Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 27 जानेवारी 2026
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 27 जानेवारी 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 27, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 27 जानेवारी 2026; वार : मंगळवार
    • भारतीय सौर :  07 माघ शके 1947; तिथि : नवमी 19:05; नक्षत्र : भरणी 11:08
    • योग : शुक्ल 27:12; करण : बालव 08:14, तैतिल 29:52
    • सूर्य : मकर; चंद्र : मेष 16:44; सूर्योदय : 07:14; सूर्यास्त : 18:27
    • पक्ष : शुक्ल; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – मेष राशीसाठी आजचा दिवस संमिश्र परिणामांचा असेल. भावनिक निर्णय हानिकारक ठरू शकतात. वाचन आणि लेखनात वेळ व्यतीत करा. नोकरी बदलाची संधी मिळण्याची शक्यता आहेत. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होऊ शकते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत लक्षणीय सुधारणा होईल.

    वृषभ – कौटुंबिक कलहाचे संकेत आहेत. आरोग्य सुधारेल. मात्र दिवसभर आत्मविश्वासाची कमी असेल. त्यामुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल, परंतु धीर धरा. आज एखाद्या  मित्राची भेट होऊ शकते. त्याच्या पाठिंब्याने उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. आज वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल.

    मिथुन – आज तुमचे धाडस तुम्हाला चांगले फळ देईल. कामाच्या ठिकाणी उत्तम प्रगती कराल. व्यावसायिक कामांमध्ये व्यग्र राहाल. व्यवसाय बदलाचे देखील संकेत आहेत. पालकांकडूनही पाठिंबा मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या, पथ्येपाणी सांभाळा.

    कर्क – कर्क राशीच्या जातकांना अभ्यासात विशेष रस निर्माण होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. जोखमीची गुंतवणूक टाळा. आर्थिक परिस्थिती सामान्य राहील. मात्र आज जिभेवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, अडचणी निर्माण होतील.

    सिंह – सिंह राशीच्या जातकांमध्ये आज भरपूर आत्मविश्वास असेल, परंतु मन अस्वस्थ असू शकते. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून मदत मिळेल. आयुष्यात प्रगती करण्याचा आजचा दिवस आहे. तुमच्या प्रियजनांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. मित्रासोबत लहानशा सहलीला जाऊ शकता. आरोग्याकडे लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.

    कन्या – कन्या राशीच्या जातकांना आज जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. मोठे व्यावसायिक यश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील. संततीकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे.

    तुळ – आज शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट यश मिळेल. बौद्धिक कामांमुळे उत्पन्न वाढू शकते. व्यावसायिक कामे धावपळीची असतील आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक ताण येईल. जास्त खर्च हे देखील चिंतेचे कारण बनेल. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळावेत.

    वृश्चिक – आज वृश्चिक राशीच्या जातकांसाठी परिस्थिती प्रतिकूल आहे. गाडी चालवताना काळजी घ्या, दुखापत होण्याची शक्यता आहे. आज एखाद्या प्रकरणी अडचणीत येऊ शकता. त्यामुळे मन अस्वस्थ होईल, मात्र आत्मसंयम ठेवा. भावनांवर नियंत्रण ठेवा. घरी एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते.

    हेही वाचा – दमलेल्या नवऱ्याची कहाणी…

    धनु – धनु राशीच्या जातकांना आज मनःस्थितीत बदल जाणवू शकतो. शैक्षणिक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक समस्या सोडवल्या जातील. एखादी चांगली बातमी मिळेल. प्रवास फायदेशीर ठरेल. आरोग्य सुधारेल. कुटुंबातील एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

    मकर – मकर राशीच्या जातकांना आज वरिष्ठांकडून मोठा पाठिंबा मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कार्यपद्धतीवर खूश होतील. मात्र आज अनावश्यक राग टाळा. संभाषणात संतुलन राखा. कौटुंबिक समस्या त्रासदायक ठरू शकतात. कामाच्या निमित्ताने एखादा छोटा प्रवास घडेल. त्यातून तुम्हाला मोठे व्यावसायिक यश मिळेल.

    कुंभ – कुंभ राशीच्या जातकांना आज नशिबाची मोठी साथ मिळेल. प्रवास फायदेशीर ठरेतील. धार्मिकतेकडे कल वाढेल. कला किंवा संगीतात रुची वाढू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. प्रगतीच्या संधी निर्माण होऊ शकतात. उत्पन्न वाढेल, तसा खर्चही वाढेल.

    मीन – मीन राशीच्या जातकांना आज न्यायालयीन कामात विजय मिळू शकतो. मालमत्तेच्या वादात यश मिळण्याची शक्यता आहे. शत्रूंचा त्रास वाढण्याची शक्यता आहे, परंतु ते तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत. आज प्रियजनांचा मोठा पाठिंबा मिळेल. एकंदर परिस्थिती चांगली असेल.


