दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 02 मार्च 2026; वार : सोमवार
- भारतीय सौर : 11 फाल्गुन शके 1947; तिथि : चतुर्दशी 17:55; नक्षत्र : आश्लेषा 07:51
- योग : अतिगंड 12:18; करण : विष्टी 29:28
- सूर्य : कुंभ; चंद्र : कर्क 07:51; सूर्योदय : 06:59; सूर्यास्त : 18:43
- पक्ष : शुक्ल; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
होळी
हुताशनी पौर्णिमा / पौर्णिमा प्रारंभ सायंकाळी 05:55 वाजता
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक आणि प्रभावी वक्ते राम शेवाळकर
टीम अवांतर
सुप्रसिद्घ मराठी साहित्यिक, उत्तम कीर्तनकार आणि प्रभावी वक्ते राम शेवाळकर यांचा जन्म 2 मार्च 1931 रोजी विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे झाला. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी वेदशास्त्रसंपन्नतेची होती. राम शेवाळकर हे आपल्या वडिलांच्या अनुकरणातून, लहान वयातच कीर्तने पाठ करून ती सादर करीत. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही त्यांनी कित्येक व्याख्याने दिली आणि ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ अशी ख्याती त्यांना मिळाली. स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, साने गुरूजी यांचे विचार त्यांनी श्रोत्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविले. त्याचबरोबर आपल्या काव्य आणि निबंधलेखनाने साहित्यिक म्हणूनही लौकिक प्राप्त केला.
लहानपणापासूनच ते काव्यरचना करीत होते. असोशी हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर रेघा, अंगारा हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. निसर्गातील चैतन्याचा आणि सृजनशक्तीचा आविष्कार त्याच्या निरनिराळ्या रूपांतून पाहणे, त्यांना शब्दरूप देणे, हे त्यांच्या कवितेचे लक्षणीय वैशिष्ट्य होय. कवितेखेरीज त्यांनी अनेक निबंधही लिहिले. अग्निमित्र, अमृतझरा, देवाचे दिवे, रूचिभेद आणि सारस्वताचे झाड, तारकांचे गाणे हे त्यांचे काही ललित निबंधसंग्रह होत. लोकनायक बापूजी अणे यांच्या जन्मशताब्दीच्या वेळी त्यांनी लोकनायकांचे वाङ्मय स्वखर्चाने प्रकाशित केले, ही त्यांची एक विशेष उल्लेखनीय कामगिरी होय. त्यांनी संपादिलेल्या पुस्तकांमध्ये शिक्षणविचार, यशोधन, त्रिविक्रम (3 खंड) यांचा समावेश होतो.
हेही वाचा – अगं अगं म्हशी… सगळ्यात इनोव्हेटिव्ह कल्पना!
शेवाळकरांनी अनेक वाङ्मयीन-सांस्कृतिक-शैक्षणिक संस्थांतून विविध पदांवर कार्य केले. विदर्भ साहित्य संघाचे ते सातत्याने नऊ वर्षे अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा (उपाध्यक्ष) महाराष्ट्र साहित्य परिषद (उपाध्यक्ष) या संस्थांचे ते पदाधिकारी होते. साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ अशा शासकीय मंडळांवरही त्यांनी सदस्य म्हणून काम केले. 1994 मध्ये पणजीत (गोवा) झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांत साहित्य धुरंधर पुरस्कार, बॉस्टन, अमेरिका, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानाचा कुसुमाग्रज पुरस्कार, मानद वाङ्मयपंडित (डी.लिट्.), नागपूर विदयापीठ, विदर्भ भूषण पुरस्कार, मुंबई, ज्ञानेश्वर पुरस्कार, पुणे, नागभूषण पुरस्कार आदींचा समावेश होतो. 3 मे 2009 रोजी नागपूर येथे त्यांचे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – आयुष्यात काहीतरी मोठा बदल होण्याची शक्यता आहे. प्रेम, करिअर, पैसा, आरोग्य, कुटुंब, अशा कोणत्यातरी आघाडीवर हा बदल बघायला मिळेल. सकारात्मक दृष्टिकोनाने बदल स्वीकारा. कोणत्याही प्रकारचे ताण घेऊ नका. आज बाहेर जेवण्याचे टाळा. अन्नातील काही घटक बाधण्याची शक्यता आहे.
