दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 02 ऑक्टोबर 2025; वार : गुरुवार
- भारतीय सौर : 10 आश्विन शके 1947; तिथि : दशमी 19:10; नक्षत्र : उत्तराषाढा 09:12
- योग : सुकर्मा 23:27; करण : तैतिल 07:11
- सूर्य : कन्या; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:26
- पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
दसरा
विजयादशमी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस यशाने भरलेला असेल. घरी आणि कामाच्या ठिकाणी सर्वजण तुम्हाला पाठिंबा देतील. वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होईल. मालमत्ता खरेदीसाठी वाटाघाटी करणाऱ्यांना चांगला व्यवहार मिळू शकतो. नोकरदार व्यक्तींना आज अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. त्याचवेळी आहार आणि आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.
वृषभ – आज तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. एखाद्या कामासाठी घाई करावी लागू शकते. घाईघाईने गुंतवणूक करणे टाळा. अचानक आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. जोडीदार तुमचा सल्ला काळजीपूर्वक ऐकेल आणि त्यावर कृती देखील करेल.
मिथुन – तुमचा आत्मविश्वास आणि उत्साह शिगेला पोहोचेल. एखादे काम पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस आहे. आज तुमचे संपर्कक्षेत्र वाढेल, ज्याचा येणाऱ्या काळात व्यवसायाला फायदा होईल. एखाद्या खास प्रसंगी कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल. दुसऱ्याचे वाहन चालवणे टाळा. संध्याकाळी आरोग्यात थोडा बिघाड होण्याची शक्यता आहे.
कर्क – आज आर्थिक परिस्थितीबाबत थोडीशी अडचण निर्माण होईल. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असा प्रकार घडू शकतो, त्यामुळे येणाऱ्या काळात अतिरिक्त निधीची व्यवस्था करावी लागेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये काही मुद्द्यांवरून मतभेद निर्माण होऊ शकतात, अशावेळी संयम बाळगावा लागेल. नातेसंबंधांमध्ये निर्माण झालेले गैरसमज दूर होतील.
सिंह – आजचा दिवस खूप शुभ असेल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. जुनी कामे पूर्ण झाल्याने आनंद होईल. आज अतिरिक्त पैसे कमविण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा असेल. आज व्यवसायासाठी जास्त मेहनत करावी लागू शकते. त्यानंतरच तुम्हाला यश मिळेल. ज्यांनी सरकारी नोकरीसाठी परीक्षा दिली आहे ते यशस्वी होऊ शकतात.
हेही वाचा – आयुष्याचं गणित बरोब्बर सोडविणारी… वनिता
कन्या – आजचा दिवस संमिश्र असेल. आर्थिक लाभाच्या संधी वाढतील, आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारेल. कुटुंबात शांती आणि आनंद राहील. मात्र, कोणत्याही महत्त्वाच्या कामात निष्काळजीपणा टाळावा. नोकरी करणाऱ्यांना आज नवीन संधी मिळू शकतात. पोटाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, दुर्लक्ष करू नका.
तुळ – कामाच्या ठिकाणी तुम्ही घेतलेले काही निर्णय खूप उपयुक्त ठरतील, ज्यामुळे येणाऱ्या काळात महत्त्वपूर्ण फायदे मिळतील. स्वतंत्रपणे काम करणाऱ्यांसाठी नफ्याच्या संधी वाढतील. कुटुंबाकडून तुम्हाला काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. जास्त ताण टाळावा, कारण यामुळे आजारी पडण्याची शक्यता आहे. शिवाय आज कोणाला पैसेही उधार देऊ नका.
वृश्चिक – दिवस धावपळीने भरलेला असेल. कामात यश मिळेल, अर्थात त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या संदर्भात काही चांगली बातमी मिळू शकते. वडिलोपार्जित प्रकरणाबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांशी सल्लामसलत जरूर करा. वाहन चालवताना जास्त काळजी घ्या.
धनु – दिवसभर काही ना काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. नोकरी करणाऱ्यांची आज पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. भागीदारीत काम करू इच्छिणाऱ्यांची आज व्यवसाय भागीदाराशी भेट होऊ शकेल. कौटुंबिक सौहार्द वाढेल आणि वातावरण आनंददायी राहील.
मकर – दिवस संमिश्र असेल. काही बाबतीत यश मिळू शकते, तर काही बाबतीत निराशा पदरी पडेल. आज आळस टाळा, अन्यथा तुमचे काम अडचणीत येऊ शकते. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. कुटुंबात किरकोळ मतभेद निर्माण होऊ शकतात, परंतु तुम्हाला संयम राखावा लागेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असेल.
