दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 06 ऑक्टोबर 2025; वार : सोमवार
- भारतीय सौर : 14 आश्विन शके 1947; तिथि : चतुर्दशी 12:23; नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा 28:01
- योग : वृद्धी 13:13; करण : विष्टी 22:53
- सूर्य : कन्या; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:24
- पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
कोजगरी पौर्णिमा
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस संमिश्र असेल. दिवसभर व्यग्र रहाल आणि कामे पूर्ण करण्याकडे तुमचा कल राहील. दिवसभर आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. नवीन प्रकल्पावर काम करण्यास इच्छुक असलेल्यांना हा दिवस शुभ राहील. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल. नफ्याची देखील शक्यता आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवता येईल.
वृषभ – आज थोड्याशा अडचणी जाणवतील. कामाच्या जास्त ताणामुळे लक्ष विचलित होऊ शकते. खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आज कुटुंबातील एखाद्या सदस्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे. इतरांच्या निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करू नका. बाहेरील अन्नसेवन टाळा, त्याने त्रास होऊ शकतो.
मिथुन – दिवस शुभ आणि फलदायी ठरेल. नोकरी करणाऱ्यांना काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. मित्राच्या मदतीने तुम्हाला नोकरी मिळेल. यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण येईल. आजचा दिवस सर्जनशील कामांसाठी परिपूर्ण असेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल.
कर्क – आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या प्रत्येक हालचालीवर काळजीपूर्वक लक्ष ठेवा, अन्यथा कोणीतरी तुमचा गैरफायदा घेऊ शकेल. कामाच्या ठिकाणी संवाद सुधारणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आर्थिक बाबींमध्येही खूप काळजी घ्यावी लागेल. पैसे उधार देणे टाळा. कोणत्याही किरकोळ आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.
सिंह – आजचा दिवस ऊर्जावान आणि आत्मविश्वासाने भरलेला असेल. मन आनंदी आणि सकारात्मक असेल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. तुमच्या नेतृत्व कौशल्यामुळे इतरांवर प्रभाव पाडण्यास यशस्वी व्हाल. आज आर्थिक परिस्थिती मजबूत असेल. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.
हेही वाचा – मायाळू आणि उबदार… आज्जी!
कन्या – दिवस संमिश्र असेल. कामावर जास्त मेहनत करावी लागेल, मात्र त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील. आर्थिकदृष्ट्या, आजचा दिवस चांगला असेल. धन प्राप्तीचे योग आहेत. कुटुंबात एखाद्या चांगल्या घटनेमुळे आनंद निर्माण होईल, कौटुंबिक जीवनात इतर सदस्यांमध्ये आदर निर्माण होईल. जोडीदार मात्र तुमच्या बोलण्याने नाराज होऊ शकतो.
तुळ – आठवड्याचा पहिला दिवस चांगला जाईल. नशीबाची मोठी साथ मिळेल, अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकेल. तुम्हाला सकारात्मक आणि शुभ परिणाम बघायला मिळतील. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. आर्थिक लाभाची शक्यता वाढेल. मात्र, आरोग्याबाबत खूप काळजी घ्यावी लागेल.
वृश्चिक – आजचा दिवस समस्यांनी भरलेला असू शकतो. ज्यामुळे नैराश्य जाणवेल. कामाच्या ठिकाणी आज वारंवार संतापाचे प्रसंग येतील. त्यामुळे राग नियंत्रित करावा लागेल. कौटुंबिक वाद होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत भांडण झाले असेल किंवा गैरसमजातून काही प्रश्न निर्माण झाला असेल तर संवाद साधून त्यावर उपाय शोधा.
धनु – आजचा दिवस काही आव्हानांनी आणि काही नवीन संधींनी भरलेला असेल. नशिबाची साथ मिळेल. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत वाढल्याने आर्थिक लाभ वाढतील. कौटुंबिक स्तरावर घडणाऱ्या गोष्टींमुळे तुम्हाला आनंद आणि वडीलधाऱ्यांकडून आशीर्वाद मिळतील. आरोग्य चांगले असेल, परंतु कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आजारपणामुळे धावपळ होऊ शकेल.
मकर – कामात यश मिळवण्याचा आजचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या समर्पणाची आणि कठोर परिश्रमाची प्रशंसा करतील. कामाचा ताण जास्त असेल, परंतु अशा परिस्थितीत तुमचे व्यक्तिमत्व चमकेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. पैशाचा चांगला प्रवाह तुम्हाला आनंद देईल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल.
कुंभ – आजचा दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी एखादी नवी कामगिरी साध्य करता येईल. मात्र दिवस धावपळीचा आणि कष्टाने भरलेला असेल. आज आर्थिक परिस्थिती सुधारेल. कुटुंबात शांती आणि नातेसंबंधात आनंद असेल. जोडीदारासोबत काही रोमँटिक वेळ घालवण्याची संधी मिळू शकते.
हेही वाचा – सुरेखाच्या दुसर्या लग्नाची गोष्ट!
मीन – दिवस आनंददायी असेल. ज्यांना कामात अडचण येत आहे, त्यांना आज त्यांच्या समस्या सोडवता येतील. आर्थिकदृष्ट्या, दिवस चांगला असेल, परंतु खर्च वाढू शकतो. भौतिक सुखसोयींचा आनंद मिळेल. आज कुटुंबातील एखाद्या कार्यक्रमानिमित्त सगळे नातेवाईक एकत्र येऊ शकतात. आरोग्य चांगले राहील.
दिनविशेष
भारतीय भौतिकशास्त्रज्ञ मेघनाद साहा
टीम अवांतर
भारतीय भौतिकशास्त्रज्ञ मेघनाद साहा यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1893 रोजी डाक्का (ढाका) जिल्ह्यातील सिओरात्तली (आता बांगलादेश) येथे झाला. त्यांनी कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजात प्रफुलचंद्र रॉय आणि सर जगदीशचंद्र बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊन 1915 मध्ये एम्. एस्सी आणि नंतर सापेक्षता सिद्घांत आणि प्रारण दाबाचे मापन या विषयांवर संशोधन करून पीएच्. डी. संपादन केली. कोणत्याही मूलद्रव्याच्या अणुंकरिता छेदन किंवा आयनीभवन केवळ उच्च तापमानामुळे घडून येत नसून ते नीच दाबामुळे सुद्घा घडते, हे साहा यांनी सप्रमाण सिद्ध केले. साहा यांनी 1920 मध्ये ‘सूर्याच्या वर्णमय आवरणातील आयनीभवन’ या विषयावरील एक निबंध फिलॉसॉफिकल मॅगझिनमध्ये प्रसिद्ध केला. साहा यांनी कोलकाता येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स’ ही संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला. ते या संस्थेचे सन्माननीय संचालक होते. त्यांच्या मृत्यूनंतर या संस्थेला त्यांचे नाव देण्यात आले. ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो देखील होते. भारतीय विज्ञान परिषद संस्थेच्या एकविसाव्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. 1952च्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार म्हणून ते लोकसभेवर निवडून आले होते. आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांनी आपले लक्ष सामाजिक कार्याकडे वळविले. साहा यांचे 16 फेब्रुवारी 1956 रोजी दिल्ली येथे निधन झाले.


