Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    हलकल्लोळ

    August 8, 2026

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    व्हेरिकोज व्हेन्स विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    August 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, August 8
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आभास… की वास्तव?
    ललित

    आभास… की वास्तव?

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 20, 2026No Comments8 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखन, आभास रेसिडेन्सी, रीज्यु डेव्हलपर, राज नेहा, पांढऱ्या साडीतील आजी, दूधवाला दादा, नटराज मंदिर, झपाटलेली सोसायटी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दिलीप कजगांवकर, पुणे

    राजने साताऱ्यातील कंपनीची ऑफर ॲक्सेप्ट केली आणि फ्लॅटच्याच भाड्यात प्रशस्त बंगला भाड्याने मिळाल्याने तो आणि नेहा खूश झाले. गेंडामाळ परिसरातील मेन रोडपासून थोड्याशा आत, पण अतिशय शांत आणि हिरव्यागार सोसायटीतील फक्त तीन बंगल्यांचे बांधकाम पूर्ण झाले होते; बाकी दहा-बारा बंगल्यांचे बांधकाम अर्धवट स्थितीत होते.

    पहिला दिवस सामान लावण्यात गेला. संध्याकाळी भरपेट पोहे खाऊन आणि मसाला चहा पिऊन राज आणि नेहाच्या गप्पा रंगल्या. प्रत्येक विकेंडला जवळपासच्या निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायचे, असे दोघांनी एकमताने ठरविले.

    भयाण शांतता, गार वारा; रात्रीचे बारा वाजले होते तरीही झोप लागत नव्हती. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. इतक्या रात्री कोण असणार?

    “राज, थांब, मीही येते,” नेहा म्हणाली.

    “कोण आहे?” राजने विचारले.

    “मी रीना, समोरच्या बंगल्यात राहाते.”

    राजने दरवाजा उघडला. पांढरा शुभ्र स्लीव्हलेस टी-शर्ट आणि त्याच रंगाची हाफ पँट, खांद्यावर विसावणारे मोकळे केस, गोरा वर्ण आणि मध्यम उंची असलेली एक अतिशय आधुनिक तरुणी समोर उभी होती.

    “हं… बोला, काय हवे आहे आपल्याला?”

    “माझी एक मैत्रीण ट्रेनने येणार आहे. ट्रेन नऊ वाजताच येणार होती, पण लेट झाल्याने 12.30 वाजता सातारा रोड, म्हणजे आपल्या साताऱ्याच्या स्टेशनला पोहोचेल. इतक्या रात्री रिक्षा मिळणार नाही, म्हणून एक विनंती आहे, तुमची कार द्याल का मला? मी तासाभरात परत येईन… कार आणि पेट्रोलचे पैसे देईन.”

    हेही वाचा – आण्णा… जगण्याच्या इच्छेला फुटली पुनश्च पालवी!

    “मी कार देतो, पण पैसे मात्र नाही घेणार. आहे का मान्य?”

    मानेनेच होकार देत, ती तरुणी गोड हसली.

    राजने तिला कारची किल्ली दिली. तेव्हा नेहा म्हणाली, “राज, केवढी रात्र झाली आहे, आणि आज तर अमावस्या आहे. तिला एकटीला कसे जाऊ द्यायचे? तूही जा तिच्यासोबत.”

    नेहाचा एवढा मोठेपणा आणि उदारपणा राजसाठी सुखद धक्का होता.

    रीना राजला रस्ता दाखवत होती, कुठे वळायचे ते सांगत होती आणि त्याच वेळी तिची कॉमेंटरीही चालू होती. “हा राजवाडा, हा कमानी हौद, हा पोवई नाका, हे डी. जी. कॉलेज, हे एल. आय. सी. ऑफिस, हा इंडस्ट्रियल एरिया…” वगैरे, वगैरे.

    “नटराज मंदिर कुठे आहे?”

    रीनाने उत्तर दिले नाही. बहुधा राजचा प्रश्न तिने ऐकला नसावा…

    रस्ता तसा मोकळाच होता, पण राज गाडी हळू चालवत होता, बाजूला सुंदर तरुणी बसली होती म्हणून नव्हे, तर रस्ता अपरिचित होता म्हणून! साधारण 12.30 वाजता ते स्टेशनला पोहोचले.

    “मी माझ्या मैत्रिणीला घेऊन येते,” असे म्हणत रीना गाडीतून उतरली. दोनच मिनिटांत ती खूप मोठी बॅग असलेल्या, पांढरी हाफ पँट, पांढरा स्लीव्हलेस टी-शर्ट आणि लांब मोकळे केस असलेल्या अतिशय सुंदर तरुणीला घेऊन आली.

    डिक्की उघडून बॅग आत ठेवायला राज खाली उतरला, पण त्याआधीच त्या नाजूक तरुणीने बॅग अगदी सहजपणे डिक्कीमध्ये ठेवली होती.

    “ही माझी मैत्रीण ज्युली,” रीनाने त्या तरुणीची ओळख करून दिली.

    “तुम्हा दोघींचे अगदी सारखे कपडे… हे ठरवून केलेला प्लॅन की योगायोग?” राजने न राहवून विचारले.

    “राज, आमच्या आवडीनिवडी सारख्याच आहेत आणि आम्ही नेहमी असे पांढरे शुभ्र कपडेच वापरतो,” रीना म्हणाली.

    “तू गाडी खूप हळू चालवतोस. आता मी गाडी चालवू का?” रीनाने विचारले.

    रीना गाडी खूप फास्ट चालवत होती. तिने केलेले दोन ओव्हरटेक तर काळजात धडकी भरवणारे होते.

    “ज्युली, किती दिवस मुक्काम?” राजने विचारले.

    “तुम्हाला कंटाळा येईपर्यंत,” ज्युली मंद स्मित करत म्हणाली.

    “तुझा कंटाळा कधीच येणार नाही,” असे म्हणत राजच्या खांद्यावर हात ठेवून रीनाने विचारले, “ज्युलीवर फिदा का?”

    राज गोड हसला.

    “रीना, तुम्हा दोघींबरोबरचा हा प्रवास संपूच नये, असे वाटते.”

    “राज, तू आत्ता जे बोललास ते नेहाला सांगू का?” रीनाने लडिवाळपणे विचारले.

    “अजिबात नाही… आणि कधी सांगशील तर बघ,” रीनाच्या खांद्यावर हात दाबत राज म्हणाला.

    “आपण कुठे तरी थांबून गप्पा मारूया का?” असे राजने विचारले आणि पुढच्याच क्षणी नेहाचा फोन आला.

    “राज, किती वेळ लागेल? मला भीती वाटतेय. मला विचित्र आवाज ऐकू येत आहेत.”

    “आलोच मी.”

    नेहाच्या काळजीपोटी राजने थांबून गप्पा मारण्याचा प्लॅन बदलला.

    “राज, नाराज होऊ नकोस, परत कधीतरी,” म्हणताना रीनाला ठसका लागला आणि राजने पुढे केलेल्या त्याच्या पांढऱ्या स्वच्छ रूमालावर लिपस्टिक लावलेल्या तिच्या नाजूक ओठांचे ठसे उमटले.

    नेहाने रूमाल पाहिला तर रीनाचे आपल्या घरी येणे कायमचे बंद होईल या भीतीने राजने रूमाल गाडीबाहेर टाकला; पण तो अनपेक्षितपणे परत आत आला—थेट रीनाच्या हातात.

    राजला चकित झालेला पाहून रीना म्हणाली, “माझे ओठ माझ्याकडेच आलेत. अरे, बाहेर खूप हवा आहे ना म्हणून.”

    “तुझी आठवण म्हणून रूमाल माझ्याकडेच ठेवते. चालेल ना?”