कुंभ – दिवस यशाने भरलेला असेल. तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. काही जुन्या मित्रांची भेट होऊ शकेल. घरी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून तुम्हाला आनंद मिळेल. विवाहोत्सुकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल.
हेही वाचा – निरोप समारंभ… फक्त खुर्चीलाच मान!
मीन – दिवसभरात अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील. आज आर्थिक परिस्थिती आणखी मजबूत होईल. कुटुंबात एकता, सौहार्द आणि प्रेम कायम राहील. जमीन किंवा घरात पैसे गुंतवू इच्छिणाऱ्यांना हा दिवस अनुकूल आहे. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. आज आरोग्य चांगले राहील आणि व्यायामाचे रुटीन देखील पाळले जाईल.
दिनविशेष
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ सी. डी. देशमुख
टीम अवांतर
माजी केंद्रीय अर्थमंत्री, श्रेष्ठ अर्थनीतिज्ञ आणि प्रथम श्रेणीचे प्रशासक म्हणून ओळखले जाणारे सी. डी. अर्थात चिंतामण द्वारकानाथ देशमुख यांचा जन्म 14 जानेवारी 1896 रोजी तत्कालीन कुलाबा जिल्ह्यातील (आता रायगड) नाते या गावी झाला. मुंबई येथे ‘आर्यन एज्युकेशन सोसायटी’च्या माध्यमिक शाळेतून ते मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्या वर्षीपासून ठेवण्यात आलेली जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळविण्याचा पहिला मान त्यांना लाभला. एल्फिन्स्टन महाविद्यालयातून इंटरची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते इंग्लंडला गेले आणि केंब्रिजच्या ‘जीझस महाविद्यालया’तून बीए झाले. आयसीएस परीक्षेतही ते पहिले आले. त्यानंतरच्या काळात या परीक्षेत कोणताही भारतीय त्यांच्याइतके गुण मिळवू शकलेला नाही. दुसऱ्या गोलमेज परिषदेस देशमुख एक सचिव म्हणून उपस्थित होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मध्यवर्ती मंडळाचे सचिव, डेप्युटी गव्हर्नर आणि पुढे पहिले भारतीय गव्हर्नर, जागतिक मुद्रा परिषदेस भारतीय प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय चलन निधी आणि जागतिक बँक यावर भारताचे अधिशासक, भारतीय सांख्यिकीय संस्थेचे अध्यक्ष, युरोप आणि अमेरिका यांमधील भारत सरकारचे वित्तप्रतिनिधी, नियोजन आयोगाचे सभासद, आंतरराष्ट्रीय चलन निधी आणि जागतिक बँक यांचे अध्यक्ष अशा विविध प्रकारच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. 1950 ते 56 या काळात चिंतामणराव देशमुख भारत सरकारचे अर्थमंत्री होते. या पदावर असताना देशमुखांनी केलेली मोठी कार्ये म्हणजे ‘इम्पीरियल बँके’चे राष्ट्रीयीकरण, ‘राष्ट्रीय विकास परिषदे’ची (नॅशनल डेव्हलपमेंट कौन्सिल) स्थापना आणि आयुर्विमा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण ही होत. आयुर्विमा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण ही देशमुखांची सर्वांत महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जाते. 1959 साली रेमन मॅगसेसे पुरस्कार त्यांना मिळाला. याशिवाय लेस्टर (इंग्लंड), प्रिन्स्टन (अमेरिका), म्हैसूर आणि उस्मानिया विद्यापीठांनी चिंतामणरावांना एल्एल्. डी. ही सन्मान्य पदवी, तर कलकत्ता विद्यापाठाने डी. एस्सी. या पदवीने, अन्नमलई, अलाहाबाद, नागपूर, पंजाब आणि पुणे विद्यापीठांनी डी. लिट्. ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. 1975 मध्ये भारत सरकारने पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. अर्थकारणाव्यतिरिक्त साहित्यिक क्षेत्रातही देशमुख यांचे मोठे योगदान आहे. कालिदासाच्या मेघदूताचा मराठीमध्ये श्लोकबद्ध अनुवाद त्यांनी केलेला आहे. महात्मा गांधींची सुमारे शंभर वचने गांधी सूक्तिमुक्तावली या शीर्षकाने चिंतामणरावांनी संस्कृतमध्ये श्लोकबद्ध केली आहेत. ‘द कोर्स ऑफ माय लाइफ’ या शीर्षकाचे चिंतामणरावांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. 2 ऑक्टोबर 1982 या दिवशी त्यांचे निधन झाले.


