Saturday, March 7, 2026

banner 468x60

Homeफूड काॅर्नरRecipe :  खारीक आणि खोबऱ्याचे पौष्टिक लाडू!

Recipe :  खारीक आणि खोबऱ्याचे पौष्टिक लाडू!

माधवी जोशी माहुलकर

तूप, साखर किंवा गूळ न वापरता हे खारीक – खोबऱ्याचे पौष्टिक लाडू करता येतात. तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात आणि फ्रीजमध्ये ठेवल्यास खूप दिवस टिकतात. माझी मुलं 24-25 वर्षांची झाली तरी त्यांना हे लाडू आवडतात. पौष्टिक असल्याने लहान मुलांना सकाळी दुधासोबत हा एक लाडू दिला तर, ते त्यांच्या चांगलेच अंगी लागेल. डिंकाच्या लाडवासारखे हे लाडू फक्त हिवाळ्यातच करायला हवे असे काही नाही, बाराही महिने हे खारीक – खोबऱ्याचे लाडू करता येतात. महागड्या प्रोटिन पावडरचे डबे खरेदी करण्यापेक्षा हा लाडू शरीरात ऊर्जा तर निर्माण करतोच, शिवाय तुमचे आरोग्यही उत्तम ठेवतो.

साहित्य

  • लाल खारीक – पाव किलो
  • दूध – अर्धा लिटर
  • खोबऱ्याचा किस – एक वाटी (गुलाबीसर भाजलेला)
  • वेलची पावडर – एक चमचा

हेही वाचा – Kitchen Tips : नाम…? जिलेबी बाई!

कृती

  1. खारकेतून बी काढून टाकून त्याचे तुकडे करावे.
  2. अर्धा लिटर दूध गरम करून थोडे कोमट झाल्यावर त्यात हे खारकेचे तुकडे साधारणपणे आठ ते नऊ तास भिजत घालावे, जेणेकरून खारीक दूधात मुरेल आणि चांगली फुगून मऊसर होईल.
  3. त्यानंतर ही खारीक दुधासह मिक्सरवर अगदी बारीक वाटून घ्यावेत. (पाहिजे असल्यास, याच वेळी त्यात चवीनुसार गूळ किंवा साखर घालू शकता. पण माझ्या मतानुसार त्याची गरज भासत नाही.)
  4. खारीक आणि दुधाचे मिश्रण अगदी मऊसूत वाटून घेतल्यावर एका कढईत ते मिश्रण घालून त्याचा अगदी घट्ट गोळा होईपर्यंत घोटून घ्यावे. लक्षात ठेवावे की, यामध्ये चमचा सतत फिरवत रहावा लागतो, नाहीतर मिश्रण बुडाला जळण्याची शक्यता असते.
  5. खारीक आणि दुधाच्या मिश्रणाचा रंग थोडा बदलल्यावर त्यात गुलाबीसर भाजलेले सुके खोबरे टाकावे आणि सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत परतावे. खोबऱ्यामुळे लाडवाचे मिश्रण लवकर आळून येते.
  6. मिश्रणातील ओलावा जाईपर्यंत हे सर्व साहित्य मंद आचेवर घोटत रहावे.
  7. साधारणपणे वीस मिनिटांनी कढईच्या कडेला मिश्रण कोरडे वाटायला लागले की, वेलची पावडर घालून परत तीन-चार मिनिटे खारकेचे मिश्रण परतून घ्यावे.
  8. एकदा हे मिश्रण हातावर घेऊन त्यातील ओलावा तपासून पाहावा. लाडवाचा आकार होण्याइतपत मिश्रण कोरडे झाले असेल तर गॅस बंद करून हे खारीक-खोबऱ्याचे मिश्रण एका ताटात काढून थंड व्हायला ठेवावे.
  9. हे मिश्रण थंड झाले की, एका ताटलीत अर्धा वाटी खोबऱ्याचा किस पसरवून त्यावर खारीक आणि खोबरे लाडू घोळवून घ्यावेत.

हेही वाचा – Recipe : व्हेज ऑयस्टर मोमोज… सोबत टोमॅटोची चटणी!

टिप्स

  • लाल खारीक नैसर्गिकरीत्याच गोड असते. त्यामुळे यामध्ये गूळ किंवा साखर मिसळायची गरज भासत नाही.
  • गूळ किंवा साखर वापरायचीच असेल तर या लाडवाकरिता दोन टेबल स्पून गूळ किंवा साखर पुरेशी होते. खांड साखर वापरली तर उत्तम!

तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

avaantar.recipe@gmail.com

या ईमेलवर किंवा

9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!