Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » बदलत्या जीवनशैलीने निर्माण केलेली भीती!
    ललित

    बदलत्या जीवनशैलीने निर्माण केलेली भीती!

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 11, 2026No Comments8 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, तन्वीची भीती, मयूरची भीती, तन्वी मयूर, भावाबहिणीची भीती, आईचा धाक, पेपरमधील बातम्या, प्रेमळ आई, आईची भीती, आईवरील दडपण, भीतीत जगणारी आई, तन्वी आई प्रेम, मयूर आई प्रेम, शैलेशचा समंजसपणा, दिखाऊ जीवनमान, दिखाऊ जीवनशैली, बदललेली जीवनशैली,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दीपक तांबोळी

    भाग – 3

    कामावरून आलेली तेजलचा पाय, मयूरने टाइल्सवर सांडलेल्या सरबतावरून घसरला आणि ती जोरात कमरेवर आपटली. “आई गंSSS” ती किंचाळली तशी तन्वी धावत आईजवळ गेली. टीपॉयजवळ सांडलेलं सरबत तिला दिसलं, तशी मयूरची आता काही खैर नाही, हे तिच्या लक्षात आलं आणि ती थरथर कापू लागली. तेजलच्या हाताला ते चिकट सरबत लागलं. त्याचवेळी मयूरच्या हातातल्या सरबताच्या ग्लासकडे तिचं लक्ष गेलं आणि आपण कशावरून घसरलो, हे तिच्या लक्षात आलं. संतापाने तिचा चेहरा वाकडा झाला.

    “कार्ट्या तू सांडलं ना हे सरबत?” तेजल जोरात किंचाळली. ती उठून उभी मयूर घाबरून थरथर कापू लागला. तेजलने समोरची स्टिलची पट्टी उचलली अन् मयूरला डाव्या हाताने धरून ती त्याच्या पाठीवर सपासप मारू लागली. वर्तमानपत्रातल्या बातम्या तन्वीच्या डोळ्यासमोर आल्या आणि आई आज आपल्या लाडक्या भावाला मारून टाकणार तर नाही ना, अशी तिला भीती वाटू लागली. त्या कल्पनेने तिचे हातपाय लटपटू लागले. अचानक कसल्याशा उर्मीने ती आईजवळ धावत गेली आणि तिचा पट्टी घेतलेला हात धरून ती रडतरडत म्हणाली,

    “आई नको मारू ना. आई लहान आहे गं तो… प्लीज, आई नको मारू ना त्याला!”

    तेजलने तिच्या हाताला हिसका दिला आणि ती परत मयूरला मारणार तशी तन्वी त्याला पाठीशी घेऊन तिच्या समोर उभी राहिली आणि त्वेषाने म्हणाली, “तुला मारायचंच आहे ना तर, मला मार. मारून टाक मला. पण त्याला मारू नको. किती छोटा आहे गं तो…”

    तिच्या “मारून टाक” शब्दांवर तेजल चमकली. पट्टी घेतलेला तिचा हात हवेतच राहिला…

    “काय म्हणालीस तू? मारून टाक म्हणालीस ना?”

    “हो. तेच म्हणाले मी. घेऊन जा मला गच्चीवर आणि फेकून दे मला खाली. पण त्याला नको मारू ना आई…”

    “कारटे…” असं म्हणून तेजल तिला मारणार तेवढ्यात दारावरची बेल वाजली. त्या आवाजाने तन्वी आणि मयूर दोघंही क्षणभर रडायचे थांबले.

    तेजलने पट्टी कपाटाच्या ड्रॉवरमध्ये टाकली आणि तन्वीकडे पाहून ओरडली, “जा, बघ कोण आलंय ते…”

    तन्वीने मयूरला उचलून घेतलं आणि दरवाजा उघडून पहाते तो शैलेश उभा होता. त्याला पहाताच दोन्ही मुलं “बाबाSSS”  असं जोरात ओरडून त्याला बिलगली आणि ढसाढसा रडू लागली. शैलेशने मयूरला उचलून घेतलं तसा त्याने त्याच्या गळ्याला मिठी मारली. शैलेशने तन्वीला जवळ घेऊन आत आणलं. सोफ्यावर बसवलं. घरभर पसरलेल्या काचा पाहून त्याने तेजलला विचारलं,

    “काय झालं तेजू? मुलं रडताहेत. सगळीकडे काचा पडल्याहेत. काय आहे हे?”

    “त्यांनाच विचार. नालायक कुठले! फार शेफारून ठेवलंय तू शैलेश त्यांना,” तेजल संतापून म्हणाली.

