Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    व्हेरिकोज व्हेन्स विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    August 8, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : बहु योगाभ्यासीं हांव, विजनाकडे धांव

    August 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, August 8
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » बल्लव! म्हातारी मेल्याचं दुःख नाही…
    ललित

    बल्लव! म्हातारी मेल्याचं दुःख नाही…

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 2, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, कांदा नवमी, समजूतदार बायको, जगदंबा पत्नी, मायाळू शारदा पत्नी, भोजनाचा बेत, कामाचा ताण, कार्यालयात कामाचा बोजा, बायकोची निराशा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पराग गोडबोले

    शनी वक्री असला की, काय होतं याची अनुभूती मी नुकतीच घेतली. असाच रविवारचा दिवस होता. दिवाळी नुकतीच संपली होती. गोडधोड, तेलकट, तुपकट, सगळं मनसोक्त हादडून झालं आणि मग बायकोने फर्मान काढलं. आता पुढचे पंधरा दिवस पोळी, भाजी आणि वरण-भात याशिवाय घरात काहीही शिजणार नाही. खूप पुरवले चोचले जिभेचे, आता सात्विक खा जरा!

    होय महाराजा, म्हणून मान तुकविण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हताच माझ्याकडे, तरी मी एक क्षीण असा प्रयत्न करून बघितला, पण तिचा नन्नाचा पाढा… मी हताश. रविवार असूनही हे असं? किती तो अन्याय…

    मी म्हणालो, “काही नाही तर, मस्त आमटी तरी कर की! निदान चरचरीत आमटी-भात तरी खाईन म्हणतोय…” दोन क्षण शांतपणे बघितलं माझ्याकडे आणि म्हणाली, “माझी पोळी भाजी करून झाली आहे. एवढं वाटतंय ना खावंसं, तर स्वतः बूड हलव की जरा. नुसता तो पेपर नाहीतर मोबाइल घेऊन अखंड तंगड्या पसरून बसून राहायचं. बायको आपली राबतेय स्वयंपाकघरात… नुसत्या फर्माईशी करायला लागतंय काय?”

    च्यायला, ही भलतीच आफत. करायला जावं एक आणि भलतंच काहीतरी लचांड मागे लागावं, असं बऱ्याच वेळा माझ्या बाबतीत घडतं. तसंच आज पण घडत होतं.

    मी पण काही कच्च्या गुरूचा चेला नव्हतो. ठासून म्हणालो तिला, “मला आव्हान देऊ नकोस, मी ठरवलं तर काहीही करू शकतो. मला मॅगी करता येते, ऑम्लेट करता येतं, कुकर लावता येतो, फोडणीची पोळी करता येते,  यह आमटी-भात क्या चीज है? चुटकीसरशी करून दाखवेन, आहेस कुठे? पण एक अट आहे, मी माझी पाककला सिद्ध करत असताना तू लुडबूड करायची नाहीस अधेमधे. कबूल असेल, तर आज मस्त बेत जमवतो!”

    चांगलं आहे. नाहीतरी मला जरा मैत्रिणीकडे जायचं आहे. तिच्याकडे साड्या घेऊन तिची मैत्रिण येणाराय विकायला. मी जातेच कशी. आत्ता अकरा वाजतायत,  येईन एक वाजेपर्यंत. आहेत दोन तास तुझ्याकडे, काय वाट्टेल तो गोंधळ घाल, पण मला एकही फोन करायचा नाही, सांगून ठेवतेय! कामवाल्या मावशी पण येऊन गेल्यात, म्हणजे तुला त्रास द्यायला कोणीच नाहीये. पूर्ण स्वातंत्र्य तुला…”

    माझा निश्चय थोडा डळमळला… “फोन करायचा नाही म्हणजे जरा अति झालं तुझं. काही अडलं तर काय करू?”

    “मला नाही माहीत, मी फोन बंदच करून ठेवते, म्हणजे प्रश्नच मिटला.”

    कपडे बदलून, पायात चपला अडकवून, मला टुकटूक करून, एक वाजता जेवायला मिळेल एवढं बघा, असं खिजवून ती गेली आणि मी डोकं खाजवायला लागलो. आज नेमकी लेक पण नव्हती घरी, नाहीतर तिची मदत नक्कीच झाली असती.

    हेही वाचा – केल्याने होत आहे रे!

    मी मनातल्या मनात उजळणी करायला लागलो. आमटी भात करायचा, म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे कुकर लावणे. तसा आधी लावला होता कुकर बऱ्याच वेळा, पण प्रत्येक वेळी कुकर लावणे म्हणजे नवं प्रकरण असतंय माझ्यासाठी. दोघांना किती भात लागेल, त्यासाठी किती तांदूळ लागेल, कुठली भांडी लागतील, याचा अदमास घेतला. अंदाजाने दोन पातेली घेतली. एकात एक मूठ तांदूळ आणि दुसऱ्यात अदमासे डाळ घेतली. दोन्ही जिन्नस धुवून घेतले आणि मग बोटांची पेरं बुडतील अशा अंदाजाने पाणी घातलं.

