Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 09 नोव्हेंबर 2025

Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 09 नोव्हेंबर 2025

दर्शन कुलकर्णी

  • आज, दिनांक : 09 नोव्हेंबर 2025; वार : रविवार
  • भारतीय सौर : 18 कार्तिक शके 1947; तिथि : पंचमी 25:55; नक्षत्र : आर्द्रा 20:04
  • योग : सिद्ध 15:01; करण : कौलव 15:05
  • सूर्य : तुळ; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 06:41; सूर्यास्त : 18:02
  • पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
  • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

वेद कन्सल्टन्सी / 9987433660


दिनविशेष

भारतीय भ्रूणशास्त्राचे जनक पंचानन माहेश्वरी

टीम अवांतर

पंचानन माहेश्वरी यांचा जन्म राजस्थानातील जयपूर येथे 9 नोव्हेंबर 1904 रोजी झाला. एविंग ख्रिस्तियन कॉलेजातून ते बी. एस्सी. आणि एम. एस्सी झाले. वस्तुत:, वैद्यकीय शिक्षणाकडे कल असलेल्या माहेश्वरी यांच्यावर त्यांच्या महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक विनफीड दुडगॉन यांचा प्रभाव असल्याने ते वनस्पतीशास्त्राकडे ओढले गेले. माहेश्वरी यांनी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शरीर- रचनाशास्त्र आणि भ्रूणशास्त्र (गर्भविज्ञान) या विषयात पीएच्.डी. प्राप्त केली. त्यांनी आग्रा, लखनऊ, अलाहाबाद, ढाका आणि दिल्ली येथे अध्यापनाचे काम केले. वनस्पतीशास्त्रातील सर्व उपविषयांचा त्यांचा चांगला अभ्यास होता. युरोप आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञ त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे अभ्यासासाठी येत असत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागात भ्रूणशास्त्र आणि ऊतीशास्त्राचे संशोधन केंद्र स्थापन करून नावारूपाला आणले. माहेश्वरी यांनी भ्रूणपोषणात रुपजननाचे पुरावे आपल्या संशोधनाद्वारे दिले. माहेश्वरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भ्रूणशास्त्रातील गुणवैशिष्ट्यांचा उपयोग वर्गीकरणातील अडचणी दूर करण्यासाठी केला. अगुणीत (हॅप्लोईड)  वनस्पती मिळवण्यासाठी परागकोश (अंथर) कल्चरचा उपयोग केला. त्यांच्या या शोधाने एक नवे दालन उघडले गेले. या तंत्राचा उपयोग पुढे अनेक पिकांमध्ये विविधता निर्माण करण्यात झाला. माहेश्वरी यांनी बीजाणूशास्त्र (Palynology), पेशीशास्त्र (Cytology), रासायनिक वर्गीकरणशास्त्र आणि शरीररचनाशास्त्र या सर्वांचा एकत्रित अभ्यास करून वर्गीकरण मांडण्यावर भर दिला. हा दृष्टीकोन नंतर अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठातील वर्गीकरणतज्ज्ञ जी. एच. लॉरेन्स यांनी त्यांच्या टॅक्सोनॉमी ऑफ व्हेस्क्यूलर प्लांटस  या पुस्तकात वापरला. ॲन इंट्रोडक्शन टू एम्ब्रोयॉलॉजी ऑफ अँजिओस्पर्स  हे त्यांचे पुस्तक जगात सगळीकडे वापरले जाते. हे पुस्तक रशियन भाषेतही भाषांतरीत झाले आहे. त्यांनी नवी दिल्ली येथील वनसंपदेची  सचित्र  माहिती प्रसिद्ध केली आहे. तसेच, त्यांचे रिसेंट ॲडव्हान्सेस इन एम्ब्रोयॉलॉजी हे पुस्तकही प्रकाशित आहे. माहेश्वरी यांना बऱ्याच भारतीय आणि परदेशी सायन्स अकॅडमींच्या  फेलोशिप्स मिळाल्या असून त्यातील सर्वोच्च फेलोशिप लंडनच्या रॉयल सोसायटीची  एफआरएस ही आहे. त्याशिवाय त्यांना इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 1968 सालच्या इंडियन सायन्स कॉंग्रेसचे ते जनरल प्रेसिडेंट म्हणून नाम निर्देशित झाले होते, मात्र 18 मे 1966 रोजी त्यांचे निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!