    तिच्याकडे दुर्लक्ष करून त्याने तन्वीला विचारलं, “काय झालं तन्वी बेटा?”

    तन्वीला भडभडून आलं. रडतरडतच ती म्हणाली, “मयूरच्या हातून टीपॉयजवळ सरबत सांडलं. आई त्यावरून घसरून पडली. तर, ती ना मयूरला पट्टीने जोरजोरात मारायला लागली. मी तिला मारू नकोस म्हणत होते, पण ती ऐकतच नव्हती. ती मयूरला मारून टाकणार होती…”

    हेही वाचा – भीती… दोन चिमुरड्यांच्या मनातली!

    ते ऐकून शैलेशला धक्काच बसला. त्याने चमकून तेजलकडे पाहिलं… त्याच्या नजरेतले भाव ओळखून तेजल म्हणाली, “काही काय बोलतेस गं? मारून टाकण्यासाठी तुम्हाला जन्म दिला का मी?”

    “हो. तू आम्हाला नेहमी म्हणतेस की, तुम्हाला गच्चीवर नेऊन खाली फेकून देईन…”

    “बेटा ती असं बोलली म्हणून करणार थोडीच आहे? अशी कोणती आई आपल्या मुलांना मारून टाकते?”

    “हो मारते. मी वाचलंय पेपरमध्ये!”

    असं म्हणून तन्वी कपाटाजवळ गेली. एक ड्रॉवर उघडून तिने त्या बातम्यांचे पेपर्स शैलेशच्या हातात दिले.

    “हे पाहा, वाचा.” तन्वीने बातमी उघडून दाखवली.

    “चाकूचे सपासप वार करून आईने सहा वर्षांच्या चिमुरडीचा जीव घेतला…” शीर्षक वाचूनच शैलेशच्या अंगावर काटा आला. ती पूर्ण बातमी वाचून तर त्याला कसंतरीच झालं. त्याने दुसरी बातमी वाचली “प्रियकराशी भांडण झाल्यामुळे महिलेने दोन वर्षांच्या मुलाला ट्रकखाली फेकले…”

    “बापरे!” घाबरून शैलेशच्या तोंडातून शब्द निघाला. या बातम्या आपण वाचायला विसरलो किंवा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, हे त्याच्या लक्षात आलं. पूर्ण बातमी वाचल्यावर शैलेशने पेपर्स तेजलकडे सरकवले. अस्वस्थ होऊन तो म्हणाला,

    “याला क्रूरता नाही तर काय म्हणायचं? पोटच्या पोरांना मारून टाकण्याइतका संताप आणि धैर्य या मातांमध्ये येतं तरी कसं? पूर्वी बाप अमानुष होऊन लेकरांना मारून टाकायचा आजकाल आईसुद्धा तेच करतेय. याच नाही अशा अनेक बातम्या आजकाल वाचायला मिळताहेत. “दोन लहानग्या मुलांना विहिरीत फेकून आईने आत्महत्या केली…”, “तीन मुलांना विष पाजून नवरा बायकोने आत्महत्या केली”, “अनैतिक संबंधात अडसर म्हणून आईनेच मुलाचा खुन केला” अशा बातम्या पेपर्समध्ये सर्रास वाचण्यात येताहेत. काय चाललंय काय हे आजकाल? नऊ महिने पोटात वाढवलेल्या या निष्पाप बालकांना मारण्याचं पाप या आयांकडून होतंच कसं? समाज अनैतिकतेकडे वेगाने धावतोय तेजू. वर्तमानपत्रं, टीव्ही, वेबसीरिज पाहा… सगळीकडे अनैतिकतेचं भरभरून प्रदर्शन केलं जातंय. अशा बातम्यांचं शीर्षक वाचून त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण या छोट्या मुलांच्या मनात त्यामुळे आईवडिलांबद्दल भीतीच निर्माण होणार आहे. ज्यांच्या आड लपल्याने सुरक्षित वाटतं, जे आहेत म्हणून जगातल्या संकंटांचा सामना करण्याचं धैर्य येतं त्यांनीच जीव घ्यावा यासारखं दुर्देव जगाच्या पाठीवर दुसरं कुठे नसेल. का नाही भिणार ही मुलं तेजू? त्यातून तू अशी त्यांना मारणार असशील आणि गच्चीवरुन फेकून देईन, असं वारंवार म्हणत असशील तर, त्यांना तुझी भीती वाटणारच!”

    तेजलही त्या बातम्या वाचून एकदम सुन्न झाली. त्या वाचून तिला गहिवरून आलं.

