Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeआरोग्यमुलांच्या वर्तनातील बदल… लक्षणे, कारणे आणि Homeopathy

मुलांच्या वर्तनातील बदल… लक्षणे, कारणे आणि Homeopathy

डॉ. सारिका जोगळेकर

होमिओपॅथिक तज्ज्ञ

माणूस म्हटलं की, वर्तनातील बदल हे आलेच. मुलांच्या वर्तनातील बदल, हा चिंतेचा विषय असतो; कारण त्याची जबाबदारी पालकांवर असते. मुलांच्या वर्तनातील बदल हा खूप पूर्वीपासून चालत आलेला प्रकार आहे, आता फक्त त्याबाबत जागृती झाली आहे इतकंच! लहान मुलांपासून किशोरवयीन मुलांपर्यंत, प्रत्येक वयोगटात वर्तनातील बदल वेगवेगळ्या स्वरूपात दिसू शकतात. काही बदल हे वयाशी संबंधित असतात, तर काही बदलांकडे वेळेवर लक्ष देणे गरजेचे असते. हे बदल वेळीच ओळखल्यास योग्य काळजी आणि मार्गदर्शनामुळे मुलांचे भावनिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवता येते.

वर्तनातील बदल म्हणजे काय?

मुलांच्या नेहमीच्या सवयी, भावनिक प्रतिक्रिया, बोलण्याची पद्धत, झोप, खाणे, अभ्यास किंवा इतरांशी वागण्यामध्ये अचानक किंवा हळूहळू होणारा फरक म्हणजे वर्तनातील बदल. जसे की, चिडचिडेपणा किंवा पटकन राग येणे, हट्टीपणा काहीही ऐकून न घेणे, एकटेपणा, भीती, असुरक्षितता, झोपेच्या तक्रारी, अभ्यासात लक्ष न लागणे, मोबाइल किंवा टीव्हीवर जास्त अवलंबून राहणे (addiction), आईपासून दूर जाण्याची भीती (insecurity), लहान गोष्टींवरून रडणे किंवा भावनिक होणे, आत्मविश्वास कमी असणे (Lack of confidence) , मित्र-मैत्रिणींशी जुळवून न घेणे, भीती – परीक्षेची, अंधाराची किंवा एकटेपणाची… आक्रमता (aggressive).

कुठलाही बदल थोड्याफार प्रमाणात नैसर्गिक असतो, पण त्याची तीव्रता वाढली की, स्वत: त्या व्यक्तीला आणि कुटुंबीयांना त्याचा त्रास व्हायला लागतो. मुलांच्या दैनंदिन आयुष्यावरती परिणाम व्हायला लागतो. एक प्रकारच्या दुष्टचक्रात अडकायला होतं.

हेही वाचा – Homeopathy : रजोनिवृत्ती म्हणजे स्वतःकडे अधिक लक्ष देण्याची संधी

माणसाचे आणि खासकरून मुलांचे वर्तन हे त्यांच्या मनातील भावना, विचार आणि आजूबाजूच्या वातावरणाचे प्रतिबिंब असते. मुलांना अनेकदा शब्दांत व्यक्त होता येत नाही आणि मग ते वर्तनातून दिसून येतं. त्यामुळे त्यांच्या वर्तनातील बदल समजून घेणं, त्याची कारण शोधणं, हे महत्त्वाचं आहे. कौटुंबिक वातावरण तपासून पाहा… पालकांमधील ताण-तणाव, कौटुंबिक भांडणे, नवीन भावंडाचे आगमन (sibling rivalry) यापैकी काहीही कारण असल्यास कुटुंबीयांनी एकत्र येऊन त्यावर मोकळेपणाने बोलून त्यावर तोडगा काढला पाहिजे. मुलांना मनात येणारे विचार समजून घेणं आणि त्याचा अर्थ लावणं कठीण जातं, त्यामुळे आपल्या विचारांचे योग्य विश्लेषण मुलांना करता येत नाही. शाळेत अभ्यासाचा दबाव, शिक्षकांची अपेक्षा किंवा मित्र-मैत्रिणींशी झालेल्या छोट्या-मोठ्या कुरबुरी मुल मनात दडवून ठेवतं. त्यामुळे मन अस्वस्थ राहातं. विचारांची गुंतागुंत घेऊनच मूल झोपी जातं. हे विचार मनाच्या कोपऱ्यात (subconscious mind मध्ये) चालू असतात. अपुरी झोप, जंक फूड आणि अनियमित दिनचर्या यामुळे मुलांची चिडचिड होते. 

पालकांनी काय करायचे?

  • ‘संयम’ (patience) ही या सगळ्या समस्यांची गुरुकिल्ली आहे.
  • आपल्या मुलाची इतर मुलांशी तुलना करणे टाळा.
  • मुलांना मारहाण करणे – यामुळे फक्त पालकांचे फ्रस्ट्रेशन बाहेर पडते, पण मुलांचे मानसिक संतुलन अजूनच बिघडते.
  • मुलांकडे दुर्लक्ष करू नका. त्यांच्याबरोबर वेळ घालवा. संवाद साधा.
  • मुलांना अपेक्षांचे ओझे देऊ नका. 
  • त्यांच्या भावना स्वीकारा. त्यावर टीका करू नका .
  • नियमित दिनचर्या ठेवा. 
  • मुलांना कुठल्याही प्रकारचे टॅग लावू नका. त्यामुळे त्याच्या नकारात्मक भावना त्याच्या मनावर अजूनच बिंबवल्या जातात. 

