डॉ. सारिका जोगळेकर
होमिओपॅथिक तज्ज्ञ
मानवी शरीरात घडणाऱ्या जैविक प्रक्रियांपैकी पचनक्रिया ही सर्वात सूक्ष्म, परंतु अत्यंत महत्त्वाची असते. आपण जे अन्न खातो त्यातून शरीराला ऊर्जा, पोषकद्रव्ये आणि वाढीसाठी आवश्यक घटक मिळवण्याचे काम ही प्रक्रिया अखंडपणे पार पाडते.
खाण्यानंतर पचनाची प्रक्रिया आपल्या तोंडापासून सुरू होते. जेव्हा आपण अन्न खातो, तेव्हा आपल्या तोंडातील लाळ अन्नासोबत मिसळते. लाळेमध्ये काही एन्जाईम्स असतात जे अन्नातील कार्बोहायड्रेटचे विघटन सुरू करून पचनाची प्रक्रिया सुरू करतात. तोंडातील चवीची अनुभूती देखील पचनास मदत करते, कारण चव ओळखल्यानंतर शरीरात पचनासाठी आवश्यक रसायने तयार होतात. अन्न जितकं व्यवस्थित चावले जाते, तितकं पुढील अवयवांचा अन्न पचवण्याचा ताण कमी होतो आणि म्हणून जास्त चावल्याने पचनक्रिया सुधारते.
अन्न गिळल्यावरती अन्ननलिकेत जाते आणि पेरिस्टाइलिटिक (peristalsis) हालचालींमुळे अन्न पोटाकडे सरकते. पोटात हायड्रोक्लोरिक ॲसिड (HCl) आणि इतर एंझाईम्सच्या मदतीने अन्न द्रवरूप होते. पोटातून अन्न लहान आतड्याकडे सरकते. लहान आतड्यामध्ये यकृतातून पित्त आणि स्वादुपिंडातून एंझाईम्स रिलीज होतात. या एंझाईम्सच्या साह्याने कार्बोहायड्रेट, प्रोटिन आणि फॅक्ट्स पूर्णपणे विघटित होतात. लहान आतड्यामध्ये सूक्ष्म बारीक रचना असते ज्याला villi म्हणतात, त्यातून अन्नातील सर्व पोषकद्रव्य रक्तात शोषून घेतली जातात. मग मोठ्या आतड्यामध्ये उरलेले पाणी आणि खनिज पदार्थ शोषले जाते, तर उरलेले अवशेष घन स्वरूपात बदलतात. शेवटी न पचलेले पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात.
हेही वाचा – Homeopathy : बदलती लाइफस्टाईल म्हणजे आजारांना निमंत्रण
आपल्या शरीरात ‘दुसरा मेंदू’ म्हणून ओळखला जाणारा अवयव म्हणजे आपले आतडे. आपल्या पचनसंस्थेतील सर्वात कार्यशील अवयवांपैकी आतडे हे एक आहे. अन्नातून ऊर्जा मिळवण्याच्या प्रक्रियेत आतड्यांची मुख्य भूमिका आहे. पचनक्रिया, पोषण शोषण, प्रतिकारशक्ती, मनस्थिती आणि शरीरातील अनेक हार्मोन्स यांचे नियंत्रण आतड्यांमधील सूक्ष्मजीवांच्या (gut microbes) संतुलनावर अवलंबून असते. त्यामुळे gut health म्हणजेच आतड्यांचे आरोग्य सुधारले तर संपूर्ण शरीराची कार्यक्षमता नैसर्गिकरीत्या सुधारते.
आपल्या आतड्यांमध्ये अब्जावधी चांगले आणि वाईट बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया आपण खाल्लेले अन्न पचवायला मदत करतात. चांगले बॅक्टेरियांचे प्रमाण जास्त असेल तर, पचन नीट होते, ऊर्जा योग्यरीत्या मिळते, प्रतिकारशक्ती मजबूत होते, त्वचा आणि केसांची गुणवत्ता सुधारते, चिंतेतही घट होते आणि वजन संतुलित राहाते. अत्यंत कमी लोकांना माहीत असते की, आपल्या प्रतिकारशक्तीपैकी जवळपास 70 टक्के प्रतिकारशक्ती ही आतड्यांवर अवलंबून असते. आतड्यांमधल्या चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियांमधला रेशिओ बदलला की, आतड्यांचे आरोग्य बिघडते. शरीरात ॲसिडिक पदार्थांचे प्रमाण साठते आणि मग त्या ॲसिडमुळे अन्ननलिकेच्या आतल्या भागामध्ये काही बदल होतात. परिणामी, पेरिस्टाइल्सिसवरती परिणाम होतो. हा रेशियो बदलण्यामागचे कारणे समजून घेऊन त्यावरती काम केले तर, हे बिघडलेले आतड्यांचे आरोग्य आपण पुन्हा सुधारू शकतो.