    “तुझं म्हणणं खरंय शैलेश. पण मी काय करू? मी स्वतः रोज भीतीखाली मरत असते. सकाळी थोडा उशीर झाला की नेहमीची लोकल निघून जाईल याची भीती, उशिरा पोहचलं तर बॉस रागवेल का याची भीती, हॉस्पिटलमध्ये कॅशचं काम माझ्याचकडे आहे. ती कॅश मोजताना चूक तर नाही होणार याची भीती, पेशंट मेला तर पेशंटचे नातेवाईक आपल्याला मारणार नाही ना याची भीती… मयुर दुपारी घरी एकटाच असतो. त्याला कुणी पळवून तर नेणार नाही, याची भीती… लिफ्टमधून ये जा करताना किंवा घरातही त्याला काही झालं, लागलं तर आपल्या अपार्टमेंटमधलं कुत्रंसुद्धा त्याला पाहायला येणार नाही ही भीती… परतताना बऱ्याचदा लोकलने लोंबकळून यावं लागतं, हात सटकून मी मरणार तर नाही याची भीती… मला या गोष्टींची सवय नाही रे शैलेश. सहा महिन्याअगोदर माझं आयुष्य खूप छान होतं. आज मात्र मी नेहमी भीतीखाली, दडपणाखाली वावरत असते!”

    बोलताबोलता ती एकदम हमसून हमसून रडू लागली.

    “तेजू एक काम कर, सोडून दे ती नोकरी!”

    त्याने तसं म्हणताच ती रडणं थांबवून त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागली.

    “खरंच म्हणतोय मी. त्या दहा हजारांकरता इतकं मनस्वास्थ्य बिघडवून घ्यायची खरंच गरज नाही.”

    “पण मग खर्च भागणार कसे?”

    “तुला सांगू, माझ्यासोबत काम करणाऱ्या बिहारी जयकुमारलाही माझ्याइतकाच पंचवीस हजार पगार मिळतो. घरात आठजण आहेत. म्हणजे आपल्यापेक्षा दुप्पट अन् कमावणारा हा एकटा! पण सगळं व्यवस्थित चालतं. कशाला पाहिजे या महागड्या इंग्लिश शाळा जिथे लाखो रुपये फी घेऊन पालकांना लुबाडलं जातं. तुला माहितेय मी जिल्हा परीषदेच्या शाळेत शिकलो. मीच नाही जगातले अनेक नामवंत शास्त्रज्ञ खेड्यातल्या पत्री शाळेत शिकलेत. मग आपणच का एवढा मुलांना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकवायचा अट्टाहास करतो? उलट, मी पाहिलंय की, गरीबांची नगरपालिकेच्या शाळेत शिकणारी मुलं आयएएस, आयपीएस होतात आणि इंग्लिश शाळांमधील मुलं कुठेतरी सामान्य दर्जाची नोकरी करत असतात. प्रश्न जिद्दीचा आणि दुर्दम्य महत्वाकांक्षेचा असतो. ती असली की, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही पुढे जाऊ शकता. तुला माहीत नसेल, पण जितके पैसे मला सॉफ्टवेअर इंजीनिअर व्हायला लागले, तेवढे पैसे आपण या मुलांच्या वार्षिक शिक्षणासाठी खर्च करतोय. याची काहीच गरज नाही. आपण त्यांना एखाद्या साध्या शाळेत टाकू. कशाला हवेत हे महागडे मोबाईल? कोणता फायदा घेतो, आपण त्या स्मार्ट फोनचा चॅटिंग करण्याव्यतिरिक्त! दर आठवड्याला आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो. बंद करूया तेही… आपल्या लहानपणी आपण कधी गेलो होतो हॉटेलमध्ये? माझ्या वडिलांना फक्त दोन हजार पगार होता. आईवडील आणि आम्ही पाच भावंडं. कधी गरीबी आहे, असं वाटलं नाही. कारण गरजा कमी होत्या. कसले शौक नव्हते…”

    “पण आता गरजा वाढल्या आहेत शैलेश!”

    “नाही तेजू. आपण त्या वाढवल्या आहेत. ज्यांच्यावाचून आपलं काही बिघडत नाही, त्यांना आपण जीवनावश्यक बनवून टाकलंय…”

    तेजल चूप बसली, पण शैलेश म्हणाला त्या गोष्टींवर ती गांभिर्याने विचार करू लागली.

