जागेवर ठेवून दिली. ती मात्र त्याच्या असं अचानक येऊन, जवळून बोलण्याने दचकूनच गेली… म्हणाली, “राम, काय हे? घाबरले ना मी! तुझी सवय गेली नाही ना अजून, असं अचानक येऊन बोलण्याची?”

    तसं रामने ती फोटोफ्रेम जागेवर ठेऊन तिच्याकडे चमकून पाहिलं… पण काहीच क्षण… काही क्षणांसाठी जुन्या गोड आठवणी जाग्या झाल्या… पण लगेच वास्तवाची जाणीव झाली तसं त्याच्या डोळ्यात राग उतरला…

    सियाच्या पण लगेच ते लक्षात आलं, तसं तिनेही एकटक त्याच्याकडे पाहिलं… ” राग मला यायला हवा,  तुझं काय चालूय?” असा मनात विचार आला, पण बोलली मात्र काहीच नाही.

    तिची रोखलेली नजर पाहून त्याने आपली नजर दुसरीकडे वळवली… म्हणाला, “आईने दागिने बनवून ठेवले आहेत, तिच्या सुनेसाठी! तरीही जर तुला दुसरं काही हवं असेल तर, ते मी लग्नानंतर घेईन… पण सध्या माझ्याकडून तुला काहीच मिळणार नाही. आय होप… समजून घेशील.” तो निर्विकारपणे म्हणाला.

    ” मी काहीच म्हणाले नाही, त्याबाबतीत!” तिनेही शांतपणे उत्तर दिलं… कारण त्याच्या बोलण्यातून तिला जाणवत होतं की, तो रागात आहे.

    “मग मी न येण्याने वाईट का वाटलं तुला? जे तुझ्या आईला घेऊन घरी आलीस तक्रार करायला!” राम रागात म्हणाला.

    “तू माझ्यावर एवढा का चिडतोस… राग तर मला यायला हवा आणि मला आलाही आहे आणि तो काढणार सुद्धा आहे… सोडणार नाही मी तुला,” ती रागात त्याच्यासमोर बोट दाखवत म्हणाली. चेहऱ्यावर राग, सोबत दुःख देखील होतं.

    “हो बरोबरच ना… राग आलाय ना माझ्या वागण्याचा… म्हणूनच त्याची शिक्षा माझ्या बहिणीला देताय तुम्ही लोक. पण लक्षात ठेव माझ्या बहिणीच्या केसाला जरी धक्का लागला ना, यावेळी सोडणार नाही मी कोणाला!” तो पण रागातच तिचे दंड पकडून तिला भिंतीला टेकवत म्हणाला. डोळ्यात राग उतरला होता… कपाळावरच्या नसा ताठरल्या होत्या.

    त्याच्या या कृतीने सिया मात्र पुरती भांबावली… तिने यापूर्वी रामला कधीच इतकं रागात पाहिलं नव्हतं आणि कुठल्याही मुलीविषयी असं वागणं तर अजिबातच नाही! तो एकदम शांत आणि संयमी होता. मुलींचा, स्त्रियांचा तर विशेष आदर करायचा. मग समोर कोणीही असो… म्हणून तर ती त्याच्या प्रेमात पडली होती.

    जेव्हा ते रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा देखील त्याने तिला फुलासारखं जपलं होतं. कधीच तिच्यावर आवाज चढवून बोलला नव्हता… आणि आज तोच राम तिला त्रास होईल, असं वागत होता! त्याने तिच्या दंडांना इतक जोरात पकडलं होतं की, तिला त्याचा त्रास होत होता. त्याही पेक्षा तो त्रास त्याच्यामुळे आहे, ज्याचं आपल्यावर जीवापाड प्रेम होतं! या विचाराबरोबरच एक प्रश्न डोक्यात फेर धरू लागला “आजही असेल का त्याचं आपल्यावर प्रेम? आणि तशी अपेक्षा करण्याचा हक्क आहे का आपल्याला?”

    तो अजूनही एकटक रागात तिच्याकडे पाहात होता. तिचीही नजर त्याच्या डोळ्यांत स्थिरावली होती… पण आधी तिच्या डोळ्यात बसलेला शॉक दिसत होता आणि आता दुःखाने ते भरून आले होते… तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं तसं तो भानावर आला आणि झटकन बाजूला होऊन त्याने अस्वस्थपणे केसांतून हात फिरवला… त्याला खूप राग येत होता… त्याला आता जाणीव झाली होती की, आपण कस वागलो तिच्याशी! तिला आपल्यामुळे त्रास झाला… तिच्या डोळ्यांत पाणी आलं… त्याला स्वतःचाच राग येत होता आणि त्याच रागात त्याने हाताची मूठ आवळून जोरात भिंतीवर मारली…

    “रामSSS” तिने जोरात ओरडून त्याचा हात हातात घेतला.

