दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 04 जानेवारी 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 14 पौष शके 1947; तिथि : प्रतिपदा 12:30; नक्षत्र : पुनर्वसु 15:11
- योग : वैधृति 25:47; करण : तैतिल 23:09
- सूर्य : धनु; चंद्र : मिथुन 09:42; सूर्योदय : 07:12; सूर्यास्त : 18:12
- पक्ष : कृष्ण; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
हेही वाचा – आपुलेची मरण पाहिले म्यां डोळा…
दिनविशेष
प्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन
टीम अवांतर
ख्यातनाम संगीतकार राहुल देव बर्मन ऊर्फ आर. डी. बर्मन यांचा जन्म 27 जून 1939 रोजी झाला. आई मीरा देवी आणि ज्येष्ठ संगीतकार एस. डी. बर्मन यांचे पुत्र आर. डी. बर्मन यांच्यावर लहानपणापासूनच रवींद्र संगीताचे संस्कार झाले. वयाच्या अकराव्या वर्षापासून ते माऊथ ऑर्गनवर सतत काही ना काही वाजवायला शिकले. ते वारंवार सरगम-मधला पाचवा स्वर ‘प’वर भर देत होते, ते ऐकून ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांनी “ये तो पंचम सूर में बजाता है…” अशी प्रतिक्रिया दिली आणि तिथूनच ‘पंचम’ अशी आरडी यांची ओळख बनली.
पंचम यांनी वडिलांचा सहाय्यक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि कालांतराने सिनेसृष्टीतील आघाडीचे संगीतकार म्हणून स्थान तयार केले. स्वतंत्र संगीतकार म्हणून पंचमदांना पहिली संधी अभिनेता, दिग्दर्शक असलेल्या मेहमूद यांनी “छोटे नबाव” या चित्रपटात दिली. यातील सगळीच्या सगळी गाणी लोकप्रिय झाली.
पाश्चिमात्य संगीताचे फ्युजन करणारे पंचमदा यांनी 1960 ते 1990 हा काळ अक्षरश: गाजवला. तिसरी मंजिल, पडोसन, आंधी, सत्ते पे सत्ता, प्यार का मौसम, कटी पतंग, आप की कसम, यादों की बारात, कसमें वादे, घर, गोलमाल, खुबसूरत, शोले, रॉकी, लव्ह स्टोरी, सीता और गीता, रामपूर का लक्ष्मण, मेरे जीवन साथी, बॉम्बे टू गोवा, अपना देश, सागर आणि परिचय यासह अनेक चित्रपटांमधील गाण्यांना संगीत दिले.
हेही वाचा – सुख सुख म्हणजे काय असतं?
पंचमदांनी गीतकार गुलजार यांच्यासोबत सर्वाधिक काम केले. ‘सनम तेरी कसम’ चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तर, त्यांनी संगीत दिलेल्या ‘हम किसी से कम नहीं’मधील “क्या हुआ तेरा वादा…” गाण्यासाठी मोहम्मद रफी यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हिंदी चित्रपट संगीताचे सूर बदलणाऱ्या या महान संगीतकाराचे 4 जानेवारी 1994 रोजी निधन झाले.