‘Gut health’ बिघडण्याचे मुख्य कारण म्हणजे ‘जीवनशैली’.
- जास्त तेलकट, तळलेले पदार्थ
- पॅकेट फूड
- जास्त preservatives, आर्टिफिशियल कलरचा वापर
- अतिखाणे (overeating)
- अनियमित जेवणाच्या वेळा
- व्यायामाचा अभाव
- कमी पाणी पिणे
- जास्त अँटिबायोटिक्स आणि इतर औषधांचे सेवन – अँटिबायोटिक्स वाईट बॅक्टेरियांबरोबरच चांगले बॅक्टेरियासुद्धा नष्ट करते. त्यामुळे पचनसंस्थेतील उपयुक्त बॅक्टेरियासुद्धा कमी होतात आणि मग पचनक्रियेवर परिणाम होतो.
गट हेल्थ (Gut health) बिघडले की, आपले शरीर सुरुवातीला आपल्याला सौम्य भाषेत सिग्नल देते. पोट फुगणे, गॅसेस, ढेकर येणे, आम्लपित्त, ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन अशा तक्रारींनी सुरुवात होते.
कालांतराने अन्नाचे पचन व्यवस्थित होत नसल्याने शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही, मग दिवसभर थकवा, कमजोरी जाणवते. वजन वाढायला लागते आणि ते कमी करणे सुद्धा कठीण होते. त्वचेवर सुद्धा त्याचे परिणाम दिसून येतात पिंपल्स, एक्झिमा, ॲलर्जी त्वचा अगदी निस्तेज होते. केस गळायला सुरुवात होते.
प्रतिकार शक्ती कमी होते – वारंवार सर्दी खोकला आणि इन्फेक्शन्स चे प्रमाण वाढते.
मनस्थिती बिघडते – गट-ब्रेन कनेक्शनमुळे चिडचिड, चिंता, ताण, मूड स्विंग जसे मानसिक बदलही दिसू लागतात, कारण आनंद देणारे सिरोटोनिंग मोठ्या प्रमाणात आतड्यांमध्ये तयार होतो.
Hormonal imbalance – स्त्रियांमध्ये पाळी अनियमित होणे, PCOD चे त्रास सुरू होतात.
बद्धकोष्ठता आणि आतड्यातील दाह (inflammation) – दीर्घकाळ गट हेल्थ खराब असल्यास आतड्यांमध्ये सूज येते आणि मग शरीरातील इतर आजारांचा पाया तयार होतो.
Food intolerance – काही पदार्थ खाल्ल्यानंतर काही लोकांना लगेचच त्रास होतो पोट दुखते, पोट फुगल्यासारखे वाटते, त्वचेवरती पुरळ येते. या ॲलर्जिक रिॲक्शन असतात.
गट हेल्थ चांगली राहण्यासाठी काय करावे?
1. आहारात प्रोबायोटिक पदार्थांचा समावेश करा
दही, ताक, किमची, घरचे लोणचे, केळी, ओट्स, कांदा, लसूण
(प्रोबायोटिक म्हणजे उपयुक्त जीवाणू, जे आपल्या पचनसंस्थेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. हे जीवाणू नैसर्गिकरीत्या आपल्या आतड्यात असतात आणि ते काही पदार्थांमधून आपल्याला मिळू शकतात.)
2. भरपूर फायबरयुक्त आहार घ्या
फायबरमुळे पचन व्यवस्थित होते आणि बद्धकोष्ठता टाळली जाते.
फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, सलाड, डाळी यांचा समावेश रोजच्या आहारात असलाच पाहिजे.
3. पुरेसे पाणी प्या
4. पुरेशी झोप घ्या
सात ते आठ तासांची झोप असल्यास गट माइक्रोब्सचे संतुलन राखले जाते. झोपेची कमतरता पचनक्रियेवर थेट परिणाम करते. पोटातील ॲसिड सिक्रेट होण्याचे प्रमाण वाढते.
5. ताण-तणाव टाळण्याचा प्रयत्न करा
ताण वाढल्यामुळे आतड्यातील चांगले बॅक्टेरिया कमी होतात. तसेच योगा, प्राणायाम किंवा ध्यान केल्यामुळे मन शांत राहते आणि गट हेल्थ सुधारते.