    तांदूळ शिजवताना त्यात किती पाणी घालावं हे मला कधीही न जमलेलं प्रकरण. कधी भात पिचपिचीत होतो, तर कधी पार फडफडीत. डाळ पण तशीच कात्रज दाखवते मला! कधी ती अर्धी कच्ची राहते, तर कधी पार मेण होते… यांच्या मधली सुयोग्य पातळी गाठणं हे म्हणजे मोठंच आव्हान. डाळ-तांदूळ एकत्र लावल्यानंतर नक्की कितव्या शिट्टीला गॅस बंद करायचा, हे पण कधीच न सुटलेलं कोडं. कुकरमध्ये तळाशी किती पाणी घालायचं, हाही एक ज्वलंत प्रश्न, काळजाचं पाणी करणारा. किती अंदाज बांधायचे ते?

    तर, हा सगळा जांगडगुत्ता कसाबसा कुकरमध्ये कोंबला आणि गॅस लावून निवांत बाहेर जाऊन बसलो. मागे एकदा बायको म्हणाली होती, तीन शिट्ट्या करायच्या, गॅस थोडा वेळ बारीक करून ठेवायचा आणि मग बंद करायचा. मी ते तंतोतंत लक्षात ठेवलं होतं. बाहेर येऊन बसल्यावर, बराच वेळ काहीच घडेना! शिट्टी काही वाजेना. माझी वरात आत. बघतो तर काय, सगळीकडून नुसती वाफ बाहेर पडतेय, भसाभसा. बायको समोर तोंडची वाफ दवडणाऱ्या मला, ही वाफ अपरिचित. आता काय करावं बरं?

    गॅस बंद केला. कुकरचं झाकण उघडलं तर भसकन् वाफ बाहेर आली आणि हात पोळले माझे तेवढ्यात. मनातल्या मनात एक सणसणीत शिवी हासडून, झाकणाची रबरी रिंग बघितली, तर ती नीट बसलीच नव्हती. झाकण पाण्याखाली धरलं, रिंग नीट बसवली आणि परत थोडं पाणी घालून झाकण लावलं. धांदल नुसती.

    आता गॅस लावून, तिथेच उभा राह्यलो ठिय्या देऊन. थोड्याच वेळात, शिट्टी लटलट कापायला लागली आणि सगळं व्यवस्थित होणार याची खात्री पटली. यथासांग तीन शिट्ट्या झाल्या, गॅस थोडा बारीक केला आणि मग बंद केला.

    आता पुढे काय, हे कुकरचं झाकण उघडल्यावर कळणार होतं. सगळं व्यवस्थित असेल हा आशावाद जागवून, तेलाची बुधली, कांदा, टोमॅटो, कढीलिंब, लसणीच्या पाकळ्या आणि मिसळणाचा डबा ही आयुधं परजून ठेवली. माझ्या नशिबाने, मिसळणाच्या डब्यातली सगळी पूडं भरलेली होती. हळद, तिखट, हिंग, जिरं, गोडा मसाला, सगळं काही होतं. नसतं तर भारी पंचाईत झाली असती!

    कांदा, टोमॅटो मस्त चिरून घेतला बारीक. हल्ली ते दोरी ओढण्याचं नामी यंत्र आलंय घरात. पाच मिनिटांत काम तमाम. आहे काय आणि नाही काय…

    हे सगळं करेस्तोवर चहाची तलफ आली. मग मस्त आलं घालून चहा केला, निवांत घुटके घेत तो संपवला, फोनवर मुशाफिरी करून आलो आणि झाकण निघण्याची वाट बघू लागलो. बायकोला फोन करावा का नाही या द्वंद्वात होतो, पण कटाक्षाने टाळलं. मला ठाऊक होतं, तिलाच राहवणार नाही आणि फोन येणार म्हणजे येणार. थट्टी years का experience  है भाय!

    हेही वाचा – पावसाची रिपरिप अन् रिक्षावाला…

    यथावकाश झाकण निघालं. भात आणि डाळ बाहेर काढल्यावर मला आभाळ ठेंगणं झालं. दोन्ही, अगदी मला अपेक्षित असलेल्या मात्रेत शिजले होते! दोन शितं चिमटीत घेऊन तपासणी केली. शितावरून भाताची परीक्षा अगदी तंतोतंत जमली मला. भले शाब्बास. भात शिजला होता की! बायको समोर नसली शिजत डाळ माझी, तरी प्रत्यक्षात मात्र ती चांगली शिजली होती. आता आमटीचे वेध लागले होते. मागे एकदा बायकोने कृती सांगितली होती, तिची उजळणी केली आणि सिद्ध झालो.

