Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeफूड काॅर्नरRecipe :  अंबाडीची फुले आणि पुदिन्याची चटणी

Recipe :  अंबाडीची फुले आणि पुदिन्याची चटणी

माधवी जोशी माहुलकर

अंबाडीची भाजी ही लोहयुक्त आहे, अंबाडीमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाणात वाढ होते. दृष्टीक्षमता वाढते. शिवाय, त्वचेवरील रोगांचे संक्रमण कमी होतात, रोगप्रतिकार शक्ती वाढवते. एवढेच नव्हे तर, अंबाडीच्या सेवनाने पचन सुधारते, भूक वाढते. हाडे मजबूत होण्यास मदत होते. अंबाडीचा रसाचे सेवन मधुमेहीसाठी योग्य असल्याचे मानले जाते. अंबाडीचा सेवनाने रक्‍तवाहिन्यांचे कार्य व्यवस्थित होते. परिणामी हृदयरोग, उच्च रक्‍तदाब नियंत्रणास मदत होते. अंबाडीच्या फुलांपासून जॅम, चहा, सरबत, चटणी आणि जेली, पानांपासून सूप, लोणचे, बियांपासून बेसन आदी नावीन्यपूर्ण प्रक्रिया पदार्थ तयार करणे शक्य आहे.

अंबाडीच्या पानांची आंबटगोड भाजी ज्वारीच्या किंवा तांदळाच्या कण्या घालून खूप छान होते आणि यासोबत भाकरी म्हणजे काय सुख असतं, हे खाणाऱ्यालाच माहीत! अंबाडीच्या पानांची भाजी जशी चविष्ट होते, तशीच त्याच्या लालचुटूक फुलांची चटणी देखील खूपच छान होते. पाचक आणि स्वादिष्ट अशी ही अंबाडी आणि पुदिना चटणी जेवणाची लज्जत वाढवते.

हेही वाचा – Recipe : पोळीचे चटकदार खस्ते!

साहित्य

  • अंबाडीची फुले – आठ ते दहा
  • पुदिन्याची पाने – एक मुठभर
  • लसूण पाकळ्या – चार ते पाच
  • जिरे – एक चमचा
  • तिखट – दोन छोटे चमचे
  • गूळ पावडर – दोन चमचे (किंवा गुळाचा दोन खडे चवीनुसार घ्यावेत.)
  • मीठ – चवीनुसार

हेही वाचा – Recipe :  मूगडाळ आणि तांदळाची लुसलुशीत इडली!

कृती

  1. अंबाडीच्या फुलांच्या पाकळ्या काढून आतील बोंडाचे बी काढून टाकावे.
  2. मिक्सरमध्ये अंबाडीच्या पाकळ्या, मुठभर पुदिन्याची पाने, लसणाच्या पाकळ्या, तिखट, मीठ, जिरे आणि गूळ टाकून त्याची गंधासारखी चटणी वाटावी.
  3. तोंडी लावणे म्हणून ही चटणी खूपच छान लागते.

एकूण कालावधी – 15 मिनिटे


तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

avaantar.recipe@gmail.com

या ईमेलवर किंवा

9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील. तथापि, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!