नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला…!
शिस्त म्हणजे शिस्त… हे आपण लहानपणापासूनच ऐकत मोठे झालो. ‘खाण्यापिण्याचे लाड, पण बाकी ऐकलं नाही तर फटके मिळतील…’, लहानपणी सगळ्यांनीच हे ऐकले असेल. माझंही तसंच… सकाळी उठल्यावर बसल्या जागी देवाचे आभार मानून नमस्कार करायचा. आपल्या पांघरुणाची आपणच घडी घालायची. आन्हिक उरकून शाळेची तयारी स्वत:च करायची. फक्त केस खूप लांब होते म्हणून वेण्या तेवढ्या आईने घालून द्यायच्या… ही झाली घरातली शिस्त किंवा संस्कार म्हणा!
शाळेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर, तसं मला शाळेत जायला आवडायचं… अभ्यास पण व्यवस्थित करायचे… चांगले मार्क्स पण मिळायचे, पण तरीही मला अभ्यास करायचा मात्र खूप कंटाळा असायचा. कसंबसं एकदाच जमेल तेवढं शिक्षण घेऊन गप्प बसुयात. मग पुन्हा अभ्यास म्हणून करायचा नाही… ठरवून टाकलं!
हेही वाचा – भाषेची ‘शुद्धता’ जपली जावी!
बरं पुढे काय करायचं? ॲक्टिंग हेच प्रोफेशन ठेवायचं वगैरे कधीही डोक्यात नव्हतं. अचानक ॲक्टिंग करायला लागले… मज्जा वाटली! अधून मधून काम करता करता, व्यावसायिक कलाकार म्हणून कामं मिळू लागली. चार लोक ओळखू लागली. हातात पैसे येऊ लागले. छान वाटायला लागलं… त्यातही अभ्यास चुकणार याचा आनंद होताच!
हेही वाचा – ‘त्या’ राजस्थानी महिलांची ‘पॉवर बँक’!
एका ठराविक वयानंतर येणारा आत्मविश्वास, एक प्रगल्भता हे माणसाचं आयुष्य, स्वभाव बदलते. दोन मुले झाली, त्यानंतर काम जरा जास्त प्रमाणात सुरू झालं. पण एपिसोडची कामं जास्त मिळत होती. क्राइम शोज… 3 दिवस एका स्टोरीच काम… प्रत्येक वेळी नवीन गोष्ट, नवीन भूमिका… आणि आता आलं का अभ्यास करणं! ज्या अभ्यासापासून कंटाळून पळत होते. पण तो अभ्यास मानेवर बसलाच. पुस्तकी नाही तर कॅरेक्टर स्टडी! म्हणजे हा अभ्यास आता आयुष्यभरासाठी कायमचा माझ्याशी बांधला गेलाय.
नशिबात जे आहे त्यापासून सुटका नाही.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