6. प्रोसेस आणि जंक फूड कमी करा
प्रोसेस फूडमध्ये जे प्रिझर्वेटिव्ह आणि आर्टिफिशियल फ्लेवर्स किंवा कलर असतात, त्यामुळे आतड्यातील चांगले बॅक्टेरिया खूप प्रमाणात नष्ट होतात.
7. अनियमित जेवणाच्या वेळा
आपली पचनसंस्था निश्चित वेळेनुसार काम करण्याची सवय लावून घेते. ही लय बिघडली की, पचनसंस्थेत असंतुलन होते आणि पचनक्रिया मंदावते. पोटामध्ये जेव्हा हायड्रोक्लोरिक ॲसिड (HCI) सिक्रेट होते, त्या वेळेला जर आपण खाल्लं नाही तर, पोटातील ॲसिड वाढते. परिणामी ॲसिडिटीचा त्रास सुरू होतो. अनियमित जेवणाच्या वेळांमुळे भुकेची जाणीव आणि खाल्ल्यानंतर तृप्त वाटण्याची जाणीव, यात देखील बदल दिसून येतात आणि आपले शरीर गोंधळते.
8. रोज हलका व्यायाम करा
30 ते 45 मिनिटं चालणे, योग किंवा सायकलिंग यामुळे पचनसंस्थेवर सकारात्मक परिणाम होतो. व्यायामामुळे शरीरातील रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे पचनसंस्थेपर्यंत रक्त आणि ऑक्सिजन चांगल्या प्रमाणात पोहोचते आणि प्रचनक्रिया गतिमान तसेच सुरळीत होते. आतड्यांची हालचाल सुधारते. व्यायामामुळे तणाव निर्माण करणारे हार्मोन्स सुद्धा कमी होतात.
सुरळीत पचनसंस्थेसाठी होमिओपॅथी
दोन रुग्णांना एक सारखाच पचनाचा त्रास असला तरी, त्याची कारणे पूर्णपणे वेगळी असू शकतात. कोणाला मानसिक ताण असू शकतो तर, कोणाच्या कामामुळे अनियमित जेवणाच्या वेळा असू शकतात. होमिओपॅथी प्रत्येक रुग्णाची ही मूलभूत कारणे ओळखून उपचार करते. थेट कारणांवरतीच उपचार असल्यामुळे पोटाचे विकार मुळापासून नष्ट होतात आणि मग सारखा सारखा तो त्रास होत नाही.
हेही वाचा – Homeopathy : हिवाळ्यातील ॲलर्जी आणि होमिओपॅथीची ऊब
गट-ब्रेन कनेक्शनमुळे चिडचिड, ताण, भीती, चिंता अशा नकारात्मक भावनांचे रूपांतर सकारात्मक भावनांमध्ये करण्याची क्षमता होमिओपॅथिक औषधांमध्ये आहे. सकारात्मक भावना निर्माण झाल्या की, याच गट-ब्रेन कनेक्शनमुळे गट हेल्थ सुधारायला लागते. हार्मोन्स संतुलनात यायला लागतात. या सकारात्मक भावनांचा आपल्या संपूर्ण आरोग्यावरती चांगलाच परिणाम होतो.
कुठल्याही बॅक्टेरियावरती मात करण्यासाठी जेव्हा औषध दिले जाते तेव्हा, त्या औषधाला चांगले बॅक्टेरिया किंवा वाईट बॅक्टेरिया यामधला फरक समजत नाही आणि वाईटसोबत चांगले सुद्धा नष्ट होते आणि आपल्या आतड्यांना चांगल्या बॅक्टेरियाची गरज असते. होमिओपॅथी शरीराच्या नैसर्गिक हीलिंगला सक्रिय करतात. शरीरातले एंझाइम्स सुरळीत होतात आणि आतड्यांमधला बॅलन्स सुधारण्याची क्रिया वेगाने वाढते.
गट हेल्थ कमजोर असलेल्या रुग्णांना अनेकदा औषधांचे दुष्परिणाम होतात आणि त्यामुळे गट हेल्थ अजूनच बिघडण्याची शक्यता असते. होमिओपॅथीचे औषध सुरक्षित आहे आणि त्याचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत, त्यामुळे या सौम्य आणि नैसर्गिक औषधांमुळे गट हेल्थ बिघडण्याची काही शक्यता नाही.
“समतोल, शांत आणि निरोगी आतड्यांसाठी होमिओपॅथी हा अत्यंत विश्वासार्ह पर्याय आहे.”
HOLISTIC HOMOEOCURE CLINIC
ऋतू पार्क, ठाणे वेस्ट मोबाइल – 9890533941