वृषभ – आजचा दिवस वृषभ राशीच्या जातकांसाठी फलदायी ठरण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात चढ-उतार येत राहतील. चांगल्या करिअरसाठी नवीन ध्येये निश्चित करावी लागतील, अन्यथा नुकसान सहन करावे लागेल. उन्हात फिरताना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. डोळ्यांचे आरोग्य सांभाळा.
मिथुन – तुमच्या जीवनशैलीत योग्य आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यासारख्या उत्तम सवयींचा समावेश करा. नोकरीच्या ठिकाणी बॉसकडून पाठिंबा मिळेल. तुमचे कौटुंबिक जीवन देखील आज उत्तम असेल. घरातील वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तम यश मिळेल.
कर्क – दिवस तुमच्यासाठी उत्तम जाईल. व्यावसायिकांना चांगला सौदा मिळू शकतो. नफ्याचे प्रमाणही वाढेल. आज गरज पडल्यास विश्रांती घ्यायला प्राधान्य द्या. ताण कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा. आजचा विद्यार्थ्यांनी अभ्यासात विशेष परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे.
सिंह – नोकरीच्या ठिकाणी तसेच व्यावसाच्या बाबतीत दिवस साधारण आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत विचार करून, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन मगच पुढे जा. कुटुंबासोबत थोडा वेळ घालवणे फायदेशीर ठरेल. आरोग्याकडे लक्ष द्या. तुमचे शरीर देत असलेल्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. वैद्यकीय सल्ला अवश्य घ्या. आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा.
कन्या – कन्या राशीच्या जातकांच्या आयुष्यात आज मोठे चढ-उतार येतील. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. व्यावसायिकांनी आजच्या दिवशी वाटाघाटी करताना काळजी घ्यावी, अन्यथा भविष्यात मोठे नुकसान सहन करावे लागले.
तुळ – आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य राहणार आहे. कामाच्या जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करा. भविष्यात जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. मानसिकदृष्ट्या त्यासाठी तयार रहा. काही जातकांचे अनावश्यक खर्च वाढू शकतात, ज्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो.
हेही वाचा – आरू मुसमुसत उभी होती अन् शिव…
वृश्चिक – जीवनाच्या सर्व क्षेत्रात यश मिळविण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. आजचा दिवस नवीन सुरुवात करण्याचा आणि समोर आलेल्या संधींचा फायदा घेण्याचा आहे. बदलासाठी तयार रहा आणि नवीन आव्हाने स्वीकारा. कौटुंबिक जीवनात जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो शांत राहण्याचा सल्ला रहा.
धनु – काही जातकांच्या घरात आणि कुटुंबात उत्सवाचे वातावरण असू शकते. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास देखील शक्य आहे. पैशाचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. काही जातकांसाठी आजचा दिवस संमिश्र असू शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर, फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक ठरेल.
मकर – आज स्वतःला प्राधान्य देण्याकडे लक्ष केंद्रित करा. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम करा. आजचा दिवस सकारात्मक उर्जेने भरलेला असेल. त्याचा उपयोग करून कामे हातावेगळी करा. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. मोठी गुंतवणूक करू शकता. वाहन खरेदीचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
कुंभ – आजच्या दिवशी वादविवाद टाळा. जीवनात संतुलन साधण्याचा प्रयत्न करा. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. कामातून विश्रांती घेणे देखील महत्त्वाचे आहे, हे विसरू नका. आज कुटुंबातील इतरांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे कामे हातावेगळी करता येतील. मानसिक आरोग्यासाठी योगसाधना उपयोगी पडेल.
मीन – आजचा दिवस काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी आणि बदल स्वीकारण्यासाठी एक उत्तम दिवस आहे. सकारात्मक मानसिकतेने तुम्ही आव्हानांना संधींमध्ये बदलू शकता. तुमचा फोकस कायम सकारात्मक ठेवा. मानसिक कणखरतेची आज परीक्षा बघितली जाण्याची शक्यता आहे. डोळ्यांचे आरोग्य सांभाळा. डोळ्यांची आग होत असेल तर गार पाण्याने डोळे धुवा.


