Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeललितहत्तीचे स्मशान!… वास्तव काय?

हत्तीचे स्मशान!… वास्तव काय?

यश:श्री

स्मार्टफोन हाती आल्यापासून काही जुन्या गोष्टींनाही उजाळा मिळत आहे. अलीकडेच अभिनेता अमजद खान याच्या एका मुलाखतीची क्लिप पाहायला मिळाली. चित्रपटांच्या यशाबद्दल त्याला विचारले असता, “कोणता चित्रपट चालेल हे सांगता येत नाही. पण कुत्रा, मांजर, साप यांचे चित्रपट मात्र चालतात…” अशा आशयाचे उत्तर त्याने दिले. वास्तवात, असे चित्रपट चालल्याची अनेक उदाहरणे आहे. त्यातही चित्रपटाला हमखास यश देणारे प्राणी म्हणजे, कुत्रा, घोडा, नाग-नागिण आणि हत्ती! ‘हाथी मेरे साथी’ चित्रपटाच्या यशामध्ये मोठा वाटा त्यातील हत्तींचा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

त्यातही युद्ध असो की मनोरंजन हत्तीचे महत्त्व कायम राहिले आहे. प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांनी एका लेखात हत्तीच्या मृत्यूबद्दलचा उल्लेख केला आहे. त्या म्हणतात, निसर्गप्रेमी, शिकारी आणि प्रवासी लोक हत्ती कुठे मरतो, या प्रश्नाची नेहमी चर्चा करीत असतात. काहींचे म्हणणे असे आहे की, त्याच्या काही ठराविक जागा आहेत. ज्या माणसाच्या दृष्टीपथात सहजासहजी येत नाहीत. जेथे सर्व हत्ती मरतात, त्या जागांना ‘हत्तीचे स्मशान’ म्हणतात. अशा जागा भारत आणि आफ्रिकेत अस्तित्त्वात असल्याचे वर्णन अनेक लोकांनी केले आहे. याबाबत दुर्गाबाईंनी एच. एस. वूड यांच्या ‘शिकार मेमरिज्’ पुस्तकाचा (1934) हवाला दिला आहे.

दुसऱ्या काही लोकांचा असा विश्वास आहे की, म्हातारा हत्ती ज्या ठिकाणी असतो, तिथेच मरतो. पण एक गोष्ट नक्की आहे की, मेलेला हत्ती जंगलात क्वचितच आढळतो. तसेच, सर्व म्हातारी आणि आजारी जनावरे नेहमी एका बाजूला, दूर अशा जागा मरणासाठी शोधतात. हे सर्वांना ठाऊक आहे, असे सांगतानाच दुर्गाबाई म्हणतात, याबाबत निसर्ग हा फार क्रूर आहे. म्हाताऱ्या तसेच रोगी जनावराबद्दल सशक्त जनावरांच्या मनात कोणतीही दया नसते.

हेही वाचा – संवेदनशील हत्ती अन् इंग्रजी साहित्य…

जंगलात मी नियमित जात असे. पण मेलेला हत्ती कधीच आढळला नाही. लुशाई डोंगरावरील तळ्याच्या आसपास हत्तीची बरीच हाडे पाहिली असल्याचे ए. पोर्टेयस्, आयसीएस याने म्हटले आहे. तर, हत्तीचा शिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सँडरसन याने म्हटले आहे की, प्रसवताना मरण पावलेली एक मादी हत्ती तसेच एका बुडलेल्या हत्तीचे प्रेत आपण पाहिलेले आहे. म्हातारपणामुळे मेलेल्या हत्तीचे प्रेत मला कधी आढळलेले नाही. माणसाच्या दृष्टीपथात येऊ शकणार नाही, अशी जागी हत्ती आपले शेवटचे दिवस घालवतो, असा काहींचा विश्वास आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

एखाद्या म्हाताऱ्या किंवा खूप जखमी झालेल्या हत्तीला जेव्हा असे वाटते की, आपले दिवस’ संपत आले आहेत, तेव्हा तो आपणहून एकटाच निघून जातो. पाण्याच्या ठिकाणी म्हणजे नदीच्या पात्राजवळ अशी जनावरे नक्कीच जात असणार. नदीच्या पात्राच्या उतारावरील दलदलीचा भाग निवडत असतील आणि हत्ती त्यात रुतत असतील. जखमी किंवा म्हातारा हत्ती स्थूलपणामुळे बाहेर पडण्यासाठी धडपड करू शकत नाहीत आणि हळूहळू दलदलीत रुतत जाऊन दिसेनाचा होतो, असे आफ्रिकन शिकारी डी. डी. लियेल यांनी म्हटले आहे. त्यांचा हा अनुमान बरोबर असल्याचे दुर्गा भागवत यांना वाटते.

हेही वाचा – हत्ती आणि युद्ध…

सर विल्यम गोवर्स यांनीही हेच मत प्रदर्शित केले आहे. मेलेल्या हत्तीचे अवयव झडल्यामुळे तसेच बुरशीमुळे बहुधा नष्ट होत असतील. या तज्ज्ञांची मते लक्षात घेता, कोणीही असे अनुमान नक्की करू शकेल की, ‘हत्तीच्या स्मशानाची जागा’ ही एक फक्त दंतकथा असू शकेल आणि जंगलातील आदिवासी त्यावर विश्वास ठेवत असतील, असेही लेखिकेने नमूद केले आहे.

क्रमश:

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!