Friday, January 16, 2026

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष; 23 डिसेंबर 2025

Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष; 23 डिसेंबर 2025

दर्शन कुलकर्णी

  • आज, दिनांक : 23 डिसेंबर 2025; वार : मंगळवार
  • भारतीय सौर :  02 पौष अग्रहायण शके 1947; तिथि : तृतीया 12:12; नक्षत्र : श्रवण 31:07
  • योग : व्याघात 16:29; करण : वणिज 24:44
  • सूर्य : धनु; चंद्र : मकर; सूर्योदय : 07:06; सूर्यास्त : 18:05
  • पक्ष : शुक्ल; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
  • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

विनायक चतुर्थी

अयन करीदिन

वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष – आजचा दिवस करिअरला चालना देण्यासाठी एक उत्तम दिवस असणार आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत समोर येतील. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याच्या संधी मिळतील. मात्र, संपूर्ण विचार करून गुंतवणूक करा.

वृषभ – आज कामाशी संबंधित महत्त्वाची माहिती गोळा करण्यात बराच वेळ जाईल. यासाठी मित्रांशी देखील संपर्क साधू शकता. आर्थिक बाबींच्या दृष्टीने दिवस आनंददायक असेल. अध्यात्माकडे आज कल जास्त असेल. तब्येतीची काळजी घ्या, पथ्येपाणी सांभाळा.

मिथुन – आजचा दिवस कामात यश देईल. वित्तीय क्षेत्रात काम करणाऱ्या जातकांसाठी हा चांगला काळ आहे. आजच्या कठोर परिश्रमाचे भविष्यात सकारात्मक परिणाम मिळतील. तथापि, अनपेक्षित खर्च होऊ शकतो, नियंत्रण ठेवा.

कर्क – आज सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. यामुळे समाजात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. शिवाय, तुम्ही जे काही कार्य कराल, त्याचे सर्वांना खूप कौतुक वाटेल. आजचा दिवस भागीदारीच्या दृष्टीने उत्तम आहे. पैसे खर्च करताना, विचारपूर्वक करा.

सिंह – स्पर्धात्मक भावना प्रबळ असेल. त्यामुळे आपले सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा आज तुम्ही प्रयत्न कराल. संतुलित आणि व्यवस्थित दिनचर्या राखल्याने बहुतेक कामे वेळेवर पूर्ण होतील. रागावर नियंत्रण ठेवा, बोलताना कोणचा अपमान होणार नाही, याची काळजी घ्या.

हेही वाचा – होऊनही न झालेल्या लग्नाचे गूढ!

कन्या – कामात कोणताही हलगर्जीपणा करू नका. चालढकल करून कामे पूर्ण होणार नाहीत, हे लक्षात ठेवा. आज नोकरी बदल होण्याची शक्यता आहे.  दिनचर्या योग्यरित्या पाळा, आळस टाळा. पैशांबाबत शहाणपणाने निर्णय घ्या.

तुळ – आज कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या संतुलित पद्धतीने पार पाडू शकाल. तुमची काम करण्याची पद्धत खूप व्यावहारिक असेल. व्यक्तिमत्त्वामुळे समाजातील प्रतिष्ठा वाढेल. स्थावर मालमत्तेत नफा मिळण्याची शक्यता आहे. खाण्यावर ताबा ठेवा. तब्येतीची काळजी घ्या.

वृश्चिक – आज यश मिळवण्यासाठी प्रतिभा दाखवावी लागेल. किरकोळ अडचणी असूनही, ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. आज एखादी चांगली बातमी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी प्रतिस्पर्धी सक्रिय राहतील, त्यामुळे सावध राहावे लागेल.

धनु – प्रभावशाली व्यक्तींशी असलेला संपर्क नवीन यश मिळवून देईल. तुमच्या क्षमतेनुसार या ओळखीचा पुरेपूर फायदा घ्याल. नोकरी किंवा व्यवसायातील चढ-उतारांनी दबून जाण्याऐवजी, तुमची कार्यशैली सुधारण्याचा प्रयत्न करा.

