दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 13 ऑक्टोबर 2025; वार : सोमवार
- भारतीय सौर : 21 आश्विन शके 1947; तिथि : सप्तमी 12:24; नक्षत्र : आर्द्रा 12:26
- योग : परिघ 08:09, शिव 29:54; करण : बालव 23:41
- सूर्य : कन्या; चंद्र : मिथुन 29:58; सूर्योदय : 06:31; सूर्यास्त : 18:19
- पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
कालाष्टमी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – दिवस संमिश्र असेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायाच्या कामात व्यग्र रहाल. उत्पन्नातील घट अस्वस्थ करेल, परंतु ते कोणाशीही शेअर करू शकणार नाही. घरात किंवा बाहेर कोणाशी कोणतेही वाद सुरू असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न करा. नातेवाईकाच्या आगमनाने खर्च वाढेल.
वृषभ – दिवस संमिश्र असेल. कामाचा ताण खूप जाणवेल, ज्यामुळे थकवा येईल. स्पर्धेत तुम्हाला फायदा होईल. करिअरच्या प्रगतीतील अडथळे दूर होतील. पालकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोके शांत ठेवून बोला.
मिथुन – कामाच्या ठिकाणी हवे असलेले काम करायला न मिळाल्याने कदाचित नैराश्य येईल. राजकारणात सहभागी असलेल्यांनी त्यांच्या विरोधकांच्या प्रभावाखाली येण्याचे टाळावे. आपल्या निर्णय क्षमतेत सुधारणा करण्याची आवश्यकता असेल. कोणाकडून पैसे उधार घेतले असतील तर ते तातडीने परत करण्याची परिस्थिती उद्भवू शकते.
कर्क – काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यात दिवसभर व्यग्र रहाल. व्यवसायात एखाद्या महत्त्वाच्या कराराबाबत किंवा निर्णयाबाबत गुप्तता ठेवा. अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका. भूतकाळातील चुकांमधून शिका. नवीन वाहनाची खरेदीचा होऊ शकते.
सिंह – कामाच्या ठिकाणी काहीतरी गोंधळ होईल. कोणते काम आधी करावे, हे तुम्हाला कळणार नाही. कुटुंबातील इतर सदस्यांसोबत भेट होईल. मालमत्तेबाबत काही वाद सुरू असेल तर तो न्यायालयात जाऊ शकतो. मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवायचे असतील तर, आधी अभ्यास करा, तज्ज्ञांशी चर्चा करा आणि मग निर्णय घ्या.
हेही वाचा – चंदन आणि कोळसा…
कन्या – दिवस आनंदाचा असेल. कुटुंबात एखादी शुभ घटना घडण्याची शक्यता आहे. आरोग्य सुधारेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. कोणाचाही सल्ला काळजीपूर्वक ऐका, मात्र सारासार विचार करून मगच अंतिम निर्णय घ्या. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांची मदत मिळेल.
तुळ – आजचा दिवस कठोर परिश्रमाचा असेल. कोणतेही अपूर्ण काम पूर्णत्वास जाईल. जबाबदाऱ्या वाढतील. भागीदारीत सावधगिरी बाळगा. भूतकाळातील एखाद्या चुकीबद्दल आता अस्वस्थ वाटू शकते. मात्र त्यावर फार आता फार विचार करत बसू नका, अन्यथा मानसिक आरोग्य बिघडू शकते.
वृश्चिक – आजचा दिवस जरा प्रतिकूलच असेल.एखाद्या गोष्टीवरून घरात तणाव निर्माण होऊ शकतो. प्रगतीपथावर असलेल्या एखाद्या प्रकल्पात अडचणी निर्माण होतील. संततीचे परीक्षेतील निकाल असमाधानकारक असू शकतो. त्यामुळे चिडचिड होईल. वैवाहिक जीवनात मतभेद वाढू शकतात. कायदेशीर बाबींमध्ये विरोधक अडचणी निर्माण करू शकतात.
धनु – कायदेशीर बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. शारीरिक त्रास वाढू शकतो. व्यवसायाच्या दृष्टीने केलेला प्रवास फायदेशीर ठरेल. एखाद्या नातेवाईकाच्या वर्तनामुळे निराश वाटू शकते. आधी केलेल्या गुंतवणुकीतून नफा मिळेल.