    दिनविशेष

    भारताचे आठवे राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरामनरामस्वामी वेंकटरामन

    टीम अवांतर

    भारताचे आठवे राष्ट्रपती आणि स्वातंत्र्य-चळवळीतील नेते रामस्वामी वेंकटरामनरामस्वामी वेंकटरामन यांचा जन्म 4 डिसेंबर 1910 रोजी तामिळनाडू राज्यातील राजमदम् (तंजावर जिल्हा) या गावी झाला. वेंकटरामन यांनी एम्.ए., बी. एल्. या मद्रास विद्यापीठाच्या पदव्या मिळविल्या. पुढे त्यांनी चेन्नई येथील उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. वकिली करीत असतानाच ते काँग्रेस पक्षाकडे आकृष्ट झाले आणि त्यांनी काँग्रेस अंतर्गत समाजवादी पक्षाच्या स्थापनेत भाग घेतला. ‘छोडो भारत’ आंदोलनातही ते सहभागी झाले. त्यामुळे त्यांना दोन वर्षे कारावासही भोगावा लागला. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी कामगार चळवळीस वाहून घेतले आणि गोदी कामगार, रेल्वे कर्मचारी, भूमिहीन मजूर यांच्या हक्कांसाठी चळवळी उभ्या केल्या.

    चेन्नई येथून प्रकाशित होणाऱ्या लेबर लॉ जर्नल या मासिकाचे ते कार्यकारी संपादक बनले. स्वातंत्र्यानंतर त्यांची हंगामी संसदेत निवड झाली. त्यानंतर 1952 आणि 1957 या दोन्ही सार्वत्रिक निवडणुकांत ते लोकसभेवर निवडून आले. 1952-54 दरम्यान ते संसदेतील काँग्रेस पक्षाचे सचिव होते. पुढे ते तामिळनाडूच्या विधानसभेत निवडून गेले. उद्योग, कामगार, ऊर्जा आणि परिवहन ही खाती त्यांच्याकडे देण्यात आली. देशाच्या नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून देखील त्यांची नियुक्ती झाली. 1970 च्या दरम्यान त्यांनी सक्रिय राजकारणातून काही काळ निवृत्ती स्वीकारली आणि नवी दिल्ली येथून प्रकाशित होणाऱ्या स्वराज्य या इंग्रजी साप्ताहिकाची संपादकीय धुरा वाहिली. त्यानंतर त्यांची 1977 आणि 1980 अशी दोन वेळा दक्षिण चेन्नई मतदारसंघातून लोकसभेवर पुन्हा निवड झाली.

    हेही वाचा – राष्ट्रगीत अन् लोकांचा चकीत करणारा कॉन्फिडन्स!

    त्याआधी त्यांनी न्यूझीलंड येथील राष्ट्रकुल संसदीय परिषद, संयुक्त राष्ट्रांची सर्वसाधारण सभा, जिनीव्हा येथील आंतरराष्ट्रीय मजूर संघटना आणि व्हिएन्ना येथील आंतर संसदीय परिषद येथे भारतीय प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व केले होते. संयुक्त राष्ट्रांच्या प्रशासकीय न्यायसभेचे 1968 ते 79 या काळात ते अध्यक्ष होते. पंतप्रधान इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात त्यांनी 1980 ते 82 या कालावधीत अर्थखाते तर 1982 ते 84 या काळात संरक्षण खाते ही दोन महत्त्वाची खाती सांभाळली. 24 ऑगस्ट 1984 रोजी त्यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. पुढे 25 जुलै 1987 रोजी ते राष्ट्रपती पदावर निवडून आले.

    गोवा-मुक्तीनंतर पोर्तुगलला ४ एप्रिल १९९० या दिवशी भेट देणारे ते पहिले राष्ट्रपती ठरले. पुढे त्यांनी मे 1992 मध्ये चीनला भेट दिली. भारताच्या राष्ट्रपतींची चीनला दिलेली ही पहिलीच अधिकृत भेट होती. त्यांना रशिया-भेटीवर आधारित प्रवासवर्णनासाठी सोव्हिएट लँड-नेहरु पारितोषिक देण्यात आले. ‘माय प्रेसिडेन्शियल इअर्स’ या त्यांच्या आत्मचरित्रवजा पुस्तकाचा ‘वादळी वर्षे : राष्ट्रपती भवनातील’ या नावाने मराठी अनुवाद प्रकाशित झाला आहे. 27 जानेवारी 2009 रोजी नवी दिल्लीत वयाच्या 98 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn