Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑगस्ट 2026

    August 10, 2026

    Movie : One Life… प्रत्येक आयुष्य महत्त्वपूर्ण

    August 9, 2026

    प्रेमाचे झाड

    August 9, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, August 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 08 जानेवारी 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 08 जानेवारी 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 8, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 08 जानेवारी 2026; वार : गुरुवार
    • भारतीय सौर : 18 पौष शके 1947; तिथि : षष्ठी 31:05; नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी 12:23
    • योग : सौभाग्य 17:24; करण : गरज 18:42
    • सूर्य : धनु; चंद्र : सिंह 18:38; सूर्योदय : 07:13; सूर्यास्त : 18:15
    • पक्ष : कृष्ण; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – संयम आणि समजूतदारपणा दाखवण्याची गरज आहे. याशिवाय, आवश्यक तिथे मोकळेपणाने संवाद साधा. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी अनेक जबाबदाऱ्यांचा सामना करावा लागू शकतो, परंतु वरिष्ठ तुमचे कठोर परिश्रम लक्षात घेतील. आर्थिक परिस्थिती सामान्य राहील, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा.

    वृषभ – नातेसंबंधांमधील प्रेम वाढेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या किंवा संधी मिळू शकतात, ज्या तुम्ही चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. आर्थिक बाबींमध्ये संतुलन राखणे महत्त्वाचे आहे; त्या दृष्टीने सध्या मोठी गुंतवणूक टाळा. आरोग्य चांगले राहील, परंतु खाण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करणे टाळा.

    मिथुन – आजचा दिवस संमिश्र असू शकतो. कौटुंबिक जीवनात किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे, परंतु योग्य संभाषणामुळे परिस्थिती नियंत्रणात येईल. जुन्या मित्राला भेटल्याने आनंद मिळू शकतो. कारकिर्दीत नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल, जी भविष्यात फायदेशीर ठरेल. किरकोळ आर्थिक समस्या उद्भवू शकतात, परंतु दिवसाच्या अखेरीस परिस्थिती सुधारेल. स्वतःच्या आरोग्यासाठी, जंक फूड आणि रात्री उशिरापर्यंत जागणे टाळा.

    कर्क – भावनिकदृष्ट्या मजबूत असाल. कुटुंबाचा मोठा पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुम्हाला शांती मिळेल. काम आणि व्यवसायात कौशल्य दाखवाल आणि त्याची प्रशंसा देखील होऊ शकेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, परंतु हुशारीने खर्च करा. आरोग्य चांगले राहील, फक्त मानसिक ताण टाळा. कौटुंबिक जीवनात आनंदी आणि आरामदायी क्षण घालवण्याची संधी मिळेल.

    सिंह – आत्मविश्वास आणि नेतृत्व कौशल्ये दोन्ही उंचावेल. जोडीदाराशी एखाद्या विषयावर स्पष्ट बोलल्याने नाते आणखी मजबूत होईल. याशिवाय, जोडीदारासोबत महत्त्वाची चर्चा होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. तुमच्या मतांचे कौतुकही केले जाईल. खर्च थोडे वाढू शकतात, त्यामुळे बजेटकडे लक्ष ठेवा. आरोग्य ठीक राहील, मात्र रागावर नियंत्रणात ठेवा.

    कन्या – आजचा दिवस संयम आणि शिस्त पाळण्याचा आहे. संवादामुळे कौटुंबिक जीवन सुधारेल. नोकरीच्या ठिकाणी  कठोर परिश्रम फळाला येतील आणि वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवतील. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे, अन्यथा बजेट बिघडू शकते. आरोग्य सामान्य राहील, पण त्याचबरोबर पुरेशी विश्रांती मिळेल याची खात्री करा.

    तुळ – आज जबाबदाऱ्या वाढू शकतात, परंतु त्या चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. कौटुंबिक जीवनात संयम आवश्यक आहे; छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेऊ नका. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. आर्थिक बाबतीत सुज्ञ निर्णय घ्या. आरोग्याच्या बाबतीत, पोट किंवा थकव्याशी संबंधित समस्या येऊ शकतात.

    हेही वाचा – Electric Corpses : मृतदेहात जीव परत आणण्याचे प्रयत्न!

    वृश्चिक – नवीन कल्पना आणि योजना तुमच्या कारकिर्दीत उपयुक्त ठरतील. आज आर्थिक परिस्थिती चांगली असेल, मात्र ज्यात जास्त जोखीम आहे अशी गुंतवणूक टाळा. मित्र आणि प्रियजनांकडून पाठिंबा मिळेल, ज्यामुळे आनंदी असाल. कौटुंबिक जीवनात सुज्ञ निर्णय घ्या आणि जोडीदाराला वेळ द्या. आरोग्याच्या कोणत्याही मोठ्या चिंता राहणार नाहीत.

    धनु – टीमवर्कमुळे तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल, सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल, जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची चिन्हे आहेत. कौटुंबिक जीवनात एक नवीन सुरुवात किंवा सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील, मन आनंदी असेल.

    मकर – काम तणावपूर्ण असेल, मात्र कठोर परिश्रमांमुळे तुम्ही ते पूर्ण करू शकाल. आज भावना थोड्या तीव्र असू शकतात, म्हणून संयम ठेवणे आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनात प्रामाणिकपणा आणि एकमेकांवर विश्वास ठेवा. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा, कोणालाही पैसे उधार देण्यापासून टाळा. किरकोळ आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

    कुंभ – सकारात्मक विचार करणे फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जीवनात एखादी चांगली बातमी किंवा सकारात्मक संकेत मिळू शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक बाजू मजबूत होईल, उत्पन्न वाढू शकेल. आरोग्य चांगले राहील, परंतु प्रवास करताना सावधगिरी बाळगा.

    मीन – भावनिकदृष्ट्या संतुलित राहण्याची गरज आहे. कौटुंबिक जीवनात जोडीदाराबाबतचा विश्वास आणि जवळीकता यात वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी सर्जनशील प्रयत्नांमध्ये यश मिळेल आणि तुमच्या प्रतिभेचे कौतुक होईल. पैसे हुशारीने खर्च करा. आज आरोग्य चांगले राहील. ध्यान आणि योग यामुळे मन शांत असेल.


    दिनविशेष

    ओडिसी नृत्याचे प्रवर्तक केलुचरण महापात्रा

    टीम अवांतर

    ओडिसी नृत्याचे प्रवर्तक अशी ओळख असणाऱ्या केलुचरण महापात्रा यांचा जन्म रघुराजपूर या छोट्या गावात (जगन्नाथपुरी, जिल्हा ओडिशा) एका पट्ट चित्रकारांच्या घराण्यात 8 जानेवारी 1926 रोजी झाला. रघुराजपूरमधील चित्रकारांची ही कला आगळी-वेगळी असून या प्रकारच्या चित्रकारीमध्ये तलम कापडावर विविध संस्कार करून त्यावर पारंपरिक धार्मिक चित्रे नैसर्गिक रंगांनी रंगविली जातात. केलुचरण यांचे वडीलही असे चित्रकार आणि मर्दलवादक होते.

    वयाच्या नवव्या वर्षी गावातील बालचंद्र साहू यांच्या ‘गोटिपुआ आखाड्यात’ केलुचरण यांनी प्रवेश केला खरा मात्र वडिलांनी त्यांना मोहन सुंदरदेव गोस्वामी यांच्या ‘रासलीलां’त घातले. हा समूह गावोगाव दौरा करून नृत्यनाट्याचे कार्यक्रम करीत असे. यातूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या अभिनय, नृत्य आणि नाट्यतंत्राची जडणघडण झाली.

    हेही वाचा – पुस्तकांचा ठेवा अन् खरा वारसदार!