    “चालेल, चालेल. पण तुझ्याकडेच ठेव. नेहाला दाखवू नकोस,” राज म्हणाला.

    घरी पोहोचल्यावर राजने मोजक्या गोष्टी सोडून सर्व काही नेहाला सांगितले. थकल्यामुळे नेहाला, तर थकवा  आणि गोड आठवणींमुळे राजला छान झोप लागली.

    सकाळी राजला गाडीत लेडीज पर्स दिसली. गाडीची चावी रात्री रीनाकडे राहिल्याने घरातील दुसऱ्या चावीने गाडी उघडून ती पर्स देण्यासाठी राज नेहाला सांगून रीनाकडे गेला…

    …आणि अर्ध्या मिनिटात दारावरची बेल वाजली.

    “मी समोर राहते,” पांढऱ्या शुभ्र साडीतील तेजस्वी आजीबाईंनी ओळख करून दिली.

    “राज, रीनाची पर्स द्यायला गेला आहे. येईलच एवढ्यात,” नेहाने सांगितले.

    “आजी, या ना, चहा टाकते,” नेहा म्हणाली.

    “आता नको. राजला हॅलो करून निघते मी,” असे त्या म्हणत असतानाच राज आला.

    “रीना नसेल ना घरी? तू टाकलीस का पर्स, दरवाजावर लावलेल्या चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे खिडकीतून आत?”

    “आजीबाई, तुम्ही तर सर्वज्ञ आहात. या ना, घरात.”

    “नंतर कधीतरी येईन. एक सांगायचे राहिले, आज रात्री रीना येईल तुमचे आभार मानायला.”

    आजीबाई निष्णात ज्योतिषी असणार, राजची खात्री पटली.

    रात्रीचे अकरा वाजले तरी रीना आली नाही. शेवटी कंटाळून राज आणि नेहा झोपले. त्यांचा नुकताच डोळा लागला नी बेल वाजली… थोडीशी वैतागून नेहा आणि मोठ्या उत्साहात राज उठला… अपेक्षेप्रमाणे रीनाच होती.

    “राज, तुझे मनापासून आभार. मी न विचारताच तुझी गाडी नेली ज्युलीला स्टेशनला सोडायला.”

    “रीना, अगं, मला सांगितलं असतं तर मीही आलो असतो. नेहाही आली असती,” प्रसंगावधान राखत राजने बायकोचे नावही जोडले.

    “रीना, ये ना, आत ये…” म्हणणाऱ्या राजचा नेहाला राग आला. एकतर झोपमोड झाली होती आणि आता रीना थांबली तर, नंतर झोप येणार नाही.

    “आता नको,” हे रीनाकडून ऐकून, “बाय रीना,” म्हणत नेहा बेडरूममध्ये गेली.

    पांढऱ्या शुभ्र हाफ पँट, टी-शर्टमधील रीना खूप छान दिसत होती. राजच्या खांद्यावर हात ठेवून रीना म्हणाली, “बाय राज, नेहा वाट बघत असेल, जा आत.”

    रीनाचा हात पकडण्याचा राजने प्रयत्न केला, पण ती चपळाईने सटकली.

    नेहा केव्हाच निद्राधीन झाली होती, आणि बराच प्रयत्न केल्यावर राजला झोप लागली.

    कोणीतरी दोन-तीनदा बेल वाजवली.

    “राज, बघ ना, कोण आहे ते?” नेहाने राजला उठवले.

    राजने घाईघाईत दरवाजा उघडला. कदाचित रीना तर नसेल? या विचाराने.

    पांढरा शुभ्र हाफ बाह्यांचा शर्ट आणि पायजमा घातलेला दूधवाला बाहेर उभा होता.

    “साहेब, नवीन आलात वाटतं. तुम्ही किती दूध घेणार? आणि दूध किती वाजता द्यायचं?”

