दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 20 नोव्हेंबर 2025; वार : गुरुवार
- भारतीय सौर : 29 कार्तिक शके 1947; तिथि : अमावस्या 12:16; नक्षत्र : विशाखा 10:58
- योग : शोभन 09:52; करण : किंस्तुघ्न 25:32
- सूर्य : वृश्चिक; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:47; सूर्यास्त : 17:59
- पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
अमावस्या समाप्ती – दुपारी 12:16
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – मित्रांच्या सहकार्याने व्यवसायाची परिस्थिती अनुकूल राहील. मोठ्या प्रकल्पांमध्ये यश मिळेल. एखादा नवीन उपक्रम देखील सुरू करू शकता. सरकारी क्षेत्रात तुम्हाला फायदे मिळतील. उत्पन्नाचे स्रोत विकसित होतील. धार्मिक कार्यासाठी पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील जुने तणाव संपतील आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतील.
वृषभ – नोकरी आणि व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा दिवस चांगला असेल. वडिलोपार्जित मालमत्तेतून काही लाभ मिळेल. कुटुंबात धार्मिक कार्यक्रम होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाने वेळ घालवाल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी आणि उत्साही राहाल. मात्र, बोलण्यावर संयम ठेवा.
मिथुन – अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रगतीच्या संधी मिळू शकतात. तथापि, नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल नाही. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. ऑफिसमध्ये कामाच्या ओझ्यामुळे थकवा येऊ शकतो. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. लहान प्रवासाचा योग आहे.
कर्क – मन अस्वस्थ असेल आणि शारीरिक थकवाही जाणवेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, परंतु अनावश्यक खर्चही होऊ शकतो. वाहन देखभाल खर्च वाढेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. बोलण्यावर संयम ठेवा. रागामुळे गोष्टी बिघडू शकतात. आज निःस्वार्थपणे इतरांना मदत कराल, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल.
सिंह – अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांकडून फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी अनुकूल वातावरण असेल. सहकाऱ्यांकडून पाठबळ मिळेल. कामामुळे तुमची ओळख निर्माण होईल. कुटुंबासह एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. आरोग्याची काळजी घ्या, आहाराकडे विशेष लक्ष द्या.
हेही वाचा – …यह तो अलगही ‘केमिकल लोच्या’
कन्या – दिवस शुभ राहील. संपूर्ण दिवस अद्भुत अनुभवांनी आणि उत्साहाने भरलेला असेल. वरिष्ठ तुमच्या कामावर समाधानी असतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन वाहनाचा योग आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. संगीतात तुमची आवड वाढेल. मात्र, शारीरिक अस्वस्थता आणि मानसिक चिंता कायम राहील.
तुळ – आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, मात्र त्याला कठोर परिश्रमांची जोड द्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात. राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक संघर्ष होण्याची शक्यता आहे. मानसिक ताण वाढू शकतो. नकारात्मक विचारांपासून दूर रहा, कारण त्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य प्रभावित होऊ शकते.
वृश्चिक – आजचा दिवस चांगला जाईल. तुमचे कठोर परिश्रम यशस्वी होतील. अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकेल. त्याचबरोबर अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीची भेट आनंददायी असेल. विद्यार्थ्यांचा वेळ सामाजिक कामांसाठी खर्च होईल. संभाषणात संतुलन राखा. आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, काळजी घ्या.
धनु – व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. खर्च नियंत्रित राहील. मित्र आणि प्रियजनांसोबत प्रवासाची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती राहील. राग नियंत्रित करा, बोलण्यावर संयम ठेवा. कुटुंबात अनावश्यक खर्च आणि वाद टाळा. नकारात्मक मानसिकतेमुळे नुकसान होऊ शकते. सामाजिक कार्यात स्वतःला व्यग्र ठेवा.
मकर – गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम आहे. एखादा नवीन प्रकल्प सुरू करू शकता. खर्च वाढू शकतो. नोकरी बदलण्याची शक्यता आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असाल. कुटुंबातील सदस्यांशी आणि शेजाऱ्यांशी वाद टाळा, एखादा छोटासा वादही मोठ्या भांडणात रूपांतरित होऊ शकतो.
कुंभ – दिवस सामान्य राहील. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. कठोर परिश्रमानंतरच यश मिळेल, परंतु अनावश्यक खर्चही वाढतील. मुलांशी किंवा नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. तथापि, निरर्थक वाद टाळा. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे. खाण्याच्या सवयींची नियंत्रित ठेवा.
हेही वाचा – धुळवड… आयुष्यात नव्याने रंग भरणारी!
मीन – व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. राग आणि उत्साह अशा टोकाच्या भावनांचा कल्लोळ अनुभवायला मिळेल. त्यामुळे आत्मसंयम बाळगा. जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. विरोधकांकडून संपत्ती आणि कीर्तीला नुकसान पोहोचवण्याचे प्रयत्न होतील. शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या.
दिनविशेष
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी
टीम अवांतर
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1927 रोजी मध्य प्रदेशातील रायपूर येथे झाला होता. नागपूरच्या चिटणीस पार्कजवळील प्राथमिक महापालिका शाळेत त्यांचे सुरुवातीचे शिक्षण झाले. लहानपणापासूनच त्यांच्यावर गांधी विचारांचा खूप मोठा पगडा होता. 1930, 1932 आणि 1942 मध्ये त्यांच्या वडिलांना सत्याग्रही म्हणून तुरुंगात टाकण्यात आलं होतं. 1941 साली चंद्रशेखर धर्माधिकारी यांनीही स्वातंत्र्य सत्याग्रहामध्ये सहभाग घेतला. 1942च्या भारत छोडो आंदोलनातही ते सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना सुमारे तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पुढे 1949 मध्ये त्यांनी बी.ए.ची पदवी संपादन केली. नंतर नागपूर विद्यापीठातून 1952 मध्ये एम.ए. आणि 1954 मध्ये एलएलबी या पदव्या त्यांनी संपादन केल्या. त्यानंतर 2 वर्षे जिल्हा न्यायालयात वकिली केल्यावर नागपूर उच्च न्यायालयात वकील म्हणून ते रुजू झाले. ऑक्टोबर 1970 मध्ये त्यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे अतिरिक्त सरकारी वकील म्हणून झाली. 1972 साली ते मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. 1989 मध्ये या पदावरून निवृत्त होईपर्यंत आपल्या कारकिर्दीत न्या. धर्माधिकारी यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले. ज्यामध्ये आणीबाणी लागू असतानाच्या काळातील नागरिकांचा जगण्याचा हक्क, स्त्रियांचे हक्क तसेच, मनोरुग्णांचे, कैद्यांचे तसेच आदिवासी मुलांचे हक्क इत्यादी विविध प्रश्नांवरील किंवा मुद्द्यांवरील निकालांचा विशेषत्वाने उल्लेख करता येईल. निवृत्तीनंतर त्यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रशासन लवादाच्या अध्यक्षपदी करण्यात आली होती. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये त्यांनी घटना आणि कायदा, त्याशिवाय अन्य विविध विषयांवर सुमारे 16 पुस्तके आणि अनेक लेख लिहिले. त्यांच्या पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 2003 मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन गौरवले आहे. 3 जानेवारी 2019 रोजी त्यांचे निधन झाले.