    “ठीक आहे शैलेश. सोडते मी नोकरी. पाच-सहा महिने करून बघू तू म्हणतोय तसं…”

    “माझ्या मनात एक विचार आहे तेजू. आपल्या सोसायटीतली 10-12 मुलं त्यांच्या आयांच्या नोकऱ्यांमुळे पाळणाघरात किंवा चाईल्ड केअर सेंटरमध्ये जातात. असं चाईल्ड केअर सेंटर आपण आपल्या घरातच सुरू केलं तर, महिन्याला वीस पंचवीस हजार तुला घरबसल्या मिळतील. हे जे आपण आपल्या लहान मुलांच्या जबाबदारीवर घर सोडून जातो, ते बंद होईल. आपल्या मुलांनाही खेळायला मुलं मिळतील.”

    हेही वाचा – भीती… लेक तन्वीचं वक्तव्य ऐकून शैलेश चमकला!

    तेजलचा चेहरा उजळला. ती आनंदाने म्हणाली, “हो चालेल. छान आयडिया आहे.”

    “पण त्यासाठी तुला हा तुझा चिडका, सतत हुकूम देणारा स्वभाव बदलावा लागेल…” शैलेश चाचरत म्हणाला.

    “शैलेश मी अगोदर तशी नव्हते. गेल्या सहा महिन्यांत मी जास्त चिडकी झालेय ते या नोकरीपायी…” ती रागावून म्हणाली.

    “बघ, लगेच तुला राग आला. चाईल्ड केअर सेंटर चालवायचं असेल तर, तुला खूप पेशन्स ठेवावे लागणार आहेत. मुलांवर चिडत राहिलीस तर एकही पालक तुझ्याकडे मुलांना पाठवणार नाही.”

    “ओके बाबा… मी प्रयत्न करेन”

    तेजलचं लक्ष मयूरकडे गेलं. तो अजून वडिलांच्या मांडीवर त्यांच्या गळ्यात हात टाकून बसला होता.

    “ये रे बेटा माझ्याकडे…” तिने त्याच्याकडे हात केले.

    “मी नाही येणार. तू मला किती मारलं पट्टीने!”

    “आता नाही मारणार. ये रे माझ्या राजा…”

    “नाही. तू मला मारून टाकशील…” तो रडत म्हणाला

    त्याच्या बोलण्याने तिला भडभडून आलं, “तुझी शपथ. मी आता कधीच नाही मारणार. ये, हे बघ मी तुमच्यासाठी कॅडबरी आणलीय…” तिने पर्समधून कॅडबरी काढून त्याला दाखवली. त्याने प्रश्नार्थक नजरेने बापाकडे पाहिलं… “जा बेटा. आता आई शहाणी झालीये.” त्याने त्याला खाली उतरवलं. तो दबकत, घाबरत तिच्याकडे गेला. तिने त्याला लगेच उचलून छातीशी कवटाळलं. त्याच्यावर मुक्यांचा वर्षाव केला. मग तिचं लक्ष तन्वीकडे गेलं…

    “ये बेटा तनू…. तूही ये.”

    तन्वी जवळ गेल्यावर तिने तिलाही जवळ घेतलं.

    “मोठी आहेस म्हणून तुला खूप त्रास देते ना बेटा मी?” तिने रडत रडत विचारलं. तन्वीने मान डोलावली.

    “सॉरी बेटा… खूप करते गं तू. मयूरला सांभाळतेस, त्याची तयारी करून देतेस… माझी चिमुरडी पोर! सॉरी बेटा सॉरी. यानंतर तुलाही मी कधीच रागावणार नाही, मारणार नाही…” तेजल रडत होती. दोघा मुलांच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवत होती.

    शैलेश ते प्रेमळ दृश्य बघत होता. खऱ्या आईचं प्रेमळ रूप त्याला समोर दिसत होतं. टिपॉयवरच्या वर्तमानपत्रांकडे त्याची नजर गेली. आईचं विकृत, हिडीस रूप तेवढ्याच विकृतपणे समोर आणणाऱ्या त्या प्रसिद्धी माध्यमांचा त्याला संताप आला. त्याने ते उचलून त्यांचे तुकडे केले आणि डस्टबिनमध्ये टाकून दिले…

    समाप्त


    मोबाइल – 9209763049

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026 ललित

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026 ललित

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    By प्रणाली मंगेश महाशब्देApril 10, 2026

    “ए आई कसला मस्त वास येतोय गं भाजीचा!” कालच माहेरी आलेली मीना स्वयंपाकघरात आली. “ए…

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026

    ऑफिस मीटिंगमध्ये स्वत:लाच चिमटा काढला…

    April 9, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026

    Ayurveda : वसंतातील सामान्य आजार आणि प्रभावी घरगुती उपाय

    April 9, 2026

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 263
    • अवांतर 180
    • आरोग्य 99
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 379
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 192
    • मैत्रीण 17
    • ललित 546
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेक... आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    - मनोज शरद जोशी
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026
    Most Popular

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.