मुलांच्या वर्तनातील बदल हे नेहमीच आजाराचे लक्षण असते, असं नाही. पण तो मुलांच्या मनातील भावना व्यक्त होण्याचा एक मार्ग असतो. पालकांनी संयम, समजूतदारपणा आणि प्रेमाने मुलांकडे पाहिले तर अनेक समस्या सहज सोडवता येतात. वेळेवर लक्ष देणे आणि योग्य मार्गदर्शन करणे हेच मुलांच्या सुदृढ मानसिक विकासासाठी महत्त्वाचे आहे. 

मुलांमधील वर्तनातील बदल आणि होमिओपॅथीची भूमिका…

वर्तनातील बदलांमुळे पालक अनेक वेळेला चिंतेत असतात. एका मर्यादेनंतर वर्तनातील बदल वाढले की, पालकांच्या मनावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. Subconscious mind मध्ये सतत त्याचेच विचार राहतात. स्ट्रेसचे परिणाम पूर्ण शरीरावरती होतात, हे तर सर्वांना माहीतच आहे. कुठल्याही भावना जेव्हा दैनंदिन आयुष्यावर परिणाम करतात, तेव्हा त्यांना उपचारांची गरज असते. हीच वेळ असते जेव्हा होमिओपॅथीची भूमिका महत्त्वाची ठरते

होमिओपॅथी ही केवळ लक्षणांवर नाही तर, मुलाच्या एकंदर प्रकृतीवर उपचार करते. प्रत्येक मूल वेगळं असतं, या तत्वावर होमिओपॅथी काम करते. होमिओपॅथिक औषध देताना detail case घेतली जाते.

मुलांच्या वर्तनात बदल केव्हापासून सुरू झाला? त्यादरम्यान काय घडलं असेल? त्यावरती त्या मुलाची प्रतिक्रिया काय होती? त्या मुलाचे कुटुंबीयांशी संबंध कसे आहेत? इतरांच्यात ते मूल मिसळू शकते का? जर नसेल तर त्याचे कारण काय? या सगळ्याचा अभ्यास करून मगच औषध दिले जाते. ‘Root cause’ शोधून त्यावर मात करायला होमिओपॅथिक औषधे मदत करतात. 

हेही वाचा – Homeopathy : बदलती लाइफस्टाईल म्हणजे आजारांना निमंत्रण

शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, गर्भात असताना आईची मानसिक अवस्था, ताण, चिंता, आनंद आणि जीवनशैली यांचा थेट परिणाम भावी बाळाच्या मेंदू आणि भावनांवर होतो. त्यामुळे बरेच वेळा आईच्या प्रेग्नेंसीपासून अभ्यास केला जातो. बरेच वेळा आईला सुद्धा औषध दिले जाते. मुल आणि आई यांच्यातलं नातं अद्भुत असतं. आईचा स्पर्श, तिचं प्रेम, तिचं संरक्षण मुलांच्या मनावर खोलवर परिणाम करतं. तसंच, मुलाला समजून घेण्यात आईचा अव्वल नंबर असतो. 

कुठल्याही घटनेचा मनावर झालेला वाईट परिणाम आणि त्याच्या खोलवर रुजलेल्या आठवणी हळुवारपणे कमी करून मनाला सावरण्याची ताकद होमिओपॅथी देते. होमिओपॅथीमुळे मनातील गोंधळ कमी होऊन विचारांना योग्य दिशा मिळते, त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. नकारात्मक विचारांचे रूपांतर सकारात्मक विचारांमध्ये होते आणि मग आपण योग्य निर्णय घ्यायला लागतो. 

 मुलांच्या वर्तनामाची हाक ओळखा आणि त्यांच्या भावनांना आणि मानसिक आरोग्याला योग्य दिशा मिळवून द्या. होमिओपॅथिक औषधांचे कुठलेही साइड इफेक्ट नाहीत. आवडती चव असल्यामुळे औषध घेण्यास अतिशय सोपे असते. होमिओपॅथीमध्ये मुलांच्या वागण्यावरती कुठलाही टॅग न लावता त्यांचे मन आपण शांत करू शकतो. मन शांत झाले की, शरीराची वाढ सुद्धा सुदृढ होते. इम्युनिटी वाढते. वारंवार होणारे आजार कमी होतात. मुलांच्या किंवा मोठ्यांच्या सुद्धा वर्तनातील बदल यावर होमिओपॅथी हा नैसर्गिक तोडगा आहे. 

HOLISTIC HOMOEOCURE CLINIC

ऋतू पार्क, ठाणे वेस्ट

मोबाइल – 9890533941


https://www.instagram.com/holistichomoeocure?utm_source=qr

https://www.facebook.com/share/1YnodU891Z/?mibextid=wwXIfr

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!