Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळ शिक्षण

    April 14, 2026

    Dnyaneshwari : मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहुनी अंतरंगु…

    April 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 एप्रिल 2026

    April 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, April 14
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » फाटका अन् मोठ्या हॉटेलमधली मेजवानी…
    ललित

    फाटका अन् मोठ्या हॉटेलमधली मेजवानी…

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 24, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखन, फाटका कमिशनर, फाटकाची पार्टी, गरीब मुलांची पार्टी, गरीब मुलांची माणुसकी, गरीब मुलांची इडली पार्टी, हॉटेलवाल्याची मग्रुरी, वेटरची दादागिरी, गरीब मुले आणि पोलीस कमिशनर,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दिलीप कजगांवकर

    रविवारची सकाळ… आठ वाजले होते. सुटीचा दिवस असल्याने पुणेकर आरामात उठतात आणि नाश्ता बाहेरच करतात… त्यामुळे एफ.सी. रोड तसा मोकळाच होता. नेहमी आत शिरायला जागा नसलेले खवय्यांचे आवडते रेस्टॉरंट खवय्यांच्या प्रतीक्षेत होते.

    साधा पायजमा, फाटलेला फुलबाह्यांचा शर्ट, डोक्यावर मळलेली टोपी, पायात अगदी साध्या चपला आणि पाठीवर भलीमोठी सॅक घेतलेल्या एका इसमाने रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केला. नेहमीच्या आकर्षक, आधुनिक तरुणाईच्या तुलनेत तो फाटका माणूस होता.

    “काय हवं तुला?” वेटरने विचारले.

    “माझे काही मित्र येणार आहेत, मग ऑर्डर देतो,” फाटक्या माणसाने सांगितले.

    पाच मिनिटांनी फाटका बाहेर गेला. “बरं झालं, घाण गेली,” म्हणत वेटरने फाटका बसलेली खुर्ची डेटॉल टाकून स्वच्छ केली. दोन-तीन मिनिटांत एकामागून एक अशा दहा रिक्षा आल्या. रिक्षांतून हाफ चड्डी, फाटलेले तसेच मळलेले शर्ट, बनियन घातलेली दहा-बारा वयोगटातील मुलं उतरली आणि ती तीस-पस्तीस मुलं मोठ्या दिमाखात फाटक्याच्या मागे रेस्टॉरंटमध्ये शिरली.

    “ही गर्दी इथे कशाला?” मॅनेजरने विचारले.

    “चहा आणि नाश्त्यासाठी,” फाटका म्हणाला.

    “हे रेस्टॉरंट महाग आहे, तुम्हाला परवडणार नाही. तुम्ही दुसरीकडे जा,” मॅनेजरने आग्रहाने सुचविले.

    “आम्हाला इथेच खायचं, अगदी पोटभर. चालेल ना काका?” मुलांनी फाटक्याला विचारले.

    “हो, हो… जे हवं ते खा, अगदी भरपेट खा,” फाटक्याने प्रेमाने सांगितले.

    “भाऊ, खूप पैसे लागतील, दुसरीकडे जा,” म्हणणाऱ्या मॅनेजरला फाटक्याने विनवणी केली, “साहेब, मुलांना इथेच खायचं आहे. नाही म्हणू नका.”

    हेही वाचा – आभास… की वास्तव?

    तेवढ्यात एक दांडगा वेटर आला आणि दरडावून म्हणाला, “चला निघा इथून मुकाट्याने, नाहीतर मला तुम्हाला घालवावं लागेल.”

    मुलं घाबरून म्हणाली, “काका, आम्हाला दुसरीकडे चालेल.”

    दांडग्या वेटरकडे दुर्लक्ष करत फाटका म्हणाला, “मी आहे ना, घाबरता कशाला? वेटर, गरम काय मिळेल?”

    “गरमागरम फटका मिळेल,” म्हणत अंगावर धावून आलेल्या वेटरचा हात फाटक्याने लीलया मागे केला. फाटका मजबूत आहे हे वेटरला जाणवले.

    “मॅनेजर साहेब, फाटका नक्कीच गुंड आहे. पोलीस आले की पळेल,” वेटर म्हणाला.

    आता तरुण-तरुणींची रोडवर हालचाल जाणवू लागली होती. फाटक्याच्या हाफ चड्डीतल्या गॅंगला पाहून रेस्टॉरंटमध्ये शिरणाऱ्या दोन आधुनिक तरुणी “शी बाई” म्हणत नाक मुरडत परतल्या होत्या. कस्टमरने असे परतणे रेस्टॉरंटच्या लौकिकाला धक्का पोहोचवणारे होते.

    मॅनेजरने पोलीस स्टेशनला फोन करून, “इन्स्पेक्टर साहेब, लवकर या,” असे फाटक्याला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात सांगितले.

