Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe :  कोजागरी स्पेशल मसाला दूध
    फूड काॅर्नर

    Recipe :  कोजागरी स्पेशल मसाला दूध

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 5, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, कोजागरी, कोजागरी पौर्णिमा, मसाला दूध, दूध मसाला,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आराधना जोशी

    पुरवठा संख्या – 4 व्यक्तींसाठी

    दूध मसाल्याचे साहित्य

    • बदाम – अर्धी वाटी
    • काजू – अर्धी वाटी
    • पिस्ता – पाव वाटी
    • हिरवी वेलची – 20 ते 25 (वेलची किती लहान किंवा मोठी आहे, त्यानुसार किती घ्यायची हे ठरवावे)
    • केशर – 15 ते 20 काड्या
    • किसलेले जायफळ – पाव टीस्पून
    • हळद – 1 टेबलस्पून
    • मिल्क पावडर – 2 टेबलस्पून (पूर्णपणे ऐच्छिक, वगळली तरी चालेल)

    तयारीस लागणारा वेळ :

    • बदाम, काजू, पिस्ता भाजायला – 5 ते 7 मिनिटे
    • भाजलेले बदाम, काजू, पिस्ता थंड व्हायला – 30 मिनिटे
    • वेलची सोलायला – 5 मिनिटे
    • मसाला करायला  – 2 मिनिटे
    • एकूण कालावधी – अंदाजे 45 मिनिटे

    हेही वाचा – Recipe : खानदेश स्पेशल… खुड मिरचीचे पाणी

    कृती

    1. एका पॅनमध्ये मंद आचेवर बदाम, काजू आणि पिस्ता हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्या. भाजताना सगळ्या सामग्रीला व्यवस्थित आच लागली पाहिजे.
    2. नंतर गॅस बंद करून भाजलेले बदाम, काजू आणि पिस्ता पूर्णपणे थंड होऊ द्या.
    3. थंड झाल्यावर भाजलेले बदाम, काजू, पिस्ता, वेलची सोलून, केशराच्या काड्या, किसलेले जायफळ, हळद आणि मिल्क पावडर असे एकत्रितपणे मिक्सरमध्ये पल्स मोडवर फिरवून घ्या. हा मसाला थोडा भरडच ठेवावा.
    4. ही पावडर एका घट्ट झाकणाच्या काचेच्या बाटलीत भरून ठेवा. फ्रीजमध्ये 2 महिने हा मसाला छान टिकतो.

    मसाला दूध साहित्य

    • म्हशीचे दूध – 1 लीटर
    • दूधाचा मसाला – 4 टेबलस्पून
    • चारोळी – 1 टेबलस्पून (पूर्णपणे ऐच्छिक, वगळली तरी चालेल)
    • साखर – 4 टेबलस्पून किंवा आवडीनुसार
    • बदाम, काजू, पिस्ता – साधारणपणे प्रत्येकी 5 जाडसर तुकडे केलेले
    • केशर – 4 ते 5 काड्या
    • वाळलेल्या गुलाब पाकळ्या – 1 टेबलस्पून

    तयारीस लागणारा वेळ – दूध गरम करून उकळी यायला – साधारणपणे 15 ते 20 मिनिटे

    एकूण वेळ – साधारणपणे 2 तास (यात मसाला तयार करण्यापासूनचा वेळ गृहीत धरला आहे)

    कृती

    1. जाड बुडाच्या पातेल्यात दूध घेऊन ते मध्यम ते मंद आचेवर उकळायला ठेवा. दूध अधून मधून ढवळत रहा.
    2. दूध चांगले उकळले की, त्यात 4 चमचे दुधाचा मसाला घाला. चारोळी वापरणार असाल तर ती घाला.
    3. मसाल्यात दुधाची पावडर असल्याने आता उकळायला ठेवलेल्या दुधाला दाटसरपणा येतो. आपल्याला दूध किती दाटसर हवे त्यानुसार दूध किती वेळ आटवायचे, यांचा अंदाज घ्या.
    4. नंतर आपल्या आवडीनुसार त्यात साखर घाला आणि आणखी एक उकळी येऊ द्या. नंतर गॅस बंद करा.
    5. मसाला दूध तयार आहे.
    6. कोजागरीच्या रात्री गरम, कोमट किंवा गार करून मसाला दुधाचा आस्वाद घ्या.
    7. सर्व्ह करताना ग्लासमध्ये मसाला दूध घालून वरून बदाम, काजूचे काप, एखादी केशराची काडी आणि आवडत असेल तर सुकवलेल्या गुलाब पाकळ्या चुरडून घाला.

    हेही वाचा – Recipe : देवीसाठी त्रयोदशगुणी विडा (तांबूल)

    विशेष आहार माहिती : शाकाहारी

    टीप

    • आवडत असल्यास मसाला करताना त्यात पाव टीस्पून काळी मिरी पावडर आणि 1 टीस्पून सुंठ पावडर घातली तर दुधाला आणखी वेगळा स्वाद येतो
    • दुधाची पावडर वापरणे पूर्णपणे ऐच्छिक आहे. मसाला करताना ती वगळली तर दूध थोडे जास्त उकळवावे लागेल.
    • दुधाला दाटपणा आणण्यासाठी दूध पावडरीऐवजी सहा ते आठ बदाम वेगळे भिजवून, त्यांची सालं काढून मग मिक्सरमधून गंधासारखे बारीक वाटून घ्यावे. नंतर ते आटवण्यासाठी गॅसवर ठेवलेल्या दुधात मिक्स करावे. मात्र हा उपाय करणार असाल तर दूध सतत ढवळत रहावे लागेल. अन्यथा बदामाची पेस्ट बुडाला चिकटण्याची शक्यता असते.

    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    March 22, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    By माधवी जोशी माहुलकरMarch 22, 2026

    मध्यंतरी माझ्या वाचनात असे आले की, सुप्रसिद्ध चरित्रअभिनेत्री दिवंगत लीला मिश्रा या जेवताना पक्की रसोईतील…

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn