Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 03 फेब्रुवारी 2026

Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 03 फेब्रुवारी 2026

दर्शन कुलकर्णी

  • आज, दिनांक : 03 फेब्रुवारी 2026; वार : मंगळवार
  • भारतीय सौर : 14 माघ शके 1947; तिथि : द्वितीया 24:40; नक्षत्र : मघा 22:10
  • योग : शोभन 26:38; करण : तैतिल 13:11
  • सूर्य : मकर; चंद्र : सिंह; सूर्योदय : 07:12; सूर्यास्त : 18:31
  • पक्ष : कृष्ण; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
  • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ असेल. आरोग्य चांगले राहील आणि सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. व्यावसायिकांनाही हा दिवस फायदेशीर ठरेल, कोणत्याही नवीन उपक्रमात यश मिळेल. घरी एखादी शुभ घटना घडण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती देखील मजबूत राहील. आज एखाद्या जवळच्या आप्ताला भेटू शकाल.

वृषभ – आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, म्हणून स्वतःची काळजी घ्या. अनावश्यक वाद टाळा, विशेषतः कामाच्या ठिकाणी. नवीन काम सुरू करण्यापूर्वी जोडीदाराचा सल्ला घ्या, कुटुंबात मतभेद टाळण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही कौटुंबिक वादात शांत राहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून परिस्थिती आणखी बिकट होणार नाही.

मिथुन – लांबच्या प्रवासाचे योग आहेत, मात्र गाडी चालवताना सावधगिरी बाळगा. एखाद्या विशिष्ट कामात अपयश आल्याने अस्वस्थ होऊ शकता, परंतु लवकरच परिस्थिती सुधारेल. व्यवसायात तोटा होण्याची शक्यता आहे, म्हणून नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी सावधगिरी बाळगा. कौटुंबिक संबंधांमध्ये चढ-उतार येऊ शकतात.

कर्क – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. एखाद्या खास व्यक्तीशी भेट होऊ शकते, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे आणि एखाद्या मोठ्या कराराचा फायदा देखील होऊ शकतो. कुटुंबाशी सुसंवाद वाढेल, त्यातून तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. तीर्थयात्रेची शक्यता आहे.

सिंह – नोकरी शोधणाऱ्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबात शुभ घटना घडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. एखादा मोठा व्यवसाय करार तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करेल. नवीन वाहन खरेदीचा देखील योग आहे.

कन्या – आजचा दिवस चढ-उतारांचा असू शकतो. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. व्यवसायिकांनी मोठे धोके पत्करणे टाळावे, कारण नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि शांतपणे वागा. कायदेशीर बाबी आव्हान निर्माण करू शकतात.

तुळ – आज एखाद्या खास कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. आज कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल आणि परस्पर सहकार्य सुधारेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी सोपविली जाऊ शकते, सहकारी तसेच वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. खाण्यावर नियंत्रण ठेवा, जंकफूड टाळा.

हेही वाचा – लढा कायम इमोशनशीच…

वृश्चिक – आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ असेल. कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आणि नियोजित कामे पूर्ण होतील. नवीन प्रकारचे काम मिळू शकते, तो वेगळा अनुभव असू शकतो. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी निगडीत एका बड्या व्यक्तीची भेट होऊ शकते, त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळेल.

धनु – नवीन वाहन, घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. जर तुम्ही काहीतरी नवीन सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस हीच योग्य वेळ आहे. आज व्यवसायात उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडू शकतात. पण त्याचबरोबर नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करा, भविष्यात फायदा होईल.

मकर – आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक परिस्थितीचा आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो, म्हणून आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करा. व्यवसायात कोणतेही मोठे धोके पत्करणे टाळा, त्याऐवजी योग्य नियोजनावर भर द्या. अनोळखी लोकांना पैसे उधार देऊ नका. कुटुंबात मालमत्तेवरून वाद होऊ शकतो.

कुंभ – आज तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. व्यवसाय किंवा कौटुंबिक बाबींबद्दल काळजी वाटू शकते. जुन्या प्रकल्पांमध्ये समस्या उद्भवू शकतात, प्रतिस्पर्धी सक्रिय होऊ शकतात. पण मन:शांती ढळू देऊ नका. खंबीर राहा. कोणतीही मोठी गुंतवणूक करणे टाळा.

मीन – आजचा दिवस चांगला असेल. एखादा मोठा व्यवसाय करार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील आणि कुटुंबासह दूर सहलीवर जाण्याचा बेत आखू शकता. एखादी नवीन भागीदारी सुरू होऊ शकते, जी भविष्यात फायदेशीर ठरेल.


दिनविशेष

भारतीय रसायनशास्त्रज्ञ तिरूव्यंकट राजेंद्र शेषाद्री

टीम अवांतर

भारतीय रसायनशास्त्रज्ञ तिरूव्यंकट राजेंद्र शेषाद्री यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1900 रोजी कुली-तलाई (तमिळनाडू) येथे झाला. चेन्नईच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून त्यांनी रसायनशास्त्र विषयात त्यांनी पदवी संपादन केली. पुढे चेन्नईच्या रामकृष्ण मिशन संस्थेच्या विद्यालयात काही दिवस त्यांनी अध्यापन केले. हिवतापरोधी शोध आणि अँथोसायनिनाचे संश्लेषण या विषयांवरील प्रबंधाबद्दल मँचेस्टर विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी मिळाली.

शेषाद्री यांच्या संशोधनाचा मुख्य भर वनस्पतींपासून मिळणाऱ्या पदार्थांच्या रासायनिक अभ्यासावर होता. निरनिराळे रंग, औषधे, कीटकनाशके इत्यादी मिळविण्याच्या दृष्टीने मौल्यवान वनस्पतींतील क्रियाशील घटक अलग करून त्यांची रासायनिक वैशिष्ट्ये ठरविणे, त्यांच्या चाचण्या घेणे, त्यांची प्रयोगशाळेत कृत्रिम पद्धतीने निर्मिती करणे यासारखी महत्त्वपूर्ण संशोधने त्यांनी केली.

हेही वाचा – बल्लव! म्हातारी मेल्याचं दुःख नाही…

नोबेल पारितोषिक विजेते फ्रिट्‌स प्रेगल यांच्या ग्रात्स (ऑस्ट्रिया) येथील प्रयोगशाळेत काही काळ काम करण्याची शेषाद्री यांना संधी लाभली. एडिंबरो विद्यापीठाच्या वैद्यकीय रसायनशास्त्र विभागातही काही काळ त्यांनी काम केले. इंग्लंडमधील तीन वर्षांच्या वास्तव्यानंतर शेषाद्री कोईम्बतूर येथील ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन अधिकारी म्हणून दाखल झाले. भारत सरकारच्या विविध विभागांत तज्ज्ञ, लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो, युनेस्कोचे सल्लागार आणि करंट सायन्सचे अध्यक्ष म्हणून त्यांनी मौलिक कार्य केले. भारतातील अनेक विद्यापीठांनी त्यांना डी.एस्‌सी. ही सन्माननीय पदवी देऊन गौरविले. भारत सरकारच्या पद्मभूषण पुरस्कारासह त्यांना अनेक मानसन्मान आणि पुरस्कार लाभले. त्यांचा केमिस्ट्री ऑफ व्हिटॅमिन्स अँड हॉर्मोन्स हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. 27 सप्टेंबर 1975 रोजी त्यांचे निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!