    “काका, ते साहेब पोलिसांना बोलवत आहेत. आपण निघू या,” मुलं घाबरली होती.

    “वेटर, सगळ्यांसाठी इडली आणा,” फाटक्याचा आवाज कणखर होता. नाईलाजाने वेटरने इडली आणायला सुरुवात केली आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब दोन पोलिसांसह आले. मुलांनी घाबरून इडली खाणं थांबवलं.

    “मुलांनो, घाबरू नका. आरामात खा. वेटर, बघताय काय? पटपट इडली द्या. मुलांनो, यानंतर मसाला डोसा की सँडविच?”

    “ए, काय नाव रे तुझं? कसला माज आला तुला?” फाटक्याची कॉलर पकडायला आलेल्या इन्स्पेक्टरला फाटक्याने केवळ एका हाताने थोपविलेले बघून दोन्ही पोलीस पुढे आले.

    “मुलांना शांतपणे खाऊ द्या,” म्हणत फाटक्याने तिघांनाही मागे जा आणि गप्प बसा म्हणून धमकावले.

    फाटका सराईत गुंड असणार याची इन्स्पेक्टरला जाणीव झाली आणि फाटक्याला समजू नये म्हणून बाहेर जाऊन त्यांनी एसीपी साहेबांना फोन करून मोठी कुमक मागवली.

    “मी स्वतःच येतो चौघांना घेऊन,” साहेब म्हणाले.

    “वेटर, व्हेज सँडविच आणा,” निर्विकारपणे फाटक्या म्हणाला.

    काका घाबरले नाहीत, हे बघून मुलं निवांत झाली.

    “वेटर, होऊ दे त्याच्या मनासारखं. एसीपी साहेब आले की, तो कसा गोगलगाय बनतो ते बघालच,” इन्स्पेक्टर म्हणाला.

    “एसीपी येणार?” फाटक्याने विचारले.

    “हो, अनेक पोलिसांना घेऊन तुला चारी मुंड्या चीत करून लॉकअपमध्ये टाकायला.”

    “एसीपी येत आहेत? मला वॉशरूमला जायला हवं. वेटर, वॉशरूम कुठे आहे?” फाटक्याने विचारले.

    “थांब थोडं,” इन्स्पेक्टर ओरडून म्हणाले.

    “इन्स्पेक्टर, मला कपडे बदलले पाहिजेत.”

    “साहेब येतात समजल्यावर कपड्यांतच झालेलं दिसतंय,” इन्स्पेक्टर मोठ्याने म्हणाले.

    “ये पटकन. तू पळून जाऊ नये म्हणून दोन पोलीस येतील तुझ्याबरोबर. याद राख, चालाखी करू नकोस,” इन्स्पेक्टरने दम भरला.

    आता मात्र मुलं घाबरली होती. आपल्याला पकडून नेलं तर?

    “साहेब, आम्ही जाऊ का?” खाणं अर्धवट सोडत त्यांनी विचारले.

    “घाबरू नका. आम्ही तुम्हाला काहीही करणार नाही,” मुलांच्या आर्त चेहऱ्यांकडे बघत इन्स्पेक्टर नरमले.

    मॅनेजर पुढे होत म्हणाले, “मुलांनो, तुमची काहीच चूक नाही. तुम्ही शांतपणे खा. मी तुमच्याकडून पैसे घेणार नाही.”

    मुलांच्या मनावरील ताण कमी झाला, पण तरीही त्या काकांचं काय? त्यांना जेलमध्ये टाकतील का? हे विचार त्यांना त्रस्त करत होते.

    “कुठे आहे तो गुंड?” म्हणत साहेब आत शिरले.

    तेवढ्यात मागून आलेल्या गणवेशधारी मोठ्या साहेबांना सॅल्युट मारत एसीपी म्हणाले, “साहेब, नक्कीच तुम्ही त्या गुंडांच्या मागे असणार. तुम्ही कधी आलात?”

    “इन्स्पेक्टर, आणा त्याला आणि साहेबांच्या हवाली करा,” एसीपी म्हणाले.

    इन्स्पेक्टर खाली मान घालून उभे होते.

    “इन्स्पेक्टर!” साहेबांचा आवाज वाढला होता.

    “एसीपी, तुमचे इन्स्पेक्टर मला गुंड समजले,” मोठ्या साहेबांनी गौप्यस्फोट केला.

    “इन्स्पेक्टर, हे मुंबई क्राइम ब्रँचचे कमिशनर साहेब आहेत,” एसीपींनी सांगितले.

    इन्स्पेक्टर, पोलीस, मॅनेजर आणि वेटर खजील झाले.