मकर – कामाचा दर्जा आणि वेग यांचे संतुलन साधण्याचा प्रयत्न कराल. मात्र कामाचा ताण आणि प्रतिकूल कौटुंबिक परिस्थितीमुळे अडचणी उभ्या राहू शकतात. आर्थिकदृष्ट्या दिवस सामान्य राहील. आरोग्याशी संबंधित खर्च उद्भवण्याची शक्यता आहे.

कुंभ – राग आणि अतिउत्साह टाळावा, कारण हे दोन्ही घटक तुमच्यासाठी थोडे वेदनादायक असू शकतात. आज कामाच्या ठिकाणी कोणाही समोर  नकारात्मक प्रतिक्रिया देऊ नका, कारण असे केल्याने अडचणी वाढू शकतात. प्रतिकूल परिस्थितीत संयम राखणे फायदेशीर ठरेल.

हेही वाचा – नाक दाबलं की, तोंड उघडतं

मीन – भावनिकदृष्ट्या तुम्ही संवेदनशील व्हाल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांवर जास्त अवलंबून राहण्याऐवजी स्वतःचे निर्णय स्वतःच घ्या. काम स्वतः पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.


दिनविशेष

कला आणि साहित्य समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी

टीम अवांतर

कला आणि साहित्यक्षेत्रात आपल्या समीक्षेचा ठसा उमटवणाऱ्या प्रसिद्ध समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा जन्म 21 मे 1928 रोजी मुंबईतल्या जोगेश्वरी येथे झाला. वयाच्या आठव्या वर्षापासून लागलेले अखंड वाचनाचे वेड आणि अठराव्या वर्षांपासून सुरू केलेले लेखन हे नाडकर्णी यांचे वैशिष्ट्य होते. अठराव्या वर्षी हाती घेतलेली लेखणी पुढे सलग 64 वर्षे त्यांनी खाली ठेवली नाही. विसाव्या वर्षी त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली, मात्र ती ‘तुकाराम शेंगदाणे’ या टोपणनावाने. 1951 ते 1953 या काळात ते ब्रिटनच्या उच्चायुक्तालयात नोकरीला होते.

भारतात परत आल्यावर त्यांनी इंग्रजी पत्रकारिता आणि कला समीक्षा सुरू केली. कला समीक्षणाबरोबरच कथा, कादंबऱ्या, लेख अशा क्षेत्रांमध्ये त्यांची मुशाफिरी सुरू होती. दोन बहिणी, कोंडी यासारख्या कादंबऱ्या असोत किंवा पाऊस, भरती, चिद्घोष सारखे कथासंग्रह असोत, मुंबईतील उच्चभ्रू पारसी किंवा ख्रिस्ती समाजाचे दर्शन त्यांच्या लेखनातून मराठी वाचकांना झाले. तोपर्यंत हे वातावरण मराठी माणसाला अनोळखीच होते.

नाडकर्णी यांच्या कला समीक्षेने एक काळ गाजवला होता. पुस्तके, चित्रपट, नाटके, चित्रे यांची समीक्षा करताना ते जराही भीडभाड ठेवत नसत. विख्यात चित्रकार एम. एफ. हुसेनदेखील त्यांची कला समीक्षा आवर्जून वाचत असे. एम. एफ. हुसेन यांच्यावरील अनवाणी, पिकासो, गायतोंडे, डी. डी. दलाल आणि हिचकॉक यांच्यावरील चरित्रग्रंथांचे लेखनही त्यांनी केले. ‘अश्वत्थाची सळसळ’, ‘अभिनय’, ‘प्रतिभेच्या पाऊलवाटा’, ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप’ आदी समीक्षा ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली. 

फ्रान्स सरकारने 1986 मध्ये कलाक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार देऊन, तर ब्रिटिश सरकारने 1994 मध्ये त्यांना गौरवचिन्ह बहाल केले. फ्रेंच सरकारतर्फे ‘अक्षरांचे शिलेदार’ हा किताबही त्यांना देण्यात आला. अशा या प्रसिद्ध समीक्षकाचे 23 डिसेंबर 2010 रोजी निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!