Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, May 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Bookshelf : हसवता हसवता समाजाची कुरूप बाजू दाखविणारी ‘रामनगरी’!
    ललित

    Bookshelf : हसवता हसवता समाजाची कुरूप बाजू दाखविणारी ‘रामनगरी’!

    डॉ. अस्मिता हवालदारBy डॉ. अस्मिता हवालदारJanuary 20, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, पुस्तक वाचन, पुस्तकसंग्रह, मी मराठी, अभिजात मराठी, Bookshelf, मराठी लेखक, मराठी पुस्तक, राम नगरकर, रामनगरी, राम नगरकरांची रामनगरी, विनोदी पुस्तक रामनगरी, आत्मचरित्र रामनगरी, राम नगरकरांचे आत्मचरित्र
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    राम नगरकर आपल्याला माहीत आहेत… ते विनोदी नट म्हणून आणि नंतर त्यांनी केलेल्या ‘रामनगरी’ या एकपात्री प्रयोगांमुळे! ‘विच्छा माझी पुरी करा’मधली त्यांची भूमिका अनेकांना आठवत असेल. ‘रामनगरी’ हे त्यांचे आत्मचरित्र आपल्याला हसायला लावते… कधी गालातल्या गालात तर कधी खळखळून… त्यांनी ग्रामीण, रांगड्या बोलीभाषेत लिहिलेले त्यांचे अनुभव हसवतात आणि विचार करायला भाग पाडतातही. सुरुवातच त्यांनी हजाम आणि हजामती या शब्दांवर कोटी करून केलेली आहे. काही न करणाऱ्याला किंवा कुठलेही काम न येणाऱ्याला ‘हजाम आहेस’ असं का म्हणतात? ड्रायव्हर आहेस, कुंभार, लोहार आहेस, असं का म्हणत नाहीत? असं ते विचारतात. त्यांच्या आजोबांनी नाभिक शब्दाची सांगितलेली उत्पत्ती सांगून फुशारक्या मरणाऱ्याला गप्प केलं होतं… ती काय ते मात्र वाचायलाच हवं!

    झाडाखाली नाटक करणारा व्याही, त्याची सत्यवानाची भूमिका सुरू असताना सुनेला घेऊन पोहोचलेला आजा आणि नाटक मधेच थांबवून आपल्या मुलीला आणि नातवाला पाहून ‘लोकहो, जरा थांबा. आधी लेकीला आणि नातवाला पदरात घेतो’ असे म्हणतो. लोकांना काहीच वावगे वाटत नाही. नाटक पुढे सुरू होते. गावातल्या नाटकांच्या, हौशी मंडळींच्या आठवणी त्यांनी लिहिल्या आहेत. नंतर वडील मुंबईला घेऊन आले. तिथे गोदामात राहात होते. बायको बाळंतपणाला माहेरी गेली की, गोदामाची खोली रिकामी व्हायची. मग दुसरे कुटुंब राहायला यायचे… लेखकाची आई मात्र तीन वर्षं झाली तरी, बाळंतपणाला गेली नाही, म्हणून मालक उखडला आणि म्हणाला, “इतर मंडळी खोळंबली आहेत, बायकोला लवकर माहेरी पाठवा.” लेखक भजनी मंडळात सामील झाले होते. तिथे ‘बुवा’ असे टोपणनाव पडले.

    न्हाव्यांच्या वेगवेगळ्या जाती उदा. मशाली न्हावी, वाजंत्री न्हावी आणि त्यातल्या उच्च-नीच जाती, त्यांचे हेवेदावे यामुळे झांजा वाजवायचा मोह लेखकाला भारी पडला आणि वडिलांकडून मार खावा लागला. ते लिहितात, ’माझ्या झांजांचा ठेका आणि बापानं मारायचा ठेका… मी ताल शिकलो तो असा.’ तंबाखू खाताना पकडले गेल्याचा किस्सा पण असाच! दुकानाचा मालक नोकरांना ओरडायला सुरुवात करतो, तेव्हा लेखक तंबाखू मळून हातावर थाप देतो. मालकाला वाटतं, तो नोकरांना रागावतोय म्हणून हा टाळ्या वाजवतोय! लेखकाने हा प्रसंग इतका रंगवला आहे की, हसून हसून डोळ्यांत पाणी येतं. असाच प्रसंग पेटी वाजवण्याचा! दूरची बहीण आलेली असताना तिला उत्साहाने पेटी वाजवून दाखवली, तेव्हा तिच्या अंगात देवी आली आणि ती ‘वाजव… वाजव’ म्हणून ओरडू लागली. लेखक घाबरले पण ती पेटी थांबवू देईना. शेवटी तिच्यासमोर नारळ ठेवून अंगात येण्याचे कारण विचारले, तेव्हा अंगात आलेली देवी उतरली… लेखकाची पेटी वाजवण्याची पुरी हौस फिटली.

    हेही वाचा – जापनीज वाइफ… अजब प्रेम की गजब कहानी!