    “एक लिटर दूध देत जा आणि समोरच्या बंगल्यात देतात तेव्हाच देत जा.”

    “साहेब, समोर कोणीच राहात नाही.”

    “अहो, समोर आजीबाई राहतात आणि रीना त्यांच्या बाजूच्या बंगल्यात राहाते.”

    “साहेब, मी द्यायचो दूध त्यांना पाच वर्षांपूर्वी. गेली अनेक वर्षे ते दोन्ही बंगले रिकामे आहेत.”

    “अहो दादा, मी भेटलोय त्यांना. कदाचित, ते इथे राहतात हे माहीत नसेल तुम्हाला! का उगाच घाबरवता मला?”

    “साहेब, मी फक्त मला जे माहीत आहे ते सांगितलं, आपलेपणाने. पटत नसेल तर सोडून द्या.”

    “बरं साहेब, मला ॲडव्हान्स द्याल का?”

    “हो, देईन,” राज म्हणाला.

    राजने दरवाजा बंद केला आणि परत उघडत विचारले, “किती ॲडव्हान्स द्यायचा?”

    काहीही उत्तर मिळाले नाही. दूधवाले दादा कुठेही दिसत नव्हते. काही सेकंदांत ते दिसेनासे झाले होते, राजला आश्चर्य वाटले.

    राजकडून हे ऐकून नेहा म्हणाली, “राज, हे खरं असलं तर? मला तर थरथरायला लागलं रे… आज विचारूया आपण रीनाला आणि आजीबाईंना!”

    दिवसभरात रीना आणि आजीबाई भेटल्या नाहीत. संध्याकाळी नेहा आणि राज रिक्षाने राजवाड्यामध्ये आले, नंतर एका पॉश हॉटेलमध्ये त्यांनी जेवण केले. घरी परतताना रिक्षा मिळाली, पण मी मेन रोडवर सोडतो, तुमच्या सोसायटीत येणार नाही, रिक्षावाले काका म्हणाले…

    ठीक आहे, थोडं चालणं होईल, म्हणत ते दोघे रिक्षात बसले.

    “साहेब, साताऱ्याला नवीन का? कधीपासून राहतात या सोसायटीत? काही विचित्र अनुभव आला का तिथे? जरा जपून हं. असं म्हणतात, ती सोसायटी झपाटलेली आहे. दोन सुंदर तरुण मुली, एक तेजस्वी आजीबाई आणि दूधवाले दादा तिथे दिसतात म्हणे.”

    हे ऐकून राज आणि नेहाला धक्काच बसला!

    हेही वाचा – म्हातारा-म्हातारी आणि मृत्यूपत्र!

    “मला आवडलेली इतकी गोड मुलगी खरंच भूत असेल का?” राजला एकेक गोष्ट आठवू लागली. तो रीना बरोबर गेला ती अमावस्येची रात्र होती. नटराज मंदिर कुठे आहे? या प्रश्नाचे उत्तर रीनाने दिले नव्हते.

    स्टेशनवर रीना केवळ दोन मिनिटांत ज्युलीला घेऊन आली होती. खूप मोठी बॅग ज्युलीने अगदी सहज डिक्कीमध्ये ठेवली होती. रीना आणि ज्युली दोघींचे सारखेच कपडे, तेही पांढऱ्या रंगाचे. रीनाने खूप रिस्की ओव्हरटेक अजिबात न घाबरता केले होते. ओठांचे ठसे उमटलेला रूमाल राजने गाडीबाहेर टाकला, पण तो अनपेक्षितपणे रीनाकडे आला. रीना आणि ज्युली रात्री इतक्या उशिरा येऊनही अगदी सकाळी रीनाच्या घराला कुलूप होते. आजीबाईंनी सांगितलं, अगदी तसंच सगळं घडलं होतं. मोठी बॅग घेऊन आलेली ज्युली केवळ एका दिवसात परतली होती आणि दूधवाल्या दादांनी सांगितलं की, गेली अनेक वर्षे दोन्ही बंगल्यात कोणीच राहत नाही. दूधवाले दादा क्षणात गायब झाले होते. सर्वच विचित्र होतं… एक विशेष म्हणजे चौघांचे कपडे पांढरे शुभ्र होते.