मकर – व्यवसायात घाईघाईत कोणताही निर्णय घेणे टाळा. मकर जातकांचा कल अध्यात्माकडे असेल. कायदेशीर बाबींमध्ये विजय मिळेल. सगळ्या प्रकारच्या वादांपासून दूर राहा. त्यामुळे मानसिक शांतता टिकून राहील. मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळेल.
कुंभ – प्रवास करण्यापूर्वी जवळच्या वस्तूंची काळजी घ्या. आरोग्यात सुधारणा होईल. व्यवसायात सावधगिरी बाळगा. आज संतती तुमच्या अपेक्षा पूर्ण करतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. वादविवाद, संघर्ष टाळा.
हेही वाचा – Homeopathy : कोलेस्ट्रॉल वाढणे हा आजार नव्हे तर, एक चेतावणी
मीन – दिवस फायदेशीर ठरेल. व्यवसायातील नवीन योजना यशस्वी होतील. कुटुंबात विवाहोत्सुक जातकांच्या विवाहाशी संबंधित चर्चा यशस्वी होतील. घरी एखादी शुभ घटना घडण्याची शक्यता आहे. मात्र कुटुंबातील बाबी बाहेर उघड करणे टाळा.
दिनविशेष
सूरबहारवादक अन्नपूर्णादेवी
टीम अवांतर
भारतातील मैहर या वादक घराण्याच्या प्रसिद्ध स्त्री सूरबहारवादक आणि सतारवादक अन्नपूर्णादेवी यांचा जन्म 23 एप्रिल 1927 रोजी मध्य प्रदेश राज्यातील मैहर येथे झाला. निष्णात सरोद-सतारवादक तसेच संगीतरचनाकार उस्ताद अल्लाउद्दीनखाँ हे त्यांचे वडील होत. ते ब्रजनाथसिंह या मैहर संस्थानच्या राजांच्या दरबारी सेवेत होते. अन्नपूर्णादेवी यांचा जन्म चैत्रपौर्णिमेचा असल्याने राजा ब्रजनाथसिंह यांनी त्यांचे नाव ‘अन्नपूर्णा’ असे ठेवले आणि तेच पुढे रूढ झाले. अल्लाउद्दीनखाँ यांनी अन्नपूर्णादेवी यांना संगीतशिक्षणापासून दूर ठेवले होते; पण केवळ श्रवणभक्तीतून त्यांनी आत्मसात केलेले संगीतज्ञान वडिलांनी अनुभवले. त्यांना प्रथम सतारीची आणि नंतर सूरबहारची तालीम देण्यास सुरुवात केली. सूरबहार हे वाद्य त्यांच्या नाजूक बांध्याला पेलायला अवघड असूनही त्यांनी वडिलांच्या इच्छेला मान दिला आणि अल्लाउद्दीनखाँ यांनी त्यांना शिकवायला सुरुवात केली. प्रसिद्ध सतारवादक पंडित रविशंकर अल्लाउद्दीनखाँ यांच्याकडे आले, तेव्हा अन्नपूर्णादेवींच्या वादनातील स्वरांच्या आरोहा-अवरोहातील वजन आणि स्पष्टता त्यांना मोहित करून गेली. तेही अल्लाउद्दीनखाँ यांच्याकडे सतार शिकू लागले. तेव्हा त्यांनी दोघांनाही शुद्ध कल्याण एकत्रच शिकविला. पुढे दोन वर्षांनी म्हणजे 1949 मध्ये रविशंकर आणि अन्नपूर्णादेवी यांचा विवाह झाला. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशनल क्लब, दिल्ली येथील संगीतसभेत त्या दोघांच्या सहवादनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला रसिकांची आणि संगीतज्ञांची पसंती मिळाली. मात्र त्यानंतर कौटुंबिक कलहामुळे 1956 मध्ये अन्नपूर्णादेवी मैहरला परतल्या. कोलकात्याला स्थापन झालेल्या ‘अलिअकबर कॉलेज ऑफ म्युझिक’मध्ये अन्नपूर्णादेवी उपप्राचार्य म्हणून रुजू झाल्या. अन्नपूर्णादेवींना अनेक मानसन्मान मिळाले. 1977 साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविले. 1988मध्ये सूरसिंगार संसदकडून त्यांना शारंगदेव अधिछात्रवृत्ती देण्यात आली. 1991 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार; 1998 मध्ये त्यांना शांतिनिकेतनतर्फे ‘देशिकोत्तम’, डी.लिट. ही पदवी मिळाली. 13 ऑक्टोबर 2018 रोजी अन्नपूर्णादेवी यांचे निधन झाले.