    त्यांच्या लग्नाची गंमत तर बहारदार आहे. जी मुलगी रस्त्यावर सायकलसकट लेखकावर आदळते तीच (भवानी!) होणारी बायको असते. नवरा मुलगा ‘’परसाकडे’’ जायला निघतो तेव्हा गाडी, वाजंत्रीवाले, करवल्या आणि वधू त्याच्याबरोबर जायला निघतात! संपूर्ण लग्नाचा किस्सा फारच गमतीशीर आहे. लेखक वसंत बापट, लीलाधर हेगडे वगैरे सेवादलाच्या मंडळींमध्ये वावरायला सुरुवात केल्यावर पांढरपेशी आयुष्याची ओळख झाली आणि तसे होण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांनी पत्नीला सुधारायचं ठरवले. नऊवारी साडीऐवजी गोल साडी, आडव्या कुंकूऐवजी गोल कुंकू, चप्पल या गोष्टी इतक्या क्रांतीकारक होत्या, याची आपण कल्पनाच करू शकतो. हे बदल स्वीकारणे कठीण गेले. इंग्लिश सिनेमा पाहण्याचा प्रसंग किंवा डेक्कन क्वीनमधून जाण्याचा प्रसंग हसू आणतो, पण गंभीरही करतो. नव्या फ्लॅटमध्ये राहायला गेल्यावर सामाजिक स्तरामुळे आलेल्या अडचणी आणि त्यातून झालेले विनोद फार बोलके आहेत… तिथला डॉक्टर म्हणतो, ‘तुमच्याकडे तीन तीन कामाच्या बाया आहेत, एक आमच्याकडे पाठवा.’ तेव्हा लेखक म्हणतो, ‘एक आई, एक बायको आणि एक बहीण आहे!’ बायकोने सेल्सगर्लला ‘मीच मालकीण’ म्हटल्यावर ती मालकाचं आणि कामवालीचं सूत जुळलंय, असा निष्कर्ष काढते. मित्र लेखकाला शोधत घरी येतात तेव्हा वडिलांशी गाठ पडते. “अशा बापाच्या पोटी जन्म घेणारा तू महान आहेस,” असं म्हणायची वेळ येते.

    लेखक आजारी पडले, तेव्हा वसंत बापट, हेगडे, एस. एम. जोशींपासून अनेक जण पाठीशी उभे राहिले. उत्तम इलाज आणि आर्थिक भार दोन्ही सांभाळले. आईचा मृत्यू, बहिणीचे लग्न, नवे सलून, नवे घर अशा प्रत्येक प्रसंगांत या सर्व व्यक्तींनी भक्कम साथ दिली. पोस्टातल्या नोकरीच्या गमतीजमती पण वाचण्यासारख्या आहेत. ‘विच्छा माझी पुरी करा’सारख्या नाटकांतून, काही सिनेमांतून, पोस्ट खात्याच्या डॉक्युमेंटरीतून भूमिका करून त्यांनी नाव कमावले. कलापथकात काम करून दौरे केले. पहिले एअर कंडिशन सलून काढले.

    हेही वाचा – कोसला… अस्वस्थ तरुणाईचा क्लोजअप

    पांढरपेशा वर्गात समाविष्ट होण्याचा सतत प्रयत्न केला. काही प्रमाणात यशस्वी झाले, पण समाजात घट्ट रुतलेल्या समजूतींमुळे पूर्ण यश मिळाले नाही. स्वतःवर हसण्याची लाखमोलाची हातोटी त्यांच्याकडे आहे. हसवता हसवता ते समाजाची कुरूप बाजू दाखवून देतात. तसेच गुणी, कष्टाळू व्यक्तीला कुठलेही बंधन यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही, हेही दाखवून देतात. जवळच्या मित्रपरिवाराच्या गप्पा रंगत आल्या आहेत, त्यात लेखक आहेत, आपणही आहोत… ते वर्णन करून प्रसंग सांगत आहेत आणि हास्याचा कल्लोळ उठतो आहे, असा भास व्हावा, असे लिखाण आहे. मित्रांच्यात बोलताना समाजासमोर चढवलेली झूल काढून ठेवता येते, मुखवटा उतरवता येतो तसे करून लिहिलेले हे आत्मचरित्र. पांढरपेशा कुटुंबात जन्म मिळाल्यामुळे आपल्याला कितीतरी आयतेच मिळाले, संघर्ष करावेच लागले नाहीत, याची जाणीव मला हसून हसून डोळ्यांतल पाणी पुसताना झाली.

    …आणि आणखी एक, या पुस्तकाचं भाषांतर होऊ शकेल का? तीच छटा, तोच गर्भितार्थ, शब्दाला चिकटून डोळ्यासमोर येणारी प्रतिमा… दुसऱ्या भाषेत येऊ शकेल का? वसंत बापट म्हणतात, ‘मधुगुंजन लखलाख तुम्हाला बोल रांगडा प्यार मला’

    हा याच मातीतला बोल, दुसऱ्या भाषेत सांगता येणे कठीणच!

    संग्रही ठेवावे असे पुस्तक.

    Avatar photo
    डॉ. अस्मिता हवालदार

    डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.

    Related Posts

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026 ललित

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026 ललित

    सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    May 7, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    By प्रणाली वैद्यMay 8, 2026

    भाग – 24 समोर स्क्रीनवर प्रेझेंटेशन सुरू होतं आणि आराध्या ते लक्षपूर्वक ऐकत होती… कृत्तिकाने…

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    May 7, 2026

    सहेला रे…

    May 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026

    Dnyaneshwari : जी लोचना भाग्य उदेलें, जीवा सुखाचें सुयाणें पाहलें

    May 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 291
    • अवांतर 185
    • आरोग्य 108
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 412
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 204
    • मैत्रीण 18
    • ललित 610
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.