    “कमिशनर साहेब, तुम्ही आधीच का नाही सांगितलं? किती अपमानास्पद वागणूक दिली आम्ही तुम्हाला. आम्हाला माफ करा,” मॅनेजर साहेब आणि इन्स्पेक्टर म्हणाले.

    आपले काका मोठ्ठे साहेब आहेत, हे समजल्यावर मुलांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या.

    “मॅनेजर साहेब, सगळ्यांसाठी मस्त चहा सांगा आणि ऐका मी काय सांगतो ते.”

    सुमारे वीस वर्षांपूर्वी मी पुण्याला आयपीएसची तयारी करत होतो. परिस्थिती अगदी सामान्य होती. माझी लहानशी रूम वडारवाडीसमोर होती. तिथे राहणाऱ्या मुलांच्या व्रात्य वागण्याचा, गचाळ राहण्याचा मी तिरस्कार करायचो. एके दिवशी क्लासहून परत येताना मी सायकलवरून पडलो. मला खूप लागलं होतं. येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे मदतीची याचना केली, पण कुणीही थांबलं नाही. मला मदत केली ती वडारवाडीतील मुलांनी—ज्यांचा मी सदैव तिरस्कार करायचो. दोन-तीन दिवसांनी मला बरं वाटायला लागलं. तेव्हा मी त्या मुलांना पैसे देऊ केले, पण त्यांनी ते घेतले नाहीत.

    हेही वाचा – बायकोची साडी खरेदी अन् मी

    “दादा, आम्हाला एफ.सी. रोडवरील ते प्रसिद्ध रेस्टॉरंट बघायचं आहे. काही खायचं नाही, फक्त बघायचं आहे.”

    मी त्या दोघांना याच रेस्टॉरंटपाशी घेऊन आलो, पण तेव्हाच्या मॅनेजर साहेबांनी सांगितलं, “तू एकटा आत जा, पण या मुलांना मी आत जाऊ देणार नाही.”

    मी विनंती केली, पण ते ठाम होते.

    नशिबाने मी आयपीएस परीक्षेत टॉप केलं. मागच्या वर्षी कमिशनर बनलो. मागच्या रविवारी मीटिंगसाठी आलो होतो. या रेस्टॉरंटसमोरून जाताना तो वीस वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला. आज सकाळी पुण्याला आलो. कमिशनरच्या वेशात असतो तर मुलं घाबरली असती, म्हणून एक फाटका माणूस बनलो.

    “साहेब, यापुढे असं कधीच होणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो,” मॅनेजर म्हणाले.

    “तुमच्याबरोबर आणि मुलांबरोबर एक फोटो काढू सर?”

    “अवश्य, पण तो मलाही पाठवायचा हं,” दिलखुलास हसत कमिशनर साहेब म्हणाले. मुलांना रिक्षात बसवून, रिक्षाचे पैसे आधीच देऊन, सर्वांना बाय करत जायला निघताना रेस्टॉरंटमधील त्या दांडग्या वेटरला जवळ घेऊन, “मित्रा तुला माफ केलं,” असं म्हणायला ते विसरले नाहीत.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आशा उद्याच्या, डोळ्यात माझ्या…

    April 13, 2026 ललित

    शिव आणि आरूचं लग्न झालं, पण….

    April 13, 2026 ललित

    एक थी बुलबुल…

    April 12, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आशा उद्याच्या, डोळ्यात माझ्या…

    By पराग गोडबोलेApril 13, 2026

    जवळपास दोनएक महिन्यांपूर्वीच गोष्ट. शनिवार होता आणि दुपारच्या वेळेस ऑफिसला चाललो होतो. सुट्टीच्या दिवशी दुपारी,…

    शिव आणि आरूचं लग्न झालं, पण….

    April 13, 2026

    एक थी बुलबुल…

    April 12, 2026

    किती फाटतो जीव सगळ्यात यात…

    April 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळ शिक्षण

    April 14, 2026

    Dnyaneshwari : मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहुनी अंतरंगु…

    April 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 एप्रिल 2026

    April 14, 2026

    नावात तर सर्वकाही आहे, पण सांगायचं कसं?

    April 13, 2026

    आशा उद्याच्या, डोळ्यात माझ्या…

    April 13, 2026

    Ayush Shetty : फायनल हरला, पण इतिहास घडवला…

    April 13, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 267
    • अवांतर 182
    • आरोग्य 100
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 384
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 194
    • मैत्रीण 18
    • ललित 551
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळ शिक्षण

    April 14, 2026

    Dnyaneshwari : मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहुनी अंतरंगु…

    April 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 एप्रिल 2026

    April 14, 2026
    Most Popular

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळ शिक्षण

    April 14, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.