    त्या मध्यरात्री बराच वेळ काही विचित्र आवाज त्यांनी ऐकले. रात्रभर झोपू शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी त्यांनी घर बदलले…

    त्या दोघांना सातारा आवडले आणि मानवलेही. राजचे कामही छान चालू होते. पाच वर्षांत तीन प्रमोशन्स मिळाले. गेले काही दिवस वर्तमानपत्रात “रीज्यु” डेव्हलपरची “आभास रेसिडेन्सी”मधील कॅाम्पॅक्ट फ्लॅट्सची ॲडव्हर्टाइज येत होती.

    “राज, माझ्या वर्गात रीज्यु नावाचा मुलगा होता आणि त्याचे वडील बिल्डर होते. कदाचित ही त्याचीच कंपनी असेल. आपल्याला कमी रेट लावेल तो. बघायचं का, जाऊन आपल्या बजेटमध्ये बसतोय का तिथला फ्लॅट?”

    “व्हाय नॅाट? नाश्ता झाल्यावर जाऊ या.”

    साडेनऊ वाजताच ते रीज्यु डेव्हलपरच्या ऑफिसमध्ये पोहोचले.

    “रीज्यु सरांना भेटायचे आहे,” नेहा म्हणाली.

    “इथे कोणी सर नाही, दोन मॅम आहेत. त्या भेटत नाहीत, फक्त फोनवर अॅव्हलेबल असतात. रीज्यु हे कोणाचे नाव नाही, दोन नावांचे कॉम्बिनेशन आहे. या आहेत मिस रीना आणि या मिस ज्युली,” एक फोटो दाखवत रिसेप्शनिस्ट म्हणाली.

    तो फोटो पाहून राज आणि नेहाच्या मनात आले की रीना आणि ज्युलीने भुताटकीचा आभास निर्माण करून, अतिशय शांत आणि हिरवाईने नटलेली जागा स्वस्तात हडप करून तिथे महागड्या घरांचा प्रकल्प सुरू केलेला दिसतो.

    रीनाने दाखविलेली जवळीक हे सत्य होते की, आभास हे मात्र राजला समजत नव्हते. या विषयावर नेहाशी बोलणेही शक्य नव्हते. ते काही क्षण सत्य नसले आणि आभास जरी असले तरी हवेहवेसे मात्र नक्कीच होते.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    हलकल्लोळ

    August 8, 2026 ललित

    कॉफीशॉप

    August 7, 2026 ललित

    ‘क्षितिज 9’ प्रोजेक्ट हायजॅक करणारं नेमकं कोण?

    August 7, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    हलकल्लोळ

    By पराग गोडबोलेAugust 8, 2026

    बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, एका कार्यातली. त्या काळी साधारणपणे अशीच असायची सगळी कार्य… तेव्हा बँक्वेट्स…

    कॉफीशॉप

    August 7, 2026

    ‘क्षितिज 9’ प्रोजेक्ट हायजॅक करणारं नेमकं कोण?

    August 7, 2026

    उपवास

    August 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    हलकल्लोळ

    August 8, 2026

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    व्हेरिकोज व्हेन्स विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    August 8, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : बहु योगाभ्यासीं हांव, विजनाकडे धांव

    August 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 ऑगस्ट 2026

    August 8, 2026

    कॉफीशॉप

    August 7, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 388
    • अवांतर 202
    • आरोग्य 137
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 524
    • फिल्मी 61
    • फूड काॅर्नर 246
    • मैत्रीण 24
    • ललित 836
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    हलकल्लोळ

    August 8, 2026

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    व्हेरिकोज व्हेन्स विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    August 8, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.