आरोग्य सदरातील सुरुवातीच्या काही लेखांमध्ये आपण मनाचे आरोग्य, मानसिक ताणतणाव निवारणाची आवश्यकता तसेच मानसिक ताणतणाव निवारणार्थ उपयुक्त उपाय या विषयांवर सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण निरामय मानसिक आरोग्य म्हणजे काय, हे थोडक्यात समजून घेणार आहोत आणि तद्नंतर मानसिक आरोग्याच्या विविध पैलूंविषयी जाणून घेणार आहोत.
निरामय मानसिक आरोग्य म्हणजे मनाची निरोगी आरोग्यावस्था.
निरामय मानसिक आरोग्याचे विविध पैलू
निरामय मानसिक आरोग्य संकल्पनेशी संबंधित विविध संज्ञा
मन आणि आयुर्वेद, पंचकोश, मनोमय कोश, मन आणि शरीर यांतील परस्पर संबंध.
मानसिक आरोग्य बिघडण्याची लक्षणे, कारणे आणि दुष्परिणाम
जसे शरीराचे आजार असतात, तसे मनाचे देखील आजार असतात. मनाचे आरोग्य कोणत्या कारणांमुळे बिघडते, मनाचे आरोग्य बिघडल्याचे कसे लक्षात येते आणि त्याचे होणारे दुष्परिणाम.
मानसिक ताणतणावांचे सुव्यवस्थापन
मानसिक ताणतणाव म्हणजे काय? मानसिक ताणतणावांचे स्वरूप आणि दुष्परिणाम, मानसिक संतुलन आणि संवर्धन यासाठी ताणतणावांचे सुव्यवस्थापन.
समृद्ध मानसिक आरोग्यासाठी निसर्ग- सुसंगत दिनचर्या
स्वस्थ आरोग्याची लक्षणे, शरीरातील त्रिदोष आणि जैविक घड्याळ, निसर्गचक्र तसेच त्रिदोष, दिनचर्येचे महत्त्व आणि वेळापत्रक.
हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक…
नियमित योगाभ्यासातून मनःस्वाथ्य आणि मनःशांती
योगाभ्यासातील निवडक उपयुक्त योगिक क्रिया : ओंकार आणि प्रार्थना, हस्त मुद्रा, श्वसन आणि प्राणायाम, सूर्यनमस्कार, योगासने, योगनिद्रा, ध्यान आणि सराव कोष्टक.
आरोग्यदायी सात्त्विक आहारातून मानसिक तृप्ती-समाधान
अन्नमय कोश, सप्तधातू कार्य आणि पोषक आहार, सात्त्विक आहार, आरोग्यवर्धक आहार पदार्थ आणि आरोग्यदायी अन्नपदार्थ.
योग्य आचार- विचारातून निरोगी, निकोप आणि संतुलित मन
योगशास्त्रातील यम-नियम पालन आणि उपयुक्त आचार-विचार.
सुदृढ मनासाठी प्रभावी उपयुक्त उपाययोजना
- निसर्ग सान्निध्य
- शारीरिक व्यायाम
- स्वयंप्रेरणा
- समाजाशी जुडणे
- धार्मिक उपासना
- आयुर्वेदिक उपचार
- मानसिक उपाय आणि उपचार
मानसिक आरोग्य संवर्धन
वयोमानानुसार किशोरवयीन, तरूण- प्रौढ, ज्येष्ठ यांच्या मानसिक समस्या आणि निवारणासाठी उपाय.
हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : कामाचे नियोजन आणि पूर्तता
निरामय मानसिक आरोग्याचा वस्तुपाठ
निरामय आरोग्याची वैशिष्ट्ये आणि संतुलित जीवनशैली
आजच्या धकाधकीत ताणतणाव हा परवलीचा शब्द झाला आहे. दैनंदिन जीवनातील विविध मानसिक ताणतणाव यशस्वीरीत्या हाताळून निरामय मानसिक आरोग्य प्राप्तीसाठी तसेच संवर्धनासाठी सर्वांनाच सहजी आचरणात आणता येईल, अशा उपाययोजनांबद्दल यथायोग्य मार्गदर्शन खरोखरच आवश्यक आहे.
या संदर्भात इथे यथार्थ उल्लेख करावासा वाटतो की निरामय आरोग्य संकल्पनेतील माझ्या “निरामय मानसिक आरोग्य” या पुस्तकात मानसिक आरोग्याच्या वरील पैलूंवर नित्य जीवनात उपयुक्त असे सर्वांगीण, सर्वसमावेशक सविस्तर सखोल मार्गदर्शन केले आहे.
क्रमशः