    पातेलं गॅसवर ठेवलं आणि त्यात तेल घातलं. ते तापल्यावर त्यात मोहरीची चिमूट सोडली. तडतडली मोहरी. त्या मोहरीच्या तडतडण्याची, बायकोच्या तडतडण्याशी तुलना करायचा मोह आवरला नाही मला आणि हसू आलं गालातल्या गालात… मग कांदा आणि लसूण घातलं आणि ते छान परतून घेतलं. हळद, तिखट, हिंग, कढीलिंबाची पानं, गोडा मसाला, सगळं त्या फोडणीत घातलं आणि मस्त एकजीव केलं मिश्रण.

    सुगंध बहरला फोडणीचा.

    डाळ थोडी सारखी करून घेतली आणि त्या फोडणीवर सोडली. चर्र आवाज आला आणि मी सुखावलो. मीठ घातलं, थोडं आणखी पाणी घातलं, ढवळलं, टोमॅटो घातला आणि गॅस बारीक करून झाकण ठेवलं. अरे यार, जमतंय तुला म्हणत, स्वतःचीच पाठ थोपटून घेतली मी.

    आमटी आकाराला येत होती. तेवढ्यात आठवलं आणि आमसूलाच्या दोन पाकळ्या सोडल्या त्यात. बायको चिंच घालते, माझा आपला थोडासा वेगळा प्रांत…!

    झाकण काढून एकदा डोकावलो त्यात, परत ढवळून घेतलं आणि सगळं मनासारखं झालंय, शिजलंय, हे जाणवल्यावर आच बंद केली. माझ्या आमटीला बहारदार रंग आला होता. पाणी सुटलं तोंडाला. घेतली थोडीशी काढून एका वाटीत आणि आचमन केलं. काहीतरी कमी वाटत होतं. काय ते कळत नव्हतं, पण नंतर पेटली बत्ती आणि आठवलं, गूळ तर राहिलाच की! त्याच्याशिवाय काय खुमारी आमटीला? लगोलग दोन चमचे गुळाची पूड सोडली आमटीत आणि परत एकदा गॅस लावून ती नीट सामिल केली त्या मिश्रणात. परत चव बघितली आणि भरून पावलो. चिरलेली कोथिंबीर मग वरून घातली आणि निवांत झालो.

    ओटा आवरतच होतो, तेवढ्यात फोन आलाच… “काय, येऊ का आमटीभात खायला?” आवाजात उत्सुकता आणि चेष्टा… हे दोन्ही स्वर जाणवले. मी म्हणालो, “लगेच ये. माझ्या मते जमलंय मला. उत्तीर्ण झालोय का नाही तुझ्या परीक्षेत ते तू ठरवायचं.”

    पाचव्या मिनिटाला बेल वाजली. मी पानं तयार ठेवली होती. हातपाय धुवून आम्ही जेवायला बसलो आणि पोळीचा पहिलाच घास तिने आमटी सोबत घेतला. घास तोंडात असतानाच, तर्जनी आणि अंगठा जुळवून, मस्त झालीये म्हणाली आणि मी खुश झालो.

    नंतर आमटी-भात सुद्धा ओरपला आम्ही आणि भरून पावलो मी तिच्या कौतुकाने.

    “आता बटाट्याची भाजी करून बघ एकदा, नक्की जमेल तुला…”

    म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो तो असा.

    हसतखेळत जेवण झालं आमचं आणि जगण्याच्या रोजच्या रामरगाड्यात,  हे असं तोंडी लावणं असलं, की संसाराचा आमटीभात आणखीनच चटकदार होतो, हे पटलं मला.

    पटतंय ना तुम्हाला?


    मोबाइल – 9323277620

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    कॉफीशॉप

    August 7, 2026 ललित

    ‘क्षितिज 9’ प्रोजेक्ट हायजॅक करणारं नेमकं कोण?

    August 7, 2026 ललित

    उपवास

    August 7, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    कॉफीशॉप

    By डॉ. विवेक वैद्यAugust 7, 2026

    तो नेहमीसारखाच कॉफी शॉपमध्ये बसलेला. त्याच कोपऱ्यातल्या जागी. तीच संध्याकाळची वेळ. त्याच्यासामोर ती पुन्हा येते.…

    ‘क्षितिज 9’ प्रोजेक्ट हायजॅक करणारं नेमकं कोण?

    August 7, 2026

    उपवास

    August 7, 2026

    शार्वीने पार्थकडे प्रेमभावना व्यक्त केल्या, पण…

    August 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    व्हेरिकोज व्हेन्स विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    August 8, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : बहु योगाभ्यासीं हांव, विजनाकडे धांव

    August 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 ऑगस्ट 2026

    August 8, 2026

    कॉफीशॉप

    August 7, 2026

    ‘क्षितिज 9’ प्रोजेक्ट हायजॅक करणारं नेमकं कोण?

    August 7, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 388
    • अवांतर 202
    • आरोग्य 137
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 524
    • फिल्मी 61
    • फूड काॅर्नर 246
    • मैत्रीण 24
    • ललित 835
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    व्हेरिकोज व्हेन्स विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    August 8, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : बहु योगाभ्यासीं हांव, विजनाकडे धांव

    August 8, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.