    केलुचरण यांच्या अध्ययनाचा 1946 ते 1952 हा महत्त्वाचा काळ होता. या काळात त्यांनी कटकच्या प्रसिद्ध अन्नपूर्णा कलासमूहात पंकज चरण दास आणि दुर्लभ चंदा तसेच गुरू मोहन गोस्वामी यांच्या रासलीला समूहाबरोबर अनेक नाटकांमध्ये कामे केली. दयाल शरण यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले. इथेच त्यांनी विविध मुद्रांचा अभ्यास केला. पंकज चरण दास दिग्दर्शित देवी भस्मासुर आणि दशावतार या नृत्यनाटकातील त्यांची नृत्यनाट्ये विशेष गाजली. त्यांची साथीदार नर्तिका लक्ष्मीप्रियाशी त्यांची ओळख झाली. लक्ष्मीप्रिया यांनी देवी भस्मासुरमध्ये मोहिनीची भूमिका साकारली होती. पुढे लक्ष्मीप्रिया यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर उभयतां जगन्नाथपुरीला गेले. तिथे त्यांनी महारी आणि गोटिपुआ या दोन्ही पद्धतींचा सखोल अभ्यास करून महारीतील भक्तिभाव, तर गोटिपुआतील तंत्र या दोन्हींचा समन्वय साधून एक नवी पद्धत त्यांनी निर्माण केली. त्यांच्या या नृत्यप्रकार संशोधनातून ‘उपेन्द्र भांजा’ हे पहिले ओडिसी नृत्यनाट्य त्यांनी सादर केले. इथूनच त्यांना ओडिसी नृत्यगुरू म्हणून मान्यता मिळाली.

    1953 पासून केलुचरण यांनी ‘कला विकास केंद्र’ या ओडिशातील पहिल्या नृत्य संगीत विद्यालयात अध्यापनास सुरुवात केली. सुरुवातीस त्यांनी ओडिसी नृत्यप्रकाराची शास्त्रीय बैठक निश्चित केली. या संस्थेत त्यांनी साधारणपणे 15 वर्षे अध्यापन केले. तसेच, ओडिसी नृत्यशैलीतील अनेक नृत्यनटिका त्यांनी दिग्दर्शित केल्या. याच काळात संयुक्ता पाणीग्रही, कुमकुम मोहंती, प्रियंवदा मोहंती, सोनल मानसिंग, मिनाती मिश्रा, माधवी मुद्गल यांच्यासारखे उत्तम कलाकार त्यांनी घडविले.

    ओडिसी नृत्यातील 200 हून अधिक एकल नृत्यरचना त्यांच्या आहेत. केलुचरण यांनी 1980पासून भारतभर दौऱ्यास प्रारंभ करून ओडिसीचे शिक्षण दिले. देशातल्या मोठमोठ्या सांस्कृतिक केंद्रांतून त्यांनी या नृत्यप्रकाराचे शिक्षण मिळण्याची  व्यवस्था केली. ते उत्तम तबला आणि  मर्दलवादक तसेच नृत्य-रचनाकार होते.

    केलुचरण यांच्या नृत्यातील योगदानाबद्दल भारत सरकारकडून पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे सन्मान, तर मध्य प्रदेश राज्याचा कालिदास सन्मान आणि आसाम राज्याचा शंकरदेव पुरस्कार प्रदान करण्यात आले. 7 एप्रिल 2004 रोजी त्यांचे भुवनेश्वर येथे निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑगस्ट 2026

    August 10, 2026 पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 09 ते 15 ऑगस्ट 2026

    August 9, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 09 ऑगस्ट 2026

    August 9, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑगस्ट 2026

    By Team AvaantarAugust 10, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 10 ऑगस्ट 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 19…

    साप्ताहिक राशीभविष्य : 09 ते 15 ऑगस्ट 2026

    August 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 09 ऑगस्ट 2026

    August 9, 2026

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑगस्ट 2026

    August 10, 2026

    Movie : One Life… प्रत्येक आयुष्य महत्त्वपूर्ण

    August 9, 2026

    प्रेमाचे झाड

    August 9, 2026

    पल भर में ये क्या हो गया…

    August 9, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 09 ते 15 ऑगस्ट 2026

    August 9, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : मद्यपाआंगींचें वस्त्र, लेपाहातींचें शस्त्र

    August 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 389
    • अवांतर 202
    • आरोग्य 137
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 527
    • फिल्मी 63
    • फूड काॅर्नर 246
    • मैत्रीण 24
    • ललित 838
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑगस्ट 2026

    August 10, 2026

    Movie : One Life… प्रत्येक आयुष्य महत्त्वपूर्ण

    August 9, 2026

    प्रेमाचे झाड

    August 9, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.