    “वेड लागलंय का राम? काय करतोय रक्त येतंय हातातून!” ती आपल्या ओढणीने ते रक्त पुसत त्याच्यावर चिडतही होती आणि रडत देखील…

    तिने त्याला हाताला धरून बेडवर बसवलं आणि इकडे तिकडे काहीतरी शोधू लागली. तो तिच्याकडेच पाहात होता… आजही ती तशीच होती, त्याला काही झालं की, तिच्या चेहऱ्यावर हेच भाव असायचे! जखम त्याला झाली होती अन् रडत ती होती!!

    तो काही क्षणांसाठी त्यांच्या गोड आठवणीत हरवला होता… तोच त्याला जळजळ जाणवली आणि त्याची नजर हातावरच्या जखमेवर गेली… ती डेटॉल टाकून जखम साफ करत होती. त्याचबरोबर हळूवार फुंकर घालत होती… क्षणभर तो तिच्या निरागस चेहऱ्यात हरवलाच…

    पण लगेच भानावर येत त्याने हात बाजूला काढून घेतला…

    “या जखमेवर तर मलमपट्टी करशील… पण मनावर झालेल्या जखामांचं काय? त्या कशा भरून काढणार आहेस तू?” तो जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाला.

    हेही वाचा – आरू मुसमुसत उभी होती अन् शिव…

    “राम, तू काय बोलतोयस… मला काहीच कळत नाहीय…” त्याचं बोलणं तिच्या डोक्यावरून गेलं होतं… गोंधळूनच ती बोलत होती.

    “सोड, काही नाही… चल बाहेर…” तो निर्विकारपणे म्हणाला आणि बाहेर जाऊ लागला. तिने हाताला धरून त्याला थांबवलं आणि त्याच्या समोर आली… त्याच्या गालावर हात ठेऊन, त्याच्या डोळात पाहात शांतपणे म्हणाली, “काय झालंय राम… तुझा हा राग मला वेगळाच भासतोय!”


    इकडे शिव त्या शॉपमधून बाहेर आला तर, त्याची नजर समोरच्या बिल्डिंग समोर भाजी विकणाऱ्या व्यक्तीवर गेली आणि तो शॉक बसल्यासारखा डोळे मोठे करून पाहू लागला… आणि आपोआपच त्याचा हात डोक्यावर गेला…

    ” भाजी घ्या भाजी… पंधराला एक जुडी… वीसच्या दोन… ओ दादा, एकदम ताजी भाजी आहे, घ्या…” आरू भाजी विकत होती! तिच्या समोर टोपलीत मेथी, टोमॅटो तसेच हिरवी मिरची होती…

    शिवला तर आधी शॉक बसला आणि त्याने डोक्यावर हात मारून घेतला, पण आता त्याला तिचा रागच आला.

    क्रमशः


    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    स्त्रीचे सौंदर्य अन् पुरुषाचे देखणेपण खुलते…

    April 29, 2026 ललित

    Bookshelf : ‘हिंदू’… भालचंद्र नेमाडेंनी सत्य समोर ठेवले, पण…

    April 29, 2026 ललित

    प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असते…

    April 29, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    स्त्रीचे सौंदर्य अन् पुरुषाचे देखणेपण खुलते…

    By रेवती निलेश पांडेApril 29, 2026

    कॉलेजमध्ये असताना परीक्षेच्या अगदी वेळेवर अभ्यास करून पास होणारा आमचा ग्रुप होता. मग काय, परीक्षेच्या…

    Bookshelf : ‘हिंदू’… भालचंद्र नेमाडेंनी सत्य समोर ठेवले, पण…

    April 29, 2026

    प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असते…

    April 29, 2026

    कालाय तस्मै नमः

    April 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 एप्रिल 2026

    April 30, 2026

    स्त्रीचे सौंदर्य अन् पुरुषाचे देखणेपण खुलते…

    April 29, 2026

    Bookshelf : ‘हिंदू’… भालचंद्र नेमाडेंनी सत्य समोर ठेवले, पण…

    April 29, 2026

    प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असते…

    April 29, 2026

    कालाय तस्मै नमः

    April 29, 2026

    Dnyaneshwari : अनावरें मुखें समोर देखे, तयाभेणें पाठीमोरा जंव ठाके

    April 29, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 282
    • अवांतर 184
    • आरोग्य 106
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 401
    • फिल्मी 47
    • फूड काॅर्नर 200
    • मैत्रीण 18
    • ललित 591
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 एप्रिल 2026

    April 30, 2026

    स्त्रीचे सौंदर्य अन् पुरुषाचे देखणेपण खुलते…

    April 29, 2026

    Bookshelf : ‘हिंदू’… भालचंद्र नेमाडेंनी सत्य समोर ठेवले, पण…

    April 29, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 एप्रिल 2